घनगड
लोणावळामध्ये घनदाट परिसरामध्ये उभा असलेला घनगड. ह्या किल्याचा मुख्य असा काही इतिहास नाही. पण हा किल्ला टेहळणी बुरुज किव्हा कैदी ठेवण्यासाठी करत असत तसच हा किल्ला कोकणात उतरणाऱ्या घाटवाटा मध्ये येतो असा एका साईट वर वाचला होत . आमचा व्हाटसऍप ग्रुपवर ठरवलं रविवारी घनगड करायचा. आम्ही ५ जण होतो. हिमेश, अनिल आणि अनिलची मुलगी, वैभव आणि मी. वैभव पुण्यावरून येणार होता. त्यामुळे त्याला थेट लोणावळा एस टी स्थानकाजवळ थांबायला सांगितल होता. आम्ही सकाळी ५. ४० ची इंद्रायणी एक्सप्रेसने जायायच ठरलं कारण इंद्रायणी एक्सप्रेस लोणावळ्याला ८ वाजता पोहचते, तिथुन आम्हाला पुढे ९ ची भांबुर्डे एस. टी पकडायची होती.ठरल्याप्रमाणे आम्ही इंद्रायणी पकडली. आम्ही आदीच ठरवलं होता म्हणून ह्या वेळी आम्ही आरक्षण करून ठेवला होता. अनिल आणि त्याची मुलगी ठाण्याला बसली, हिमेश कल्याणला आणि मी दादरला बसलो. गाडी कल्याण पर्यंत तरी वेळेत होती नंतर थोडी १० ते १५ मिनटं उशीर झाली.
लोणावळ्याला पोहचेपर्यंत आम्हाला ८. १० झाले. तिकडून आम्ही लोणावळा एस टी स्थानकाजवळ गेलो. वैभवला फोन केला तो आधीच तिथे पोहचला होता. एस टी ला अजून वेळ होता. तितक्यात आम्ही एस टी स्थानकावर असलेल्या उपहारगृह मध्ये नाश्ता करून घेतला. तोपर्यंत एस टी लागली. बहुतेक भांबुर्डे एस टीचा वेळ ९. १० चा होता. बहुधा एस टी खाली असल्यामूळे की काय? चालक आणि वाहक जरा आरामात आले. त्यामुळे गाडी सुटायला ९. २५ झाले. आम्हाला आधीच १५ मिनिट उशीर झाला होता त्यात आंबवणे गावामध्ये चालक चहा आणि नाश्तासाठी अजून १५ मिनिटे घेतली. लोणावळा ते भांबुर्डे अंतर ३३ कि मी आहे. आम्ही भांबुर्डे गावात १०. ४५ ला पोहचलो. आम्हाला अर्धा तास उशीर झाला होता. त्यामुळे जास्त वेळ वाया न घालवता आम्ही घनगडाचा पायथ्याचं गाव एकोले च्या दिशेने चालू लागलो. एस टी फक्त भांबुर्डे गावापर्यन्तच जाते तिकडून घनगडाचा पायथ्याचा गाव एकोले जायायला लागते.
लोणावळा ते भांबुर्डे ३३ किमी अंतर गाडीने पार करायला १. १५ तास लागतो. आणि तिकडून पुढे एकोले गावात जर रस्त्याने गेलो तर १. ३० ते २ किमी आहे. पण आम्हाला गावातल्याने शेतातून जायायला सांगितले. त्यामुळे आम्ही एकोले गावात लवकर पोहचलो. भांबुर्डे गावातून पुढे रस्ता अंधारबनचा सुरवातीचा गाव पिंपरी ला जातो. तिकडून पुढे ताम्हिणी घाट रोड मार्गे कोकणात कोलाड आणि माणगाव ला निघतो.
घनगड समोर दिसत होता. वर गडाचा वाटेवर बरीच पांढऱ्या रंगाची गर्दी दिसत होती. आम्ही गडाचा वाटेला चालू लागलो. गावापासून गडावर जाणारी वाट मळलेली आहे त्यामुळे तुम्ही कुठे हि चुकण्याची शक्यता येत नाही. सुरवातीला खाली सिमेंटने बनवून तशीच सोडून दिलेली मंदिर दिसली त्यात मुर्त्या नव्हत्या. मी एका वेबसाईट वर वाचलेलं गडाचा वाटेने जातात पायथ्याला १० मिनिटवर तुम्हाला शिवाच जुना मंदिराचे अवशेष लागतात आणि पुढे गारजाई मंदिरातील दरवाजाच्या भिंतीला शिलालेख आहे. पण आम्हाला शिवाचे मंदिर भेटले नाही . आम्ही पुढच्या वाटेला चालू लागलो. थोडा पुढे जाताच गडाचा खाली गारजाई देवीचा मंदिर लागते. हल्लीच काही १/२ वर्षांपूर्वी गडाचा मंदिराचा काम केलेलं दिसत होता . त्यामुळे मंदिराचा दरवाजा जवळ शिलालेख काही आम्हाला दिसला नाही. पण मंदिराचा समोर एक दीपमाळ आणि तुटलेली वीरगळ दिसली .
