वेताळगड
प्रवास वर्णन
सकाळी वेंगुर्ल्याला नाश्ता करून वेताळगड साठी निघालो. वेंगुर्ला ते वेताळगड ३४/३५ किमी आहे.
पायथ्याचं गाव मोगरने. पण पेंडूर हे जवळील मोठे गाव. एक रस्ता नेरूर नाईकवाडी जातो तर दुसरा रस्ता धामापूर वरून तलावाचा बाजूने जातो. आम्ही धामापूर तलावाचा बाजूने गेलो.
तलावाचा बाजूने जाणारा रस्ता जंगलातून जातो असा वाटतो. धामापूरला तलावाकाठी भगवतीदेवी मंदिर खूप सुदंर आहे. पावसाळा किंवा पावसाळ्यानंतर मंदिरातुन तलावाचं सुंदर दृश्य दिसत असेल. आम्ही गडावर जाण्याचा नादात पहायला विसरून गेलो पण तलावाचा बाजूने जाताना पाहिले, तलाव बऱ्यापैकी आठले होते. त्यामुळे आम्हाला ते दृश्य दिसले नसते.
पुढे हा रास्ता मोगरने गावात जातो. गावात रहाट बांव वरून एक रस्ता वर गावात जातो. त्या वाटेने पण जाऊ शकता किंवा त्याअगोदर काही घर लागतात तिथे एक रस्ता वर गावात जाताना दिसतो त्याने हि जाऊ शकता. आम्ही ह्या रस्त्याने गेलो. पाच मिनटात आम्ही वर वाडीत पोहचलो. डांबरी रस्ता जेथे संपतो आणि कच्चा रस्ता लागतो. तिथे एक घर लागते इथून रस्ता वर उजवीकडे वर जाताना दिसतो. आम्ही आमची दुचाकी तिथेच घराजवळ लावून वर त्या रस्त्याने चालू लागलो. पुढे रस्ता कच्चा मातीचा होतो आणि शेवटी जंगलातील वाट चालू होते. घरापासून १० मिनिटात गड माथ्यावर पोहचलो. माथ्यावर पोहचण्याचा अगोदर मध्ये आम्हाला उध्वस्त तटबंदी दिसली.
गड वर्णन
वेताळगड पूर्ण झाडाझुडपाने वेढलेला आहे त्यामुळे आपल्याला गड गावातून दिसत नाही. किंवा गडावरून हि आपल्याला आजूबाजूचा परिसर हि दिसत नाही. गड पठारासारख्या पसरलेला आहे.
गडाचं खास आकर्षण म्हणजे कातळावर कोरलेला वेताळचा चेहरा आणि कोरलेली पावले.
आम्ही मे महिन्यात गेलो असल्यामुळे गवत कमी होत. मुख्य म्हणजे एक संस्थेने माथ्यावर साफ सफाई करून गवत काढल्यामुळे बरेच अवशेषदिसत होते. गडावर दुर्गाचा नकाशा आणि त्यावर कुठे कुठे अवशेष आणि पावलं आहेत दर्शवले होते. त्यामुळे अवशेष शोधणे सोपे झाले. गड माथ्यावर ३ ठिकाणी कातळात कोरलेली पावले होती. तर मुख्य आकर्षण कातळावर कोरलेला मानवी किंवा वेताळाचा चेहरा. तसेच गडावर एक पाण्याचं टाक होते. अजून एक ठिकाणी पाण्याचा टाक्या चा फळक लागला होता. पण तिथे खूपच गवत असल्यामुळे टाक्या दिसल्या नाही.
तसेच एके ठिकाणी बुरुज आणि दरवाजा (बहुतेक उध्वस्त अवस्थेतील असावे) फळक लावला होता, पण तिथे हि गवत जास्त असल्यामूळे काही अवशेष दिसत नव्हते. तसेच माथ्यवर मध्ये एक तटबंदी सारखी भिंत दिसली. एके ठिकाणी तलाव फळक लावला आहे. इथे वरती कातळावर टाकीचा तोडा सारखे चौकोन दिसतात. तसेच बाजूला पाणी वाहून नेहण्यासाठी कातळातील लहान नाळ दिसते.
