Saturday, 1 April 2017

Sankshi fort सांकशीचा किल्ला

सांकशीचा किल्ला

सांकशीच  किल्ला
सांकशीचा ट्रेकचा विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा
https://youtu.be/EPjGRh5CLUs


रायगड जिल्यातील  पेन जवळ हा किल्ला आहे. सांक राजाचा नावावरून सांकशी नाव हया दुर्गला पडले अशी माहिती विकीम्यापियावर दिला आहे. नेट वर बाकी गडाचा इतिहास जास्त काही मिळत नाही. त्याकाळी गडावर पाणीचा साठा मुबलक असावा,  हे गडावरील टाक्या बघितल्यावर लक्षात येते. बाकी गडावर २ चौथऱ्याचे / जोत्याचे अवशेष सापडतात. त्यातला एक,कोणी संवर्धन प्रेमीने  चौथऱ्याच्या /जोत्याचा कोना खोदकाम करुन शोधुन काडलेला दिसतो. ह्यावरून असा अंदाज लावता येउ शकतो येथे शोध कार्यची गरज आहे. तसेच बळावली गावातून गडाचा पायथ्यापर्यंत जंगलातून जाणारी वाट नेहमीचा ट्रेक सारखी न वाटता. आपण गावातल्या रानवाटेने दुसऱ्या गावात चालल्या सारखा वाटते.

मुंबई वरून एका दिवसात किल्ला करता येतो. स्वताची गाडी असेल तर किल्लाचा पायथापर्यत पोहचता येते. नाहितर आमचा सारखा मुंबई वरून लोकलने पनवेलला येऊन. पनवेल वरून कोणतीही पेणला जाणारी ST ने बळवलीला ऊतराव. बळवली गाव मुंबई- गोवा हायवे ला लागते त्यामुळे कुठची हि पेन, अलिबाग किव्हा कोकणात जाणारी गाडी ने हिथे पोहचू शकतात. आम्ही सकाळी ७. ३० ला पनवेलला पोहचलो, तिकडेच नाश्ता करून साधारण ८ ची बोरिवली- रोहा st  पकडली. आम्ही बळावलीला ८. ४५ ला पोहचलो. 

बळवलीला पोहचल्यावर महामार्गावरून एक रस्ता सरळ गावात जातो. ५ मिनिटात तुम्ही गावात पोहचतात . हाच रस्ता  पुढे गावात एका ठिकाणी डावीकडे वळतो. तिकडेच एक मोठा घरे आहे.  त्या घराचा जवळ मुख्य रस्ता डावीकडे वळतो तो रस्ता बृदुद्दिन दर्ग्या पर्यंत म्हणजेच किल्ल्याचा पायथ्या पर्यंत जातो.  आणि एक कच्चा रस्ता सरळ घराचा समोरून जातो. आम्हाला गावातल्याने कच्या रस्त्याने जायायला सांगितले कारण बहुतेक पायी चालत जाणारे बृदुद्दिनचे भक्त ह्या वाटेनेच चालत जातात.


हि वाट जंगलातून जाते. आम्ही ह्या वाटेने चालत तासाभरात गडाचा पायथ्याशी पोहचलो. पायवाट रुळलेली आहे. पण सुरवातीला खाली गावाजवळच मधेच मोठा सुकलेला ओढा लागतो त्याला पार करून जायला लागते. ह्या ओढ्यात आल्यावर, ओढ्यातून उजवीकडे जाऊन सिमेंटचे पाणी अडवण्यासाठी चे छोटे खांब दिसतात.तेथून वर चढावे. ओढ्यामुळे मध्ये रस्ता कळत नाही किव्हा चुकण्याची शक्यता खूप आहे.  पण आम्हाला त्या ठिकाणी गावातले काका भेटले त्यांनी मार्ग दाखवला, त्यामुळे आम्ही न चुकता बरोबर वाटेला लागलो.  हा ओढा पार करून गेलो असता नंतर वाटेत आपल्या डाव्या बाजूला खाली ओढा राहतो. पुढे चढण येते आणि आपण वर एका छोट्या गावात पोहचतो. ओढ्यातला  येवढा भाग सोडला नंतर वाट न चुकता आपल्याला वरील दुसऱ्या गावात घेऊन जाते.
वरील गावात पोहचल्यावर आम्ही थोडी विश्रांती घेऊन पुन्हा पुढे चालू लागलो.  ह्या गावात आम्हाला कोणी व्यक्ती घराचा बाहेर दिसली नाही त्यामुळे गावाचा नाव काय हे विचारायला मला भेटला नाही. ह्या गावात आल्यावर आपल्याला पुढे पठार लागतो आणि सांकशी किल्ल्याच डोंगर दिसतो.