देवीचा दर्शन घेऊन आम्ही पुढे चालू लागलो. काही वेळात तुम्ही गडाचा दरवाजा जवळ पोहचतात. पण दरवाजा जवळ पोहोचायचा आधी डाव्या बाजूला एके उंच ठिकाणी शौचालय बांधलेला आहे. त्याचाच पाठी दरी आहे. शौचालयाचा बाजूला वर उजव्याबाजूला गडाचा कातळाच्या दिशेने बघितला असता . कातळावर एक वाट डावीकडे वर जाते . त्यावाटेने पुढे गेले असता एक बाजूला दरी लागते आणि थोडे पुढे पोहचताच उजव्या हाताला एक छोटीशी गुहा आहे . हि गुहा रुंदीला १०ते १२ फूट, लांबीला ६ फूट आणि उंचीला साधारण अडीच ते ३ फुटाची आहे. तिकडून पुन्हा त्याच वाटेने पाठी फिरून, शौचालयाचा तिकडून उतरून पुन्हा आम्ही दरवाजा कडे गेलो.
दरवाजाची भिंत आणि बुरुज बऱ्यापैकी चांगल्या अवस्तेत दिसत होती पण मजबूत नाही . गडाचा दरवाजा चडून वर गेल्यावर उजव्याबाजूला एक प्रचंड कातळाचा तुकडा तुटून पडून. सरळ तसाच तिकडे सपाटीचा जागेवर गडाचा कातळाला चिकटून उभा आहे. त्या कातळाच्या पुढे गेलो असता वरचा बाजूला कातळात साधारण १ते १. ३० फुटाची देवीची प्राचीन मूर्ती ठेवलेली आहे. त्याचाच उजव्या बाजूला कातळात लोखंडाची तार बांधलेली आहे. ती बहुतेक वर पाण्याचे टाके असावे तिकडे जाण्यासाठी गिरीप्रेमीने लावली असावी. आमच्या कडे वेळ खूप कमी असल्या कारणामुळे आम्ही तिकडे जाणे टाळले.
आम्ही पुन्हा पाठी फिरून दरवाजा जवळ आलो . आता आम्ही डाव्याबाजूला जिथे गडावर जायायची वाट आहे. तिकडे गेलो. तिथे तुम्हाला कातळात खोदलेल्या गुहा दिसतात. ह्या गुहेत साधारन १० ते १५ लोक राहू शकतात एवडी मोठी आहेत. पुढे गडावर जायायला २ लोखंडी शिड्या चडून जायायला लागतात, बहुतेक तिथे कातळात लहान पायऱ्या असाव्यात त्या इंग्रजाने उध्वस्त केल्या असाव्यात. पहिली शिडी वर चढल्यावर पुन्हा दुसरी शिडी चढायची. दुसरी वरची शिडी चढते वेळी त्याचा वरचा बाजूला कातळात एक पाण्याचे छोटेशे टाके आहे . जिकडून शिडी चढतो ते गडाचा वरील दरवाजा पर्यंत चड आहे आणि वाट हि निमुळती आहे. शिडीचा वरचा कातळावरून वर चडून गेल्यावर पुन्हा वर एक छोटासा भाग कातळातून चढायला लागतो. तिकडे वर पोहचल्यावर एक लोखंडी तार लावली आहे तिला धरून चालायला. पण आम्ही गेलो होतो त्यावेळी ती कोणी तरी जास्त जोर काडून तोडली होती. त्यामुळे जरा जपूनच चालायला लागत होता.
आमच्या वेळी एक शंबर लोक शिरूरवरून आले होते. मला वाटलं त्यांनी तोडले असावे कारण त्यात ट्रेकर कमी आणि हौशी जास्त वाटत होते. पण जर मी बघितला नाही तर त्यांच्यावर संशय तरी कसा घेऊ शकतो म्हणून मी तो विचार मनातून काडून टाकला, कोणी तरी दुसऱ्यानेच चुकून तोडली असेल असा विचार केला.
