Wednesday, 29 May 2019

बिजापूर /विजयापुर Bijapur

 
 विजयापुर / बिजापूर 

मार्चच्या शनिवारी २३ आणि रविवारी २४ला माझी सुट्टी होती. गेल्या महिन्यातील दोन दिवसाची सुट्टी मी अशीच वाया घालवली पण ह्या वेळी कुठे तरी नक्की जायचं ठरवलं होता. अनेक ट्रेकचा मित्रांना विचारून बघितला कोणी रेंज ट्रेक साठी तयार नव्हता आणि कुठच्याही ग्रुपचा चांगला प्लॅन नव्हता.  मग मी ह्या वेळी बिजापूर/ विजयापुर करायचा ठरवलं.

ठरल्याप्रमाणे मी रात्री ११.४५ ची मुंबई-चेन्नई मेल चा द्वितीय श्रेणीचा शयनायन/स्लिपर तिकीट काढला होता. पण उशिरा कार्यक्रम ठरवून तिकीट काढल्यामुळे वेटिंगचा तिकीट मिळालं. त्यामुळे शेवट पर्यंत टांगती तलवार होती. त्यामुळे गुरुवारी सकाळी वातानुकूलित ३ टियरची तत्काळ तिकीट काढली. मग पहिली तिकीट रद्द केली. संध्याकाळी ९. ३० ची विजयापुरला जाणारी ट्रेन आहे. पण माझ्या कार्यालयाचा निघण्याचा वेळ रात्री ११ नंतर असल्यामुळे माझ्या साठी पाउणेबाराची ट्रेन सोयीस्कर होती. आणि ह्या वेळे मध्ये कुठच्या खाजगी किंवा सरकारी गाड्या हि नव्हत्या. त्यामुळे हीच ट्रेन माझ्यासाठी उत्तम होती. हि ट्रेन सोलापूरला सकाळी ९.३० ला पोहचते तेथून सोलापूर वरून  बिजापूरला जाणारी एसटी किंवा कर्नाटक मंडळाच्या गाडी पकडून बिजापूरला जायच ठरलं. सोलापूर ते बिजापूर अंतर रस्त्याने १०० किमी आहे. साधारण सव्वा दोन ते अडीच तास लागतात.

पहिला दिवस
ट्रेन  सकाळी ९. २० ला सोलापूरला पोहचली. तसाच मी रेल्वे स्थानकाबाहेरून दहा रुपयात शेअर रिक्षा पकडून एसटी डेपोला पोहचलो. मला विनयने सांगितलं होता रेल्वे स्थानकाच्या बाहेर पलीकडून पण गाडी भेटेल पण मी विचार केला आगारला गेलेलं बर.
सोलापूर एसटी आगारात कर्नाटक मंडळाची सोलापूर ते विजयपुरा ९.३० ची एसटी लागली होती. पण कोणच   माणसं आली नव्हती म्हणून वाहकाने गाडी अजून ५ते १० मिनटं जास्तवेळ थांबवली होती. मी गेल्यावर अजून १०/१२ माणसं आली तशी वाहकाने ९. ३८ ला गाडी सोडली. तिकिटाचे ११६ रुपये झाले. बिजापूरला पोहचायला मला १२ वाजले.
ट्रेन मध्ये पूर्ण ना झालेली झोप गाडीच्या प्रवासात पूर्ण झाली.

मुलूक / मुलुख मैदान तोफ आणि उपली  बुरुज
विनयच्या मदतीने कुठे हॉटेल करावं तसा मी दोन दिवस आदीच ऑनलाईन हॉटेल बुकिंग केला होता.
माझ हॉटेल बसवेश्वर रिंगण (सर्कल), बारा कमान  जवळ होता. पण मला विनयने दिलेल्या माहिती नुसार मी विजयापूर बस आगार वरून हॉटेलला न जाता. वॉटर टॅंक बस थांब्याला उतरलो आणि पाहिलं मुल्क मैदान तोफ आणि उपली  बुरुज बघून घेतलं. सोलापूर वरून येणाऱ्या गाड्या वॉटर टॅंक इथूनच बिजापूर मध्ये येतात. त्यामुळे वॉटर टॅक  थांब्याला उतरून, हि दोन्ही ठिकाणे जवळ पडतात. आणि जर मी सरळ हॉटेल मध्ये गेलो असतो तर मला हे दोन ठिकाण बघण्यासाठी परत पाठी यायला लागलं असता. त्यापेक्षा रस्त्यातच हि दोन्ही ठिकाण बघून पुढे जाणं मला बर पडलं.

