गडावर वाट कशी जाते, पाहण्यासाठी मी बनविलेल्या विडिओची youtube लिंक वर दिली आहे.
तीन-चार वर्षापूर्वी एका ट्रेकिंग ग्रुप बरोबर मी इर्शाळगड ट्रेक केला होता. त्यावेळी हि सप्टेंबर महिन्याचा शेवटी म्हणजेच पावसाळ्या संपल्यानंतर केला होता. आणि आता हि त्याच महिन्यात केला पण मित्रां सोबत. तीन चार वर्षांपूर्वी, मला झालेल्या ऊन्हाचा त्रास तसेच वाटेत आडोसा घेण्यासाठी ठराविक लक्षात राहणारी छोटी मोठी झाडे. आणि गडाचा निमुळता माथा, आणि गडावर विशेष असा ऐतिह्यासिक वास्तू काही आढळत नाही. त्यामुळे मी हा ट्रेक पुन्हा करणार नाही. हे मी त्यावेळीच ठरवलं होता.
पण प्रणव बरोबर कुठच्या किल्ल्यावर जायायचे ठरवत असताना, मी दुसरा टकमक किल्ला सुचवला होता, पण तो हि मी हल्लीच एकट्याने केला होता, हे माझ्या लक्षात राहिले नाही. नंतर मग लक्षात आले. त्यामुळे मीच फसलो, मग काय टकमकला न जाता इर्शाळगडावर ट्रेकिंगसाठी जायायला लागले. त्यात प्रणवने पण हा ट्रेक केला नव्हता.
प्रणवने त्याचा मित्र सुरज बरोबर आधीच हा गड करायचा ठरवलं होता. पण माझा शेवटचा वेळी जायायचा ठरला. त्यामुळे मी दुसरे पर्याय सांगितले पण वर सांगितल्याप्रमाणे मला ह्या गडावर जायायला लागले.
गडावर गेल्यावर लक्षात येते, गड म्हणजे नावाला आहे. मला इर्शाळ गडाचा इतिहास किंवा काही अन्य बाकी गोष्टी बद्दल माहित नाही . पण मी पाहिल्यानंतर मला गडाबद्दल काय अंदाज आला, ते थोडक्यात ह्या विभागात सांगतो. हा दुर्ग पनवेल, कर्जत भागावर लक्ष्यठेवण्यासाठी वापरत असावे. ह्या किल्ल्याला टेहळणीचा किल्ला हि बोलू शकतो . गडावर फक्त पाण्याचा टाकी आहेत, बहुतेक तेथे टेहळणी करण्याऱ्या सैनिकांसाठी पाण्याचा सोयी साठी कातळात खोदल्या असाव्या. तसेही गडाचा उत्तरेला प्रबळगड सारखा मुख्य गड आहे. त्यामुळे येथे बहुतेक फक्त टेहेळणी साठी वापरात असावे. असा माझा अंदाज आहे.
गडावर फक्त पाण्याचा दोन छोट्या टाकी आहेत. बाकी गडाला बुरुज, तटभिंत वगैरे काही दिसत नाही.
इर्शाळगडचा पायथ्याचा गावापर्यंतचा प्रवासाचे वर्णन
ठरल्या प्रमाणे आम्ही तिघे ७ ला पनवेल स्थानकावर भेटलो. तेथून आम्ही पनवेल एसटी डेपोत गेलो. डेपोच्या समोरचा हॉटेल मध्ये नाश्ता केला. नंतर पुन्हा डेपोत येऊन कर्जत एसटीचा वेळ विचारला. पनवेल ते इर्शाळगड अंतर रस्त्याने अंदाजे १५ कमी आहे. कर्जत ला जाणारी ८. १५ ची एसटी होती. त्या एसटी ने आम्ही जुन्या मुबई-पुणे महामार्गावर चौक रेल्वे स्टेशन थांब्याला उतरलो. आम्हाला चौक स्थानकाला पोहचे पर्यंत ८. ४५ वाजले.महामार्गावरून गडाचा पायथ्याचा गावाचा अंतर अंदाजे दोन किलोमीटर आहे. हे अंतर पायी पार करायला २० ते २५ मिनिट लागतात . महामार्गावरून एक रस्ता स्थानकाजवळ जातो. तेथून रेल्वेचा पादचारी पूलने आम्ही पलीकडे गेलो. स्थानकातून बाहेर आल्यावर डावीकडे रस्ता सरळ इर्शाळगडाचा पायथ्याचा गाव नानिवली गावात जातो. रस्ता जिथे संपवतो तिथेच एक सरळ वाट गडावर जाते. त्यामुळे चुकण्याचा काही प्रश्नच येत नाही.