पूर्ण गड पाहायला आम्हाला दोन तास लागले.
पेंडूर येथील प्राचीन मूर्ती
गड पाहून आम्ही पेंडूर येथील प्राचीन मूर्ती पाहायला गेलो. बहुतेक मुर्त्या ह्या जैन देवतांचा दिसतात काही हिंदू देवतांच्या आहेत. ह्या मूर्ती पाहायला जाताना सातेरी देवी मंदिराच्या बाजूने वाट जाते. ह्या मंदिरात जसा वारूळ असतो तास आत मुख्य गाभाऱ्यात आहे आणि त्यावर देवीचा मुखवटा दिसतो. सातेरी देवी मंदिर समोर वेताळ मंदिर आहे. इथे वेताळ मूर्ती आहे.भरतगड आणि भगवंतगड
पेंडूर वरून पुढे भरतगड आणि भगवंतगडसाठी निघालो. हे दोन्ही गड समोरासमोर आहे, दोन्ही गडाचा मधून कालवली खाडी वाहते. गड नदी इथे पुढे समुद्रात मिळते. दोन्ही गड टेकडीवर. गडाचा भोवतालचा निसर्ग खूप सुंदर आहे.
पेंडूर वरून भरतगड अंतर २३/२४ किमी आहे. जाताना आम्ही पेंडूर-कट्टा-गोलवान-वेरळ-मसुरे-भरतगड गेलो. मालवण पासून १८/१९ किमी तर कणकवली पासून ३१/३५ किमी वर आहे.
भरतगड
मसुरे भरतगडच्या पायथ्याचं गाव. मसुरे गावातून गडाचा दरवाज्यापर्यंत कच्च रस्ता जातो. त्यामुळे आम्ही दुचाकी गाडी पुढ पर्यंत घेऊन गेलो. पण पुढचा रस्ता जास्त खराब वाटल्यामुळे अर्धवट रस्त्यात गाडी लावून पुढे चालत गेलो. पण चारचाकी गाडी वर जाऊ शकते.
गड वर्णन
गडाची तटबंदी आणि बुरुज पाहून कळून येते; गडाची डागडुजी केलेली दिसते. गड ६ते ७ एकर मध्ये पसरलेला आहे. गड माथ्यावर आंबा बाग लागवड केली असल्यामूळे गड माथा पूर्ण मोठं मोठ्या आंब्याचा झाडांनी भरलेला आहे. आणि गडाचा आजूबाजूला हि झाडे झुडपी खूप होती. त्यामुळे गडावरून ठराविक बुरुजावरूनच आजूबाजूचा परिसर दिसत होता. गड माथ्यावर दरवाजाने आत प्रवेश केल्यावर मोकळ्या जागी एक मंदिर आहे. मंदिरात आतील देव आहे ती बघून सप्तमातृका वाटते. पण त्याची पूर्ण पणे झीज झाल्यामुळे नीट कळत नाही. मंदिरा पाठीच १ मजली इमारती सारखे जोत्याचे अवेशष दिसतात.
गडाचा वर्णन करायचा तर गडाची बाहेरून मुख्य तटबंदी आहे आणि मधोमध बाले किल्ला अथवा भुईकोट सारखा आहे. आणि त्यात वाड्याचे अवशेष आहेत. मुख्य तटबंदीला अंदाजे ८/९ बुरुज आहेत.
दुर्ग भरारी साईट वर वाचले होते,"गडाचा मुख्य तटबंदी बाहेर खंदक होते". बहुतेक गडा भवती झाडे झुडपे खूप वाढल्या मुळे आता कळून येत नाही. गडावरती आम्हाला एकही तोफ दिसली नाही.
गड पहायला आम्हाला जास्त वेळ लागला नाही. पण गडावरील आंबा बागेतील आंबे पाहून एक दोन काढून घेतले. त्यामुळे जरा जास्त वेळ लागला.