हि दोन ठिकाण एकमेकांचा जवळ असल्यामुळे लगेच पाहून होतात. पाऊण तासात माझी दोन्ही ठिकाण पाहून झाली. मग तसाच मी शेअर रिक्षाने दहा रुपयात हॉटेल जवळ पोहचलो.

माझा हॉटेल बारा कमानचा एकदम बाजूला होता त्यामुळे मी ते दुसऱ्या दिवशी बघून घ्यायचा ठरवलं.
हॉटेल मध्ये जाऊन अंघोळ वगैरे करून बाहेर पडलो.  माझ्या दोन्ही बुटाचा सोल निघाला होता. ते मोची शिऊण देईपर्यंत १५ते २० मिनटं माझा कडे होती, तो पर्यंत मी जवळच्याच हॉटेल मध्ये जेवण करून घेतलं.

इब्राहिम रोझा मस्जिद
अडीच वाजले होते. मी आता इब्राहिम रोझा पाहायचा ठरवलं. त्या प्रमाणे मी गांधी चौक थांब्यावरून (बसवेश्वर रिंगण किंवा सर्कल जवळच गांधी चौक थांबा येतो ) अथणी रोड वरून जाणारी शहरी बस सेवाची बस पकडून वॉटर टँक बस थांबाच्या पुढचा बस थांबायला उतरलो. मला कुठची बस पकडली आणि नेमका कुठे उत्तरलो ते माहित नाही. कारण सगळ्या बसच्या फलक वर कन्नड मध्ये लिहला होता. त्यामुळे मी वाहकला विचारून चढलो. पण नंतर मी गूगल वर चेक केला असता.  त्या थांब्याला वर्क शॉप स्टॉप म्हणतात. वाहकाने ५ रुपयाची तिकीट दिली. तेथून मी चालत पाच मिनटात इब्राहिम रोझा जवळ पोहचलो.

साठ कबर
इब्राहिम रोझा बघून मी पुन्हा त्या थांब्या जवळ आलो. कारण त्याच रोडला पुढे  २.५ ते ३ किमी वर गूगल मॅप वर  अफझलखानच्या बायकोच्या ६३ कबरीचा ठिकाण दाखवत होता. त्याला साठ कबर बोलतात तिथे. त्या साठी मी आधी बस स्टॅन्ड वर लोकांना विचारून बघितला पण कोणाला काहीच माहित नव्हता.  मग मी रिक्षा वाल्याला विचारला एकाने आधी ८० रुपये सांगितलं. मग मी दुसऱ्याला विचारले त्यांनी पन्नास रुपये सांगितले मग मी त्या रिक्षातून गेलो.
 
रिक्षावाल्याला हि नीट माहित नव्हतं त्यांनी दुसऱ्या रिक्षावाल्याला विचारला. त्यांनी त्याला सांगितलं,अफझलपूर तक्के नाक्यावर रिंग रोडला उजवीकडे जाणारा रस्त्याने जा.  नाक्यापर्यंत तो बरोबर घेऊन गेला. मी माझा गुगल चा नक्षा चालू ठेवला होता. पण नंतर तो सरळ पुढे घेऊन जाऊ लागला. मी त्याला सांगितलं " तू चुकतो आहे " तरी पण तो बरोबर जातो आहे बोलत होता.  मला कळलं हा मला त्या रस्त्याने अफझलखान च्या स्मारक जवळ घेऊन चालला होता. कारण गूगल  नक्षा वर पण  मला त्याचीच दिशा दाखवत होता.

शेवटी मी त्याला थांबवलं. आणि कोणाला तरी विचारायला सांगितलं. मग कोणी तरी सांगितलं येथे नाही तिथे आहे. त्या जागी घेऊन जायायला रिक्षा वाला माझ्याकडे  आता ५० चे १०० रुपये मागू लागला. मी त्याला ७० मध्ये तयार केले आणि नक्षा नुसार चालायला सांगितलं. त्या नुसार तो गल्लीतून रिक्षा काडत होता. पण मध्येच निमुळता कच्चा रस्त लागायचा.  तेथील लोकांना विचारला ते म्हणत असा जा पण नक्की वाट सापडेना. मग शेवटी मी रिक्षावाल्याला बोललो जाऊदे मुख्य रस्त्याला येऊ आणि मग तू मला महामार्गावर बाहेर सोड आणि जा. आम्ही गल्लीतून बाहेर पडून रस्त्याला आलो आणि महामार्गाकडे चाललो होते. तेव्हा मला नकाशावर वर साठ कबरला जाणारा रस्ता पुढे दाखवू लागला.  पुन्हा मी  रिक्षावाल्याला  त्या रस्त्याला घ्यायला सांगितले, तो हि तयार झाला.  आणि त्याला हि आठवूं लागला बहुतेक तो पूर्वी  कधी तरी तेथे आला होता. मग आम्ही नक्षाप्रमाणे बरोबर त्या ठिकाणावर पोहचलो.

