जालना, बुलढाणा १
भाग १
भोकरदन तुकाई लेणी व चक्रधर स्वामी मंदिर, चांडोळ मधील मंदिर, साकेगावच शिव मंदिर
सध्या बिनकामाचा असल्यामुळे कुठे तरी आठवडाभर जाऊन
येण्याचा विचार आला. म्हणून मग सागर सोबत बोललो आणि त्यांनी बुलढाणा, जालना
जिल्ह्यातील प्राचीन मंदिर, मूर्ती, गडी आणि बारवची योजना केली. सगळी
त्याचीच योजना मी फक्त जायचा काम केलं. दिवाळीनंतर १७ ते २१ नोव्हेंबर
तारीख ठरवली.
त्याप्रमाणे
येण्याजाण्याची ट्रेनची तिकीट काढली. पण एसटीचा संप मिटला नव्हता मग काय
करायचं. म्हणून मग सागरने औरंगाबाद मध्ये भाड्याने दुचाकी भेटतात त्याचा
नंबर काढला, आणि आम्ही ५ दिवसासाठी औरंगाबाद ते औरंगाबाद असे २००० रुपये देऊन दिवसाला 120 कि.मीचा
हिशोबाने दुचाकी (बाईक) घेतली. पण पहिल्याच दिवशी
दुचाकीच्या बॅटरीला आलेल्या खराबी मुळे त्याचं धंद्याच नाव खराब होऊ नये
म्हणून त्यांनी आमच्या सांगण्या नुसार जालनाल्या येऊन त्याची दुचाकी
घेतली.
आम्ही जाते वेळी
औरंगाबाद आणि येते वेळी जालना वरुन तिकीट काढली होती. आमचा प्रवास मध्ये
पहिल्या दिवशी भोकरदन मधील तुलाई लेणी, श्रीचक्रधर स्वामी मंदिर, चांडोळ मधील नृसिंह आणि खोल महादेव, तसेच साकेगाव येथील शिवमंदिर.
दुसर्या दिवशी चिखली जवळील सतगाव-भुसरी येथील शिव मंदिर, तेथून धोत्रानंदाई येथील ३ प्राचीन मंदिर आणि बारव, आणि बीबी येथील गडी पाहून लोणार येथे मुक्काम.
तिसर्या दिवशी मेहकर येथील बालाजी, नृसिंह स्वामी मंदिर, नृसिंह मूर्ती भेटली ती गुहा आणि इतर दोन प्राचीन मुर्ती. पुन्हा लोणारला येऊन परडा येथील मल्लिकार्जुन शिव मंदिर आणि उसवद येथील व्यंकेश्वर महादेव मंदिर करुन पुन्हा लोणार मुक्कामी.
पहिल्या दिवशी भोकरदन मधील तुलाई लेणी, श्रीचक्रधर स्वामी मंदिर, चांडोळ मधील नृसिंह आणि खोल महादेव, तसेच साकेगाव येथील शिवमंदिर.
दुसर्या दिवशी चिखली जवळील सतगाव-भुसरी येथील शिव मंदिर, तेथून धोत्रानंदाई येथील ३ प्राचीन मंदिर आणि बारव, आणि बीबी येथील गडी पाहून लोणार येथे मुक्काम.
तिसर्या दिवशी मेहकर येथील बालाजी, नृसिंह स्वामी मंदिर, नृसिंह मूर्ती भेटली ती गुहा आणि इतर दोन प्राचीन मुर्ती. पुन्हा लोणारला येऊन परडा येथील मल्लिकार्जुन शिव मंदिर आणि उसवद येथील व्यंकेश्वर महादेव मंदिर करुन पुन्हा लोणार मुक्कामी.
चौथ्या दिवशी लोणार सरोवर
आणि तेथील मंदिर, बारव पाहून सिंदखेडराजा मुक्कामी.
पाचव्या दिवशी
देऊळगावराजा येथील बारव, गडी आणि सिंदखेडराजा येथील अवशेष पाहून दुपारी
जालना साठी रवाना होऊन. जालना मधील दोन दरवाजे, मस्तगड, आणि एका मंदिरातील
प्राचीन मुर्ती पाहून संध्याकाळी मुंबई साठी ट्रेन पकडली. अशी योजना सागर
ने आखली होती.