भरतगड आणि भगवंतगड मधील सुंदर रस्ताच्या प्रवास वर्णन
भरतगड पाहून आम्ही समोरील भगवंतगड साठी गेलो. भगवंत गडावर जायायचा रस्ता खूप सुंदर होतो. एके ठिकाणी आम्ही खाडी पार केली तेथील छोटा पाटबंदऱ्याचा पुलावरून दुचाकी घेऊन गेलो. तिथून खाडीचा दृश्य सुदंर दिसत होते. ह्या पुला वरून फक्त दुचाकीच जाऊ शकते. जर आमच्या कडे चारचाकी गाडी असती तर हाच ५ किमी चा रास्ता १६ ते २१ किमी लांब पडला असता. पण आम्ही ज्या रस्त्याने गेलो. तो रस्ता एकदमच अरुंद होता. तिथे फक्त गाववालेच दुचाकी घेऊन जात असतील. खाडीवरील पूल पार केल्यावर एक रस्ता डावीकडे जातो तर एक उजवीकडे. डावीकडील रास्ता खाडीच्या बाजूने गावात फिरून जातो पण हा रास्ता कच्चा मातीचा आहे. डावीकडील रस्त्याने जाताना पुढे एक छोटा पायवाट सारखा रस्ता गावात जातो. आम्ही ह्या रस्त्याने दुचाकी घेऊन गेलो. ह्या रस्त्याला आम्हाला खाली एक बुरुज आणि तटबंदी दिसली. गावात हि आपल्याला एके ठिकाणी तटबंदी दिसत्ते. बहुतेक त्याकाळी खाडीच्या बाजूने सरंक्षणासाठी गडाची तटबंदी ह्या बाजूला खाली खाडी पर्यंत असावी. पुढे हा रस्ता वाडीत घेऊन जातो. वाडीत मोठा कच्चा रस्ता आहे हा रस्ता पुढे गावाचा बाहेर मुख्य रस्त्याला काढला आहे. काही वेळाने बहुतेक डांबरी होईल.
भगवंतगड
वाडीत जिल्हा परिषद ची शाळा आहे त्याचा बाजूने गडावर जायायला पायऱ्या आहे. हि पूर्ण वाट गडाचा माथ्यापर्यंत जांभा दगडाची आहे. त्यामुळे न चुकता गडावर १०/१५ मिनटात पोहचतो. गड माथा पसरलेला दिसतो. पण मुख्य गड छोटा दिसतो. गड माथ्यावर पोहचल्यावर समोर जांभा दगडाचे मंदिर दिसते. मंदिरात शिळा स्वरूप देव आहे. गडावर तटबंदी, बुरुज, चौथऱ्याचे अवशेष सगळच जांभा दगडाच आहे. बाजूला बहुतेक तुळशी वृंदावन किंवा समाधी असावी. मंदिराच्या बाजूला चौथऱ्याचे अवशेष दिसतात. गडावर जंगल खूप आहे. त्यामुळे काही अवशेष झुडपात दिसतात. मंदिराच्या पाठी गेलो असता एक मोठा मातीचा रस्ता जाताना दिसतो. मंदिराचा पाठी थोड्याच अंतरावर उजवीकडे बुरुज आणि तटबंदी दिसते. इथे गडाचा दरवाजा दिसतो. दरवाजाची चौकट दिसत नाही, पण बुरुजात देवड्या आहेत. झाडी जास्त असल्यामुळे दरवाजाचा जास्त खाली जाता येत नाही.
दरवाजा पाहून आम्ही पुन्हा मातीच्या रस्त्याने चालू लागलो. अजून साधारण ५/१० मिनिटे चाललो असता समोर थोडा उजवीकडे मोठा बुरुज दिसतो. साधारण १०/१५ फूट उंच. अजून काही वर्षां बुरुजाची दुरुस्ती नाही केली; तर अजून काही वर्षांत बुरुज पूर्ण ढासळेल वाटतो. बुरजावरती आणि आजूबाजूला झाडे झुडपे खूप आहेत. बहुतेक हि गडाची तटबंदी अथवा मुख्य दरवाजा असावा. मुख्य गड इथे संपत असावा. कारण ह्याचा पुढे आम्ही रस्त्याने बराच वेळ चालत गेलो, पण आम्हाला काही अवशेष दिसले नाही. हा रस्ता खाली मुख्य रस्त्याला भेटतो. हा रस्ता गावातून बाहेर जो रस्ता येतो तिथे मिळतो. काही वर्षात बहुतेक गडावर मंदिरापर्यंत येण्यासाठी डांबरी रस्ता होईल वाटते.