तेवढा कातळ आणि वरील निमुळती वाट तुम्ही वर चडून गेल्यावर तुम्हाला अजून एक दरवाजा लागतो. ह्या दरवाजाचे थोडे फार अवशेष बाकी आहेत. दरवाज्याचा उजव्याबाजूला दरवाजाचा मोठा बुरुज आहे . तिकडून पुढे गेल्यावर पाण्याचा ४/५ टाक्या आहेत. पाण्याचा टाकीतील पाणी खराब झालेले आहे . टाकीच्या बाजूने वर गडाच्या शिखरावर पोहचतो. गडाचा शिखर खूप छोटा आहे. त्यामुळे गडाचा माथ्यावर फिरायला १५ मिनिट पेक्षा जास्त वेळ नाही लागत. आणि गडाला फक्त एक दोन ठिकाणीच तटबंदी आहे कारण बाकीकडून सरळ खाली दरी लागते त्यामुळे तटबंदीची गरज नसेल लागली . बाकी गडावर अवशेष काहीच नाही. गडाचा शिखरावरून तैलबैला, सुधागड दिसतात. तर एकीकडे समोर मुळशी धरणाचा सुंदर दृश्य दिसते.
आम्ही १० ते १५ मिनिटात गड फिरून परतीचा वाटेला लागलो. आम्हाला आधीच उशीर झाला होता. आणि २ किव्हा २. १५ ची शेवटची एस टी पकडायची होती त्यामुळे त्वरेने गड उतरलो. उतरताना गर्दी नव्हती म्हणून लगेच उतरलो. खाली उतरलो तेव्हा पुन्हा एकदा त्या प्राचीन शिवमंदिराचा आम्ही शोध घेयायचा प्रयन्त केला पण काही शोधू शकलो नाही. शेवटी आम्ही पुन्हा एस टी ची वेळ बघून त्वरेने भांबुर्डे गावात गेलो. आम्हाला पोहचेपर्यंत २. १५ वाजले होतो. गावात जाऊन विचारला तर आज शेवटची एस टी बिघडली म्हणून आलीच नाही कळलं. आता कसा जायायच प्रश्न पडला.
तितक्यात आमच्या पाठून शिरूरच्या ग्रुपची मिनी बस आली. त्यात पुढे बसलेला एक व्यक्ती गावातल्याना विचारू लागले तुंग-तिकोना ला कसा जायायचा , मी त्यांना आम्हाला आंबवणे पर्यंत सोडा म्हणून विचारले पण त्यांनी न ऐकल्या सारखा करून सरळ निघून गेले. त्यांनी मदत न करण जरा अनपेक्षीत वाटलं . त्यांचा गाडीची सगळी आसन भरलेली होती, पण आम्हाला वाटलं आम्हाला उभ्याने जरी आंबवणे पर्यंत सोडला असत तरी भरपूर मदत झालीअसती. पण ठीक आहे काय बोलणार त्यांना.
गावात एकाची १० आसनी बोलेरो गाडी होती. त्याला भाडे विचारला त्याने २००० रुपये लोणावळा पर्यंत आणि आंबिवणे पर्यंत १००० रुपये सांगितले. आम्ही त्याला ६००रुपये सांगितले तो १००० रुपये पर्यंत तयार झाला. १००० रुपय १० जनांसाठी ठीक होते पण आम्ही ५ होतो आणि आम्ही त्याला वाटेत तू अजून भाडे पण घे सांगितले पण तो काही तयार होई ना . शेवटी आम्ही विचार केला. आपण पहिलं जेवून घेऊ नंतर विचार करू कसा जायायचा. जेवण झाल्यावर आम्ही आंबवणे पर्यंत चालत जायायचा ठरवल . दुकानावरून पाणी पियुन आणि भरून हि घेतलेलं. आणि रस्त्याने चालू लागलो २ मिनिट चाललो असेल तितक्या एक छोटा मालवाहू (ace rickshaw टेम्पो ) गाडी आली. त्यागाडी वाल्याने आम्हाला प्रत्येकी ५०रुपयात लोणावळल्यालासोडला.
आम्हाला लोणावळ्याला पोहचायला ४.३० वाजले . त्या मिनी रिक्षा ट्रक ने प्रवास करण्याचा अजून एक वेगळा अनुभव घेतला.