इर्शाळगडला कसे पोहचावे थोड्यकात
मुंबई लोकल ट्रेन ने पनवेलला पोहचावे.
पनवेल वरून कर्जतला जाणारी एसटी पकडावी.
कर्जत एसटी ने चौक रेल्वे स्थानकाला उतरावे.
पनवेल ते इर्शाळगड अंतर रस्त्याने अंदाजे १५ किमी आहे.
गडावर चढायला सुरवात केल्याचे वर्णन
गडावर जाणारी वाट इर्शाळवाडी शिवाय कुठे हि दुसरीकडे वळत नाही, आणि आम्हाला दुसरी वाट दिसली पण नाही. त्यामुळे तुम्ही न चुकता इर्शाळवाडीत पोहचतात. आम्ही नांनिवली गावातून ९. १५ ला चढायला सुरवात केली, आम्हाला इर्शाळवाडीत पोहचायला ११ वाजले. सकाळचा उन हि खूप जाणवत होता आणि गरमी पण होत होती. त्यात आम्हाला पूर्ण गड चढेपर्यंत जरा सुद्धा वारा लागला नाही, त्यामुळे आम्ही बरेच ठिकाणी थांबत थांबत चालत होतो.इर्शाळवाडीत पोहचल्यावर डाव्याबाजूने एक वाट इर्शालकर्णी देवीचा मंदिराजवळ जाते, त्या वाटेने जावे. वाडीत आल्यावर गड दिसत नाही. पण आपल्याला ज्या दिशेला गडाची मोठी लांब सोंड उतरते, त्या दिशेने जायायचा आहे हे लक्षात ठेवावे. इर्शालकर्णी देवीच्या मंदिरजवळूनच वाट पुढे जाते. वाडीतून जरी वाट मिळाली नाही तरी गावातील कोणीही व्यक्ती तुम्हाला सांगेल.
मंदिराजवळून थोडे पुढे गेल्यावर एक ठिकाणी वाट उजवीकडे वर जाते. तिथून पुन्हा फिरून सोंडेचा दिशेने वर वर जाते. सोंडेवरून आपण वर चढायला सुरवात केली कि, सोंडेवर एक ठिकाणी वर आल्यावर गडाचा छोट्या सुळक्याचा कातळ लागतात आणि पहिला एक सुळका हि दिसतो. हा कातळ म्हणजेच मोठी दगडी. बहुतेक ट्रेकर सोंडेवरून सरळ वर कातळावर चढायला लागतात. त्यामुळे ते गडावर पोहचत नाही.
त्यामुळे सोंडेवर जिथे आपल्याला कातळ लागतो किंवा मोठे दगड लागतात, ते सरळ न चढत जाता. जेथे कातळ किंवा दगड लागतात तेथून आपल्या डाव्या बाजूने, गडाच्या दुसऱ्या बाजूला एक वाट जाते. हि वाट गडाचा सुळक्यांचा पायथ्याने सरळ जाते. या वाटेने गडाचा शेवटचा टोकापर्यंत पुढे न जाता, मधेच हि वाट कातळातून वर गडावर जाते. वर जाणारी वाट आपल्याला सहजासहजी दिसत नाही. त्यामुळे नीट लक्ष ठेवावे लागते. नाही तर तुम्ही चुकून पुढे जाऊन शकता. वाट नक्की कुठून वर जाते, हे लक्षात ठेवण्यासाठी जेथे गडाचा नेढा दिसतो किंवा गडाचा मोठा सुळका आणि दुसरा टोकाचा सुळका ह्यांचा मधला भाग आहे, त्या जागेचा खालूनच वाट गडावर जाते. हे लक्षात ठेवलात तर तुम्हाला वाट शोढायला सोपी पडेल.