आम्ही १०/१५ मिनिटे चालून नंतर पुन्हा पाठी फिरलो आणि आल्या वाटेने गड उतार झालो. गड पाहायला १ ते २ तास भरपूर होतात कारण गडावर जास्त अवेशष दिसत नाही. आणि कदाचित गडावरील जंगलात शोधाशोध केली तर क्वचित अजून काही अवशेष मिळू शकतात. असे मला वाटते.
गावातून जाताना आम्ही दुसऱ्या रस्त्याने, गडाचा दुसऱ्या बाजूने बाहेर पडलो. त्यावेळी आम्हाला गडावरून खाली येणारा मातीचा रस्ता दिसला.
पुढे आम्ही आचरा साठी गेलो. भगवंत गड ते आचरा अंतर ८.५ किमी आहे. आम्हाला सुरवातीला आणि मंदिराजवळ विचारत जाईपर्यंत अर्धातास लागला. मंदिरात पोहचेपर्यंत संध्याकाळचे ५.४० वाजले.
असे म्हणतात,आचराला पहिला कोट होता त्या जागी आता मंदिर आहे. हे मंदिर इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा ह्यांचे आहे. मंदिर परिसरात आम्हाला दोन तोफा दिसल्या. दुर्गभरारी ह्यांचा वेब साईट वर ४ आहेत अशी माहिती दिली आहे. मंदिरा समोर विहीर तिथे एक आहे आणि एक अजून कुठे तरी मंदिर परिसरातच आहे. पण आमच्या दोन शोधायच्या राहून गेल्या.
मंदिर सुंदर आहे. मंदिर कौलारू आहे पण मंदिराचा मंडप सादा पण सुंदर दिसतो. मंदिरातील गाभाऱ्यात दगडी खांबावर सुंदर पौराणीक कथेतील तसेच विष्णू अवतार कोरलेले आहेत. मुख्य गाभाऱ्यातील शिव पिंड पाहताच मन प्रसन्न करून जाते. १५/२० मिनटात दर्शन घेऊन, मंदिर पाहून आम्ही सहा वाजता देवगड साठी निघालो.
देवगड येथे मुक्काम
आचरा ते देवगड अंतर कुणकेश्वर मार्ग ३२ किमी होता. जाताना कुणकेश्वर मंदिरात दर्शन घेतले. देवगड पोहचेपर्यंत आम्हाला ८ वाजले. देवगडला आम्हाला राहायला हॉटेल भेटत नव्हते. त्यात कुठचा तरी एका फिल्म शूटिंग वाल्याने पूर्ण २ हॉटेल मध्ये जागा भरल्या होत्या, त्यामुळे दोन तास आम्ही नुसता शोधतच होतो, शेवटी एक घरगुती लॉज १३०० रुपये भाडे देऊन वातानुकूलित खोली मध्ये झोपलो.
दुसऱ्या दिवशी आम्ही देवगड किल्ला, कोटकामते येतील कोट आणि मंदिर, सदानंदगड आणि धुन्दा गड अशी योजना होती. कोटकामठे आचरा वरून १६किमी होते. पण कोटकामते वरून पुढे आम्हाला सदानंदगड आणि धुन्दा गड करायचे होते. त्यामुळे कोटकामते वरून देवगड ला जाऊन पुन्हा सदानंदगड ला यायला पुन्हा पाठी फिरायला लागले असते म्हणून आम्ही देवगडला मुक्कामाला गेलो.
पुढील भागात त्याबद्दल लिहला आहे.























