१६
नोव्हेंबरला आम्ही रात्री ९.३० ची मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस
पकडली, सकाळी ४.१५ ला आम्ही औरंगाबादला पोहचलो. आम्हाला साडे पाच वाजता सिडको चौकातुन
बाइक घ्यायची होती. मग तोवर आम्ही स्थानकात थांबून चहा-नाश्ता करुन, सिडकोला शेअर रिक्षाने ६० रुपयात पोहचलो. बाइक वाल्याचे पेपर
वाचून आणि सही करून पेट्रोल भरून आम्ही ६.३० वाजता भोकरदन साठी प्रवास सुरू
केला.
पहिला दिवस
भोकरदन लेणी आणि चक्रधर स्वामी मंदिर
आम्ही
औरंगाबाद वरुन सिलोड मार्गे भोकरदनला पोहचलो. साधारणपणे ८० कि.मी चा
मार्ग आम्ही अडीच तासात थोडे थांबत चहा नाश्ता करत पोहचलो. भोकरदनच्या
मुख्य रस्त्यापासून तुकाई लेणी/ गुहा २ कि.मी आत गावात आहे. लेणी नदीच्या
शेजारी आहे आणि थोडी गावाचा बाहेरच आहे. लेणी मंदिराच्या पाठी मागेच आहे.
आम्ही पहिला लेणी पहायला गेलो.
भोकरदन / तुकाई लेणी
यावेळी पाऊस जास्त
दिवस होता, त्यामुळे गुहेतील पाणी पुर्णपणे उतरले नव्हते. आम्ही पायर्या
उतरून खाली गेलो. आमच्या पायाचे तळवे पूर्ण बुडलेले होते, त्यात शेवाळ ही
झाले होते. त्यामुळे जपून पाय ठेवत आम्ही आत गेलो.
लेण्यांमध्ये मुख्य ७कक्षा आहेत. कक्षेच्या आत काही शिल्प दिसत नव्हती पण त्याचा बाहेरील
आजूबाजूच्या कातळावर सुंदर शिल्प कोरलेले आहेत. प्रत्येक कक्षेच्या दारावर
द्वारपाल सारखे, भंग झालेले शिल्प दिसतात.
पण बहुतेक शिल्पांची झिज झाली आहेत, तर काही तुटली आहेत. त्यामुळे बरेच शिल्प ओळखता
येत नाहीत. पण एक मोठा शेषशाहीचा विष्णूचा भंगलेला शिल्प ओळखता येते.पण
त्या समोरील भिंतीवरील तीन मोठे कातळ शिल्प आम्हाला नीट ओळखता नाही आले. लेणी/
गुहेची आणि मंदिराच्या फोटो शेवटी ठेवले आहे.
चक्रधर स्वामी मंदिर
लेणी बघून आम्ही चक्रधर स्वामी मंदिर
बघायला गेलो. मंदिराचा अर्धा/पायथाचा भाग प्राचीन दिसतो, त्याचावर नवीन बांधकाम
केलेले दिसते. मंदिराच्या आतील गाभाऱ्याचे खांब प्राचीन आहेत त्यावर
रामायणाचे, भीमाच, महिषारसुर्मार्दिनीचे आणि काही युद्धाची शिल्प आहेत. मंदिराच्या मुख्य मूर्ती जागी चक्रधर स्वामी पंतांच्या लोकांची शीला रुपी मूर्ती आहेत. नेहमी सारखे मंदिर बाहेर
खांबाचे आणि इतर मंदिराचे अवशेष दिसले. मंदिर बघून आम्ही चांडोळ साठी निघालो.
चांडोळचा नृसिंह मंदिर आणि खोल महादेव
भोकरदन ते चांडोल, म्हसळा मार्गे ३५ कि.मी आहे. आम्ही एका तासात पोहचलो. आमची दुचाकी खराब झाल्यामुळे आमचा १ तास भोकरदनलाच वाया गेला. त्यामुळे चांडोलला पोहोचायला आम्हाला दुपार झाली.
चांडोलला
नृसिंह मंदिर आणि खोल महादेव हि दोन मुख्य प्राचीन मंदिर आजूबाजूलाच
आहेत.त्यामुळे गावाने त्या पूर्ण परिसराला भिंतीचा कुंपण केला आहे.
त्याव्यतिरिक्त अजून एक छोट महादेवाचे मंदिर हि गावात आहे. आम्ही गावात विचारत विचारत नृसिंह मंदिर/खोल महादेव मंदिराजवळ पोहचलो.