बळवली गावातून जंगलाने वर आल्यावर पहिला हे गाव लागले आणि खालील फोटोत गावातून दिसणारा साक्षी  किल्ला आणि पठारावरून किल्ल्याकडे जाणारी वाट


पठार 


पठार खूप मोठा आणि ओसाड आहे. क्वचितच हाताचा बोटावर मोजता येतील एवढे झाड पठारावर दिसतात.  पठार मोकळा असल्यामुळे गडाचा दिशेने जाताना डाव्या हाताला माणिकगड दिसतो तर पाठी कर्नाळा किल्ला दिसतो. पठारावरून समोर किल्ल्याचा दिशेने चालत राहावे.  आपण सरळ प्रधानवाडी गावात पोहचतो.  प्रधानवाडी  गावात पोहचल्यावर डांबरी रस्ता लागतो. डावीकडे रस्ता दर्ग्याजवळ जातो. गडाचा पायथाला ब्रुदयुदिनचा दर्गा आहे. दर्ग्याजवळून एक वाट गडावर जाते.  आम्हाला गावातल्याने प्रधानवाडीतून एक वाट गडाचा दिशेने जात होती त्या दिशेने जायायला सांगितले. त्यामुळे आम्ही त्या वाटेने गेलो.
गडावर जाणाऱ्या वाटेत झाङेझुडपे असल्यामुळे वाट शोधायला लागते. एक पाण्याचा पाईप गडाचा टाकीवर गेला आहे. त्या पाईपचा बाजूने वाट आपल्याला सापडते.

गडाचा माथ्यावर अर्धा तासात पोहचता येते.  गड चढते वेळी गडाचा कातळात टाक्या खोदलेल्या दिसतात. कातळ चढल्यावर एक वाट कातळातून डाव्याबाजूने वर गडावर जाते, तर उजवीकडे टप्याने टाक्या दिसतात तिकडे घेऊन जाते. कातळात काही ठिकाणी पायऱ्या दिसतात पण बहुतेक पायऱ्या उध्वस्त झाल्या आहे. त्यामुळे काही ठिकाणी कातळावर पाय ठेवून चढायला लागते.

गडाचा कातळ चढण्या अगोदर पहिल्या टप्यातील टाकीचा तोंड दिसत आहे. आणि खालील फोटोत सुरवातीला गडावर जाणाऱ्या पायऱ्या



कातळात तीन टप्प्यात टाक्या आहेत.  टप्पे वर खाली एका वर एक आहेत. ह्या टाक्या बहुतेक कातळाचा आत गुहेत खोदल्या आहेत. त्यामुळे बहुतेक टाकीला गुहे सारखे छोटे किंवा आडवे रुंद तोड दिसते.

पहिल्या टप्यातल्या टाकीचा कातळातला तोंड खालुन दिसते. त्यामुळे ती लगेच नजरेस पडते. हि टाकी खांब टाकी आहे. ह्यात दोन खांब आहे. आणि आत उतरायला पायऱ्या आहेत. टाकीत ढोपरा एवढे पाणी होते. पाणी स्वच्छ दिसत होते. ह्या टाकीचा वर आणि दुसऱ्या टप्प्याचा मध्ये अजून एक बुजलेली कातळाला लागून उघड्यावर बाहेर खोदलेली एक टाकी आहे