तेथे जातेवेळी मला महामार्ग जवळ दिसला, त्यामुळे मी विचार केला जाते वेळी महामार्गावर पोहचल्यावर कुठची तरी बस मिळेलच. मग मी रिक्षावाल्याला थांबायला सांगितले नाही.

जिथपर्यंत पक्का रस्ता जातो तिथपर्यंत रिक्षा घेऊन गेलो. नंतर पुढे पायवाट लागते. त्यावाटेने चालत ५ मिनटात आपण त्या स्थळावर पोहचतो. ह्या पायवाटेत मध्येच एक मोठा दरवाजा सारखी एक वास्तू /कमान लागते. त्याचा बाजूला तारेचं कुंपण असल्यामुळे मला पलीकडे जाता आलं नाही. आणि समोरून चढता येत नाही कारण त्याचा पायथा / चौथरा खूप उंच होता.
कबरी आत गावात असल्यामुळे शोधत पोहचेपर्यंत मला पाऊणे पाच वाजले. एक जण त्याचा लोखंडी दरवाजाला टाळा लावत होता. पण मी आलो म्हणून थांबला. पण नंतर मी त्याला जायाला सांगितले. कारण जागेला केवळ पुढून लोखंडाच कुंपण होता, पाठी अजून काही तरी काम चालू असल्यामुळे कुंपण नव्हतं. पण मला वाटत पुढच्यावर्षी पर्यंत त्या पूर्ण जागेला चारी बाजूने लोखंडी खांब आणि भिंतीचा कुंपण असेल.
आणि वेळेत चालू अथवा बंद होईल.
तेथे ६३ कबरी होत्या,  त्याचा पाठी अजून एक तुटलेली वास्तू आहे. त्यातील माती काढायचा काम चालू आहे. ते पूर्ण झाल्यावर ती पूर्ण वास्तू नक्की काय आहे ते कळेल.
त्या कबर बघून पुन्हा मी गावातून चालत अथणी किंवा तिकोटा -बिजापूर महामार्गावर गेलो. तेथे बस थांब्यावर पोहचलो. त्या बस थांब्याला मारुती कॉलोनी म्हणतात . तेथून गांधी चौक पर्यंत माझी ६ रुपये तिकीट घेतली.

( तरी अथणी रोडलाच अफझलपूर तक्के पासून पुढे अजून ३ते ३.५ किमी वर असलेला माझं संगीत नारी महाल मला माहित नसल्यामुळे करायचा राहील आहे.  तिथं पर्यंत बस जाते का नाही मला माहित नाही बहुतेक जात असावी. पण रिक्षाने जाऊ शकता पण जरा जास्त पैसे घेतील.)

गगन महाल
पाऊणे सहाला मी पुन्हा गांधी चौकीला पोहचलो. मग तेथून जवळ असलेल्या गगन महाल पाहून घेतला. सहा वाजता ते बंद होत. पण तेथे मुख्य एकच ती महलची वास्तू असल्यामुळे माझा १५ तें २० मिनटात पाहून झाले. त्या नंतर चौकीदार सगळ्यांना बाहेर काढू लागला. तो पर्यंत सव्वा सहा झाले. मग त्याचा समोर अजून एक वास्तू  आहे त्याला आनंद महाल बोलतात. बहुतेक तेथे आता महाविद्यालय हि चालत. पण त्या वास्तूत जास्त काही बघण्यासारखा नाही. ते पाहून, नंतर मी तेथील आसपासचा परिसर पाहत होता. ते पाहून नंतर मी हॉटेल वर गेलो.
थोडा आराम करून रात्री जेवून झोपलो. अश्या प्रकारे माझा पहिला दिवस संपला.

दुसरा दिवस
दुसऱ्या दिवशी मला खूप ठिकाणी फिरायचा होता. म्हणून सकाळी साडेसात ला उठून रस्त्यावर असलेल्या गाडी वर चहा बिस्कीट खाऊन सव्वा आठ किंवा साडे आठ चा सुमारास फिरायला सुरवात केली. 