नृसिंह मंदिर
नृसिंह
मंदिर गाभाऱ्यात कोरीव आणि रेखीव शिल्प बघायला मिळत नाही. पण मंदिर
परिसरात आढळणाऱ्या खांबाच्या अवशेष वरून, कदाचित नृसिंह किंवा खोल
मंदिराच्या खांबाचे ते अवशेष असावे असे वाटते. नृसिंह मंदिरात प्रवेश
केल्यावर, आपल्याला समोर मुख्य गर्भगृहात नृसिंहची सध्याचा काळातील मूर्ती
दिसते. मध्य गाभाऱ्यात उभे राहिले असता उजवीकडे आणि डावीकडे पण गर्भगृह
आहेत. त्यात डावीकडील गर्भगृहात शिवाची पिंड होती तर उजवीकडील रिकामी होते.
मंदिराच्या मुख्य दाराच्या उजव्याबाजुला एका दगडावर विशेष करुन ९ आडव्या
आणि ५ उभ्या ओळीत वेग वेगळ देवाच्या मूर्त्या दिसतात, त्यातील पाचवी ओळ
मध्ये खाली १३ शिवाची पिंड दिसतात. पण गावकऱ्याने त्याला रंग मारल्यामुळे
त्यातील काही देवता ओळखता येत नव्हत्या. (त्याचे फोटो चांडोळ च्या फोटो मध्ये दिला
आहे.) आणि दरवाज्याचा डाव्याबाजूला एक देवाचं शिल्प दिसते, झीज झाल्यामुळे
स्पष्ट दिसत नव्हते.
बहुतेक शिवाचे असावे.
नृसिंह मंदिराला चिटकूनच बाजूला उजवीकडे विठ्ठल रखूमाईचा नवीन बांधलेले
मंदिर आहे. त्यात प्राचीन मुर्ती किंवा काही अवशेष आम्हाला दिसले नाही.
नृसिंह मंदिराचा समोर बाहेर झाडाखाली १ चांगली तर २ भंग अवस्थेत जैन
मूर्ती आहे. तसेच काही खांबचे अवशेष हि आहेत.
खोल महादेव मंदिर
तिथून आम्ही बाजूचा खोल महादेव मंदिर बघायाला गेलो. खोल महादेव मंदिर लहान
आहे. मंदिरातील शिवाची पिंडाचे दर्शन घेण्यासाठी, आत खाली काही पायर्या
उतरून जायला लागते. बहुतेक म्हणुनच वाटत खोल महादेव मंदिर
बोलतात.मंदिराच्या वरील अर्ध काम विटांचे सध्याचा काळातील केलेले दिसते.
मंदिराच्या समोर प्राचीन भंग झालेला नंदी आणि समोरील परिसरात एका मंदिराचा अवशेषावर २ कामशिल्प (हे दोन शिल्प बहुतेक मंदिराचा बाहेरील असलेल्या अर्ध्या भिंतीवरील भाग वाटतो) आणि काही मंदिराचे अवशेष दिसतात. आम्हाला तेथील तरुण गावकऱ्याने
सांगितले अजून एक असंच प्राचीन मंदिर गावातच आहे. म्हणून आम्ही ते बघायला
गेलो.
अजून एक प्राचीन शिव मंदिर (गडीच महादेव मंदिर)
बाईकमुळे आम्ही गल्लीतून विचारत तेथे दोन मिनटात पोहचलो. तरी पण हे
मंदिर एका घराच्या पाठी होते, त्यामुळे आम्हाला एका गावकऱ्याने सोबत येऊन
दाखवले. मंदिर शिवाचं
होत. मंदिर पाषाण बांधणीतील दिसत होते. कळसाच काम नव्याने विटाने
बांधलेले आहे. मंदिराचा गर्भगृहाच्या दरवाजाची चौकट नेहमीच्या प्राचीन
मंदिरा सारखे सुरेख होती. मंदिराच्या बाहेर भंगलेली गणेश मूर्ती आणि नंदी,
आणि एक झीज झालेली मूर्ती होती. मंदिराच्या मुख्य बांधकाम व्यतिरिक
मंदिराच्या भोवती चिखली भिंतीचे मंडपाचे काम असावे, असे तिथे पाहता क्षणी वाटते.
बाकी मंदिराच्या समोर मोकळ्या जागेत, एक छोट पत्र्याचा छपराचे मंदिर आहे.