पहिला टाकीचा गुहेचा तोंड आणि टाकीतील आतील दृश्य

त्याचावर दुसऱ्या टप्प्यात दोन खांब टाकी आहे. पहिली वाटेच्या बाजूला आहे आणि दुसरी उजवीकडे पुढे कातळात लागते. दुसऱ्या टाकीजवळ पोहचायला कातळावरच वाट आहे म्हणून जपून जायायला लागते. दोन्ही टाकीचे तोंड बाहेरून वर अर्धे उघडे आहे आणि आत खाली गुहे सारखे आहे.  त्यामुळे ह्या टाक्या बाहेरून दिसत नाहीत.  दोन्ही खांब टाकी आहेत. प्राचीन समयी टाकीत आत आणि बाहेर जायायला पायऱ्या असतील.कारण टाकीचा गुहेचा द्वार चढल्यावर टाकी खाली कातळात खोदल्या आहेत.  हे दोन्ही टाकी पाहिल्यावर दिसून येते. पहिल्या टाकीत जायायला तुटकी पायरी लागते, पुढची उजवीकडची टाकी हाताने चडून जायायला लागते, हि टाकी आत मध्ये  २० ते २५ फूट रुंद आहे. आणि १० फूट उंच आहे. सरळ लांब १५ फूट असेल.  पहिल्या टाकीत तळपाय बुडतील येवडा पाणी होता. पण टाकीचा तोंडावर बरेच दगड कोसळल्यामुळे आम्ही खाली उतरलो नाही. आणि दुसरी टाकी पूर्ण सुखलेली होती.
दुसऱ्या टप्प्यातील पहिली टाकचा बाहेरील तोंड खाली टाकीचाच आणि  तोंडावरून काढलेला आतला फोटो 
दुसऱ्या टाकी साठी जाणारी वाट त्या वाटेने येणारा  प्रणव आणि खालील फोटोत दुसरी टाकीचा बाहेरील तोंडावरून काढलेला फोटो 


दोन्ही टाकी बघून झाल्यावर पहिली टाकीचा पायऱ्या चढल्यावर डावीकडे वाट वर जाते.  तिथेच वर एक कातळात देवळी सारखी मोठी  खोलगट जागा आहे.  देवरीचा जवळ गडावर वाट जाते त्या पायऱ्या नसल्यामुळे,  येथून दगडावरून जपून चडून जायायला लागते.  त्या वाटेने अजून थोडे वर आल्यावर आपण उजवीकडे कातळातल्या तिसऱ्या टप्प्यातला टाक्या लागतात.


तिसऱ्या टप्प्यातील पहिल्या तीन टाकी ठराविक अंतरावर बाजूबाजूला आहेत, त्याचा पुढे अजून २ टाकी आहेत, वाट त्यादिशेने  गडाचा कातळाचा शेवटपर्यंत जाते आणि शेवटी डावीकडे फिरते.
पहिली टाकी रिकामी असल्यामूळे  १० ते १५ फूट खोल  आणि बिन खांबाची आहे हे कळलं. पहिल्या ज्या दोन टाक्या लागतात. त्यांचं तोंड लांब रुंद आणि गुहेचा तोंडाची उंची २. ५ ते ३ फूट आहे. त्यामुळे टाक्या बसूनच बघायला लागतात.
त्यात दुसरी आणि तिसरी टाकी बाजूला लागूनच आहेत.
दुसरी टाकीत आत २ खांब आहेत, पाणी भरलेला असल्यामुळे टाकी किती खोल आहे ह्याचा अंदाज मला आला नाही.
तिसऱ्या टाकीचा तोंड गुहे सारखा लहान २ फुटाचा आहे. टाकीचा गुहेचा तोंडावर दोन बाजूला झिजलेल्या आणि थोड्या तुटलेल्या नक्षी दिसतात. बहुतेक दानव चेहरा असल्या सारखे दिसतात. टाकी आत दोन कप्प्यात विभागली आहे . हि टाकी हि पूर्ण भरलेली होती पाणी होते.

तिसऱ्या टप्प्यातील टाक्या बाजू बाजूलाच ठराविक अंतरावर आहेत. आणि बाजूने वाट जाते. लाल बाणाने दाखवल्या आहेत. त्याचा पुढे वाट कातळाचा शेवटी जाते

तिसऱ्या टप्प्यातील पहिली टाकी जवळ एक वाट येते. त्या वाटेने येताना विनय आणि दुसरी डावीकडील वाट गडावर जाते त्या वाटेवर कातळातल्या पायऱ्या दिसत आहे.