असर महाल
मी पहिला असर महालला चालत गेलो. असे सांगण्यात येते असार महालला आदिल शाह न्याय निवाडे करत असे. असार महालला दोन बाजूने प्रवेश करू शकतात. एक मुख्य रस्त्यावरून डॉ आंबेडकर मैदान चा समोरून तर दुसरा पाठी असलेल्या वस्तीतून आहे. मला माहित नव्हता त्यामुळे मी हॉटेल पासून चालत पाठच्या रस्त्याने वस्तीच्या दरवाजाने प्रवेश केला. ह्या रस्त्याने येताना असर महालच्या पाठची लागून असलेली वास्तू  दिसते. त्याचा भिंतीचा मोठ्या कमानी खालून रस्ता गेला आहे. तो बघायला सुंदर वाटतो. ते नक्की पाहून घ्यावे.  त्याचा भिंतीचा कुंपण आणि कचऱ्यामुळे तेथे वर जाता येत नाही. त्याचा मी फोटो खाली अपलोड केला आहे.

बारा कमान
असर महाल पाहून मी पुन्हा हॉटेल मध्ये आलो आणि दिवसाचं महत्वाच काम करून घेतला. आणि मग हॉटेल मधून बाजूलाच असलेला बारा कमान पाहून घेतला. बारा कमान सकाळी ८/९ ला उघडत आणि संध्याकाळी ६ ला बंद होत. पंधरा ते वीस मिनटात माझं बारा कमान पाहून झाल. मग तसाच मी हॉटेल मधला सामान घेतला आणि सकाळी दहाला शेवटचा हॉटेल सोडला (चेक आऊट) केला. आणि तेथून मी ताज बावडी साठी गेलो.

ताज बावडी आणि जोडगुमाज
ताज बावडी आणि जोडगुमाज ला जाण्यासाठी KSRTC च्या डेपो पासून जवळ आहे. जोड गुमाज तर चालत पाच मिनिटावर आहे. त्याचा पुढे अजून पाच मिनिट चालत गेलो तर पुढे ताज बावडी आहे. हि दोन्ही ठिकाणे घनदाट वस्तीत असल्यामुळे तिथे बहुतेक शेअर रिक्षा हि जातात. ताज बावडीच्या गल्लीतून एकाद दुसरी बस पण मी जाताना बघितली. नक्कीच बसने ५ रुपये तिकीट असेल. 
पण मला माहित नसल्यामुळे मी बसवेश्वर सर्कल जवळून रिक्षा केली. एकाने मला ६० सांगितले दुसऱ्याला शेवटी चाळीस रुपये देऊ केले आणि नेले. तस बघायला गेलं तर ते अंतर जास्ती जास्त १ते सव्वा किमी असेल. पाच  ५ मिनटात रिक्षाने पोहचतो. जर मीटर वर रिक्षाने गेलो असतो तर माझं २० रुपयात काम झाल असता. बहुतेक मला अंतर लांब वाटावं म्हणून रिक्षावाल्याने मला जरा फिरवूनच नेला. नक्षा वर मला दिसत आहे तरी पण साहेब मला सांगतात इथून जवळ आहे.
ताज बावडी वर गेलो तर ताज बावडीचा लोखंडी दरवाजा बंद होता. आता बहुतेक कोणाला आत जाऊन देत नाही. तेथे कन्नड मध्ये माहिती लावली होती. त्याचा वर लिहिलेल्या इंग्लिश १०००० रुपयाचा आकड्या वरून तेथे आत गेल्यास दहा हजाराचा दंड असावा, असा मला अंदाज आला. मग दरवाजा बाहेरूनच फोटो काढून तेथून निघालो.  तेथे बसलेल्या लोकांना जामिया मस्जिदला कसा जायायचा विचारला. त्यांनी मला तेथून शेअर रिक्षा जातात सांगितलं. 

 मी ताज बावडी बघून बाजूलाच पाच मिनिटावर असलेल्या जोड गुमाज बघायला चालत गेलो. जोडगुमाज  म्हणजे दोन कबरी बाजू बाजूला आहे त्याला म्हणतात. मला आत जायायला भेटला नाही कारण गुमाजचा आत असलेल्या कबरीच्या आता मस्जिद केली आहे. त्यात मी आत जाते वेळी एक बाई बाहेर आली तिने रागाने सांगितले "फुल पॅन्ट पहेनके अंदर जाते हैं". मग मी बाहेरूनच बघून तेथून निघून गेलो.

मला आता लांडा कसाब तोफ आणि जामिया मस्जिद बघ्याची होती. मी गुगल नक्षा वर पहिला होता. तोफ आणि मस्जिद वेगळ्या दिशेला आहेत. मस्जिद जवळून गोल गुमाज जवळ आहे. आणि गोलगुमाज मला शेवटी करायचा होता. म्हणून मी पहिली तोफ बघायला गेलो.