गडावरील वर्णन
ह्या वाटेने कातळातून वर चढायला सुरवात केल्यावर, आपल्याला पहिली एक छोटी कातळातील टाकी लागते. त्या टाकीचा वरती एका ठिकाणी कातळ चढायला अवघड असल्यामुळे ३ फुटाची छोटी लाकडाची शिडी लावलेली आहे. शिडीचा डाव्या बाजूला एके ठिकाणी काही अंतरावर उघड्यावर एका देवीची पाषाणाची मूर्ती आहे. .ते उघड्यावरील मंदिर प्राचीन दिसत नाही.शिडीने वर चढल्यावर अजून दोन ते तीन ठिकाणी चालून गेल्यावर आपण नेढ्या जवळ पोहचतो. नेढ्या जवळून उजवीकडे एक छोटा सुळका लागतो. त्या सुळक्यावर जायायला कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. पण त्या पायऱ्या झिजलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे ह्या सुळक्यावर चढतेवेळी तसेच विशेष करून उतरतेवेळी सांभाळून जावे. जास्त करून कमी अनुभवी ट्रेकर ने टाळावे. कारण सुळक्यावर बुरुज किंवा प्राचीन खुणा काहीच आढळत नाही.
नेढ्याजवळ आल्यावर नेढ्यातून पलीकडे जाऊन डावीकडे वाट वर मोठ्या सुळक्याजवळ जाते. ह्या वाटेने आपण मोठ्या मुख्य सुळक्याजवळ पोहचतो. मोठ्या सुळक्याचा कातळाजवळ आल्यावर, सुळक्याचा दोन बाजूला जायायला, दोन वाटा लागतात.
डाव्याबाजूचा वाटेने गेल्यावर, थोडा पुढे गेल्यावर आपण कातळावर खोदलेल्या टाकी जवळ पोहचतो. टाकीजवळ जाणारा रस्ता निमुळता असल्याने जपून जावे लागते , तसेच टाकी जवळ बसायला जास्त जागा हि नाही आहे.
टाकीकडील बाजूने आपल्याला प्रभळगड आणि तेथील परिसर दिसतो. आम्ही टाकीजवळ थोडा वेळ आराम करून, जेवून निघालो. टाकी चा वाटेने म्हणजेच सुळक्याचा डाव्या वाटणे पुन्हा पाठी येऊन आम्ही सुळक्याचा उजव्या बाजूला गेलो. सुळक्याला पूर्ण वळसा घालता येत नाही. कारण पूर्ण रिंगण करायला वाट नाही आहे. त्यामुळे पुन्हा एका वाटेने पाठी येऊन. दुसऱ्या बाजूला जायायला लागते.
सुळक्याचा उजव्या बाजूला, म्हणजेच दुसऱ्या बाजूला जुनी वास्तू किंवा पाण्याची टाकी, असे काहीच नाही. कातळात बसण्यासाठी थोडीशी घसरती जागा आहे. पण ह्या बाजूने आपल्याला इर्शाळवाडी, मोरबे धरण, तसेच माथेरानचा डोंगर आणि त्याचा भोवतालीचा परिसर दिसतो.
परतीचा प्रवास
सुळक्याचा दोन्ही बाजू पाहून आम्ही २. ३० वाजता, आलो त्या वाटेने पुन्हा परतीचा प्रवासाला लागलो. आम्ही ४ वाजता गडाचा पायथाचा गाव नानिवलीला पोहचलो. तेथून आम्ही पुन्हा चालत बससाठी महामार्गाचा दिशेने चालू लागलो. पण दमट वातावरण आणि उनामुळे प्रणव एकदमच थकून गेला होता. त्याला आम्ही रस्त्यात दुचाकी वाहनावर पुढे पाठवून दिले. सुरज आणि मी दोघे चालत ४. ३० ला बस स्थानकाजवळ पोहचलो. १५ ते २० मिनीटांनी पनवेल एसटी मिळाली. आम्ही ५. ३० वाजता पनवेलला पोहचलो. ह्या ट्रेक साठी आम्हाला प्रत्येकी १२५ रुपये खर्च आला. अशा प्रकारे आमचा इर्शाळगड झालाhttps://youtu.be/Dsi67boEGOQ
इर्शाळ वाडीतून डावीकडे सोंडेच्या दिशेने गेलो असता. देवीचा मंदिर लागते. |
इर्शाळगडाचा सुळका हिथून दगडाच्या डाव्याबाजूने गडावर जाणारी वाट आहे. त्यामुळे दगडावर सरळ चढत जाऊ नये. त्यामुळे तुम्ही गडाचा वर पोहोचणार |
गडाचा कातळ चढताना लागणारी पहिली टाकी |
गडाच्या दुसऱ्या टोकाच्या माथ्यावरून दुसऱ्या शिखराच्या टोकाचा काढलेला फोटो. |
गडावर वाट कशी जाते, पाहण्यासाठी मी बनविलेल्या विडिओची youtube लिंक वर दिली आहे.