तिसऱ्या टाकीचा गुहेचा तोंडावर बाहेर दिसणारी नक्षी आणि आता कातळामुळे कप्पा झाला आहे. तो कातळ फोटोत दिसत आहे
  
येथून पुढे वाट चौथी टाकी कडे जाते. चौथी टाकी उघड्यावरची सुखलेली आहे. चौथ्या टाकीकडून  वाट पुढे डावी कडे वळते.  तिथे हि कातळाला चिकटून उघड्यावरची टाकीचे अवशेष दिसतात. हि टाकी तुटलेली असल्यामुळे ती जागा सपाट दिसते. पण त्याचा पुढेच कडेला,कातळात ३ /४ लोक बसण्यासारखी छोटीशी जागा आहे. आणि बाजूला खाली कातळात गुहेत टाकी आहे. त्या टाकीचा गुहेचा तोंडाजवळ खूप मधमाशा पाण्याजवळ ओलावा साठी फिरत असल्यामुळे आम्हाला टाकी जवळ जात आले नाही. पण ह्या टाकीजवळ उतरायचे असेल तर जरा जपून उतरायला लागेल असे वाटते.
येथून पुढे जायायला वाट नाही, त्यामुळे आम्ही येथून पाठी फिरून पुन्हा तिसऱ्या टप्प्यातील पहिली टाकीजवळ आलो.  येथून बाजूला डावीकडे गडावर वाट जाते त्याने गडावर गेलो.

तिसऱ्या टप्प्यातील उघड्यावरची चौथी टाकी गडाचा कातळाच्या शेवटी आहे आणि त्याचा पुढे वाट डावी कडे वळते आणि एक तुटून सपाट झालेल्या टॉकीजवळ  घेऊन जाते . खालील फोटोत दिसते. 


तुटलेल्या टाकीचा  बाजूला कातळात बसायला जागा केली आहे आणि त्याचा बाजूला खाली गुहेत दुसरी टाकी आहे. गुहेतील टाकी जवळ जपून जायला लागते .माझे मित्र खालील फोटोतील टाकी तेथून पाहत आहे. त्यांचा डाव्या बाजूला बसायला जागा केली आहे 




आम्ही पहिल्या तिन्ही टप्प्यातल्या टाकी बघून गडावर गेलो. 

गडावर वर आल्यावर डावीकडे आणि उजवीकडचा माथ्याला वाट जातात. पण समोर मधेच कातळात उजवीकडे कप्पा केल्या सारखा दिसतो. हा  कप्प्या कशासाठी असावा किंवा येथे काय असावे असा प्रश्न आम्हाला पडला.  समोर पुढे आल्यावर  कातळाच्या टोकावरून खाली बुजलेली टाकी दिसते.  पहिल्या फोटोचा खालील फोटोत  दिसत आहे. प्राचीन समयी ह्या टाकीजवळ जायायला वाट असावी. आता येथे खाली उतरायला काही वाट नाही. 


 
ह्या फोटोत जी बुजलेली टाकी दिसत आहे.  तिला जाण्यासाठी वरील फोटोत जिथे प्रणव आणि विनय जात आहे.  तिकडून प्राचीन समयी वाट असावी. आता येथे खाली उतरायला काही वाट नाही. हे तुम्हाला फोटो बघितल्यावर अंदाज येईल.  


 गडाच्या पठारावरून आणि माथ्यावरून माणिकगड आणि कर्नाळा किल्ला दिसतो. 

आम्ही प्रथम उजिकडचा माथ्यावर गेलो. हिथे मोठा भगवा पताका लावलेला आहे.  हा भगवा मोठा असल्यामुळे आपल्याला पठारावरून चालत येताना दृष्टीस पडतो.  हा भगवा जिथे लावला आहे तिथे वाड्याचा चौथऱ्याचे /जोत्याचे अवशेष दिसतात. पुढे त्याचा खाली, झेंड्याचा बाजूने वरून एक टाकी दिसते. टाकी जवळ खाली गेल्यावर डावीकडे टाकीच्या वर दुर्गप्रेमीने वाडाच्या चौथरा/जोत्याचा कोना शोधून काढलेला दिसतो. आणि उजवीकडे थोडा पुढे अजून एक सुखलेली टाकी आहे.
पुन्हा वर भगव्या जवळ आल्यावर समोरील गावाचे दृश्य दिसते. पुन्हा पाठी फिरून गडाचा दुसऱ्या टोका कडे जायायला लागते. 
गडाचा दुसऱ्या बाजूचा माथ्यावर पाण्याचा टाक्या बाजुबाजुलाच कप्प्यासारख्या कातळात खोदलेल्या दिसतात. आणि त्याचा बाजूला लहान लहान गोल (खोगीर) दिसतात.
पुढे गडाचा डोंगरामध्ये मोठी फट आहे, आणि समोर पुन्हा गडाचा डोंगर लागतो. डोंगराचा पलीकडचा कातळात डावीकडे एक छोटी टाकी दिसते आणि काही पायऱ्या. पण माथ्यावर काही अवशेष आहेत कि नाही माहित नाही. कारण तिथे जाण्यासाठी पुन्हा आल्या त्या वाटे ने खाली उतरून दुसरीकडून चढायला लागेल. आणि नेट वरती  हि कोणी गडाचा डोंगराचा ह्या भागात काही अवशेष आहेत असा उल्लेख आणि फोटोही आढळत नाही. पण ह्याबाजूला गडाचा डोंगर खूप पसरलेला आहे. पण आपण ज्या बाजूला चढतो तिकडेच अवशेष आहेत. अन्यथा कोणी तरी तिकडे गेले असते तर नमूद केले असते. त्यामुळे गड बहुतेक इथेच संपतो. पुन्हा पाठी फिरून आम्ही परतीचा  वाटेला  लागलो.