लांडा कसाब तोफ
जोड गुमाज कडून मी चालत ५ मिनटात KSRTC बस आगार मध्ये गेलो. बस आगारचा समोरून मी रिक्षावाल्याला लांडा कसाब तोफेचा विचारला पण कोणाला माहित नव्हतं. मग मला नक्षा वर त्याचा जवळ बिजापूर RTO कार्यालय दिसला. मग मला RTO पर्यंत शेअर रिक्षा भेटली. दहा रुपयात त्यांनी मला बरोबर  RTO जवळ सोडला.  RTO चा बाजूलाच आपल्याला रस्त्याला तटबंदी आणि बुरुज दिसतो. तट बंदीची भिंतीला छेदुनच  रस्ता आला आहे. रस्त्याला उतरल्यावर डावीकडे एक बुरुज आणि तुटलेली तटबंदी दिसते. त्या बुरुजावर ती लांडा कसाब तोफ आहे. तोफ उघडयावर दुर्लक्षित पडून आहे.  बुरुजाचा तटबंदीवर खूप कचरा हि पडला होता. आदिल शहाचा काळात काही मोठ्या तोफ होत्या.  त्यात पहिली मुलुख ए मैदान आणि लांडा कसाब तोफ हि त्या मोठे तोफे मधली एक महत्वाची होती. 

जामिया मस्जिद
तोफ बघून मला आता जामिया मस्जिदला जायायचें होते.  त्यासाठी मला तेथून थेट शेअर रिक्षा नाही मिळत कळलं. त्यासाठी पहिला RTO बिजापूर ते  बागलकोट क्रॉस पर्यंत शेअर रिक्षाने तेथून पुढे जामिया मस्जिद साठी शेअर रिक्षा पकडायची. प्रत्येकी १० रुपये घेतात.

गोलगुमाज/ गोलघुमट
जामिया मस्जिद मध्ये पोहचेपर्यंत ११.१५ पर्यंत पोहचलो. मस्जिद बघून मी ११. ४० ला तेथून १० रुपयात शेअर रिक्षा पकडून ५ मिनटात गोल गुमाजला पोहचलो.

गोलगुमजला पोहचेपर्यंत पाऊणे बारा वाजले होते. आत गेल्यावर फिरायला वेळ लागेल आणि खायायला हि भेटणार नाही. म्हणून मी जेवून घेतलं. आणि मग गोलघुमट/गोलगुमाज पहायला गेलो.

गोलगुमाज पाहण्याची वेळ सकाळी ६ ते  सायंकाळी ५. ४५ पर्यंत आहे. सतराव्या शतकातील अली आदिल शहाच्या ह्या कबरीचा म्हणजेच गोलघुमटचा घुमट जगातील सगळ्यात मोठा आहे. गोलघुमटच्या पुढील वास्तूत संग्रहालय आहे. मी पहिला गोल घुमट पाहून घेतलं नंतर संग्रहालय. घुमट पाहायला मला दिड तास लागला. आणि संग्रहाला बघायला अर्धा ते पाऊण लागला. चार वाजले मग मी तासभर तेथील उद्यानात विश्रांती घेतली. आणि निघालो.

तेथूनच जवळ शंकराची मोठी मूर्ती आहे ते मला माहित नव्हता, नाही तर मी ते हि बघून आलो असतो. कारण माझी रात्री ९ ची मुंबई साठी बस होती. मग तो पर्यंत मी असाच जवळच्याच बाजारात फिरत होतो.
अश्या प्रकारे माझी बिजापूरची यात्रा संपन्न झाली. मला एकूण रुपये ४२७० खर्च आला. त्यातील माझा फक्त मुंबई ते विजापूर येऊन जाऊनच प्रवासाचा खर्च रुपये २३०० झाला.


मुलुख ए मैदान तोफ

उपली  बुरुज
इब्राहिम ए रोझा
साठ कबर (अफझलखानचा ६३ बायकोची कबर ) आणि खालील फोटोत कंबर च्या पाठी असलेली वास्तू

साठ कबर  कडे जाते वेळी लागणारा  दरवाजा किंवा अन्य काही
गगन महाल
आनंद महाल
असर महालाच्या पाठच्या दरवाजाने लागणारा किल्ल्याचा भाग
असर महाल
बारा कमान
ताज बावडी
जोड गुमाझ
लांडा कसाब तोफ
जामिया मस्जिद
गोलगुमझ /गोलघुमट