जाते वेळी आम्ही दर्ग्या जवळून गेलो.  तिकडेच एक जुनी कोणाची तरी मकबरा / समाधी आहे. तिला आता सफेद रंग मारला आहे.  दर्ग्याच्या चिकटूनच बाजूला एक प्राचीन जोत्याचे अवशेष दिसतातं. तो चौथरा/जोता.  जोत्याचे अवशेष पाहिला असता मला मंदिराचा जोता असल्यासारखे वाटले. कारण मशिदीला कधी असे मी जोथे पहिले नाही. आणि वर चढल्यावर एक भाग उंच आणि दुसरा खाली आहे त्यामुळे नक्की येथे काय होते, ह्याचा अंदाज लावता येत नाही.
पुन्हा आम्ही आल्या त्या मार्गाने बळावली गावात गेलो तासाभरात आम्ही महामार्गाला पोहचलो. तिथून आम्हाला लगेच अलिबाग - पनवेल st  मिळाली म्हणून आम्ही ३. ३० पर्यंत पनवेलला पोहचलो.  पनवेल वरून मुंबईला.


झेंड्याचा खाली एक वाट सुखलेल्या टाकी जवळ घेऊन जाते. जी वरून दिसते. आणि त्याचा बाजूला डावीकडे वर वाड्याचा चौथरा / जोथा दिसतो. खालील फोटोत दिसत आहे.
 

खालील टाकीच्या पुढे झेंड्याकडे  वर तोंड केला असता उजवीकडे अजून एक हि टाकी आहे

गडाचा दुसऱ्या माथ्यावरील बाजू बाजूला खोदलेल्या टाक्या आणि खोगीर फोटोत दिसत आहे. आणि एकी कडे दुसऱ्या माथ्यावरचा भगवा दिसत आहे
गड चढायचा (खास करून कातळ चढायला सुरवात करायचा आधी) आधी गडाचा खालील पायवाटेत  एका मोठ्या  झाडाजवळ ह्या चौथरा सारखे अवशेष आहे..हे झाड वाटेतच आहे त्यामुळे येथूनच वाट वर जात. सहजासहजी येथे लक्ष जात नाही त्यामुळे नीट बघायला लागते . आम्ही झाडाचा खाली विश्रांती साठी थांबलो असताना येथे आमची नजर पडली.

पुढे गडाचा डोंगरामध्ये मोठी फट आहे, आणि समोर पुन्हा गडाचा डोंगर लागतो.कातळात डावीकडे एक छोटी बुजलेली टाकी दिसते आणि काही पायऱ्या वर माथ्यावर जाताना  दिसतात. आणि पुढे गडाचा डोंगर पसरलेला दिसत आहे



गडाचा पायथ्याला बृदुद्दिन शाह ची दर्गा आहे त्याचा जवळच हि वास्तू  आहे. बहुतेक हा कोणाचा तरी मकबरा असावा 

मकबराचा पाठील तलाव आणि सांकशी  किल्ल्याचा  डोंगर 
बृदुद्दिन शहाचा  दर्गा आणि दर्ग्याला लागून असलेला जोता हि दिसतो



मुंबई- गोवा महामार्गावरून दिसणारा सांकशी  किल्ला

सांकशीचा ट्रेकचा विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE  लिंक वर क्लिक करा
https://youtu.be/EPjGRh5CLUs