त्यात एक रंग मारलेली वीरगळ आणि काही अन्य देव दिसतात. रंग मारल्यामुळे वीरगळ प्राचीन आहे का नवीन कळत नव्हते. बाकी अजून काही अवशेष
दिसत नाही. मंदिर पाहून येताना गल्ली मध्ये त्याकाळातील दगडी घर दिसतात तर
काहींचे अवशेष दिसतात. तर काही आता त्यावर सुधारून नवीन बांधताना दिसतात.
अजून काही वर्षात बहुतेक नष्ट होतील.
साकेगावच शिव मंदिर
चांडोळ गावातील मंदिर बघून आम्ही चिखली साठी निघालो. चिखलीला जाताना वाटेत आम्हाला साकेगाव मधील प्राचीन शिव मंदिर बघायचा होता. साकेगाव पासून चिखली पुढे चार किमी आहे. त्यासाठी आम्ही चांडोळ वरून रुईखेड मार्गे चिखलीला गेलो, साधारण ३१ किमी अंतर होते. तसेच चांडोळ ते रुईखेड रस्ता बऱ्यापैकी कच्चा होता, पण आम्हाला गावातले म्हणाले हा रस्त्याने लवकर पोहचाल. म्हणून आम्ही तिथून गेलो. अंदाजे साडे तीन वाजता, आम्ही चांडोळ वरुन निघालो. साकेगाव मंदिरापर्यंत पोहचेपर्यंत आम्हाला साडे चार वाजले.
मंदिर
परिसरात गेलो ना गेलो तिथे देखभाल करणाऱ्या ताई घरी जाता जाता, आमच्या बॅग
बघून बोलल्या मोठ्या कॅमेर्या (dslr) ने फोटो काढू नका मोबाईलने काढा.
त्या ताई मंदिराच्या परिसरातून बाहेर जाताना, दृष्टी आड होई पर्यंत आम्ही
कॅमेरा काढतो का बघत होत्या. त्या काय परत आल्या नाही, पण मग आम्ही पण उगाच
बघितल तर चार शब्द ऐकायला नको म्हणून कॅमेरा काढला नाही. आधीच ऐकूनच हिरमोड
झाला होता. मग काय नुसता बॅग ठेवुन मंदिर बघत होतो.
मंदिर
सुस्थितीत दिसत होता. आत मध्ये काळोख होता. बहुतेक आत मध्ये वीज नव्हती.
मंदिर शिवाच आहे. गर्भ गाभाऱ्यात शिवलिंग होते, तिथे लावलेल्या दिव्या मुळे
थोडा काही प्रकाश होता.
मंदिराच्या गाभाऱ्यात एक
मूर्ती होती पण थोडी झीज झालेली दिसत होती. इतर मंदिरात काळोख असल्यामुळे
जास्त शिल्प दिसत नव्हती बहुतेक नव्हतीच. गाभाऱ्याच असलेल्या खांबाच्या
पायथ्यावर देवाची शिल्प दिसत होती. बाकी मंदिराच्या बाहेर समोर छोटा
शिलालेख असलेली एक गध्देगळ आहे. तिथेच एक सिंह ही ठेवला आहे.
मंदिराच्या
डाव्या बाजुला एक छोट दगडाच साध मंदिर आहे. मंदिर रिकामी होते.
मुख्य
मंदिराचा बाहेरील भिंती वर तसेच कळसावर उत्तम कलाकृती दिसतात. आपल्याला
नृत्य शंकर, महिषासुरमर्दिनी आणि कळसावरील भागा जवळ सुंदर शिल्प दिसतात.
जातेवेळी शेवटी एका कोपर्यातून पूर्ण मंदिराचा एक dslr ने फोटो काढला.
आणि मग आम्ही चिखली साठी मुक्कामाला निघालो.
मुक्काम
चिखली मध्ये ७०० रुपये मध्ये
एक चांगला लॉज (शारदा गेस्ट हाऊस) भेटला. तसे इथे खूपच कमी लॉज आहेत. तरी
त्यामानाने हा लॉज चांगला होता.
चिखली वरुन आमचा
दुसर्या दिवशी सकाळी सतगाव-भुसरी येथील प्राचीन शिव मंदिर आणि बारव. नंतर
तेथून धोत्रानंदाई येथील ३ प्राचीन मंदिर आणि बारव पाहून, बीबी येथील गडी
पाहून लोणार येथे मुक्काम होता.
त्याबद्दल मी सविस्तर दुसर्या भागात लिहलं आहे
भोकरदन /तुकाई लेणीचे फोटो, भोकरदन
चक्रधर स्वामी मंदिर, भोकरदन |
नृसिंह मंदिर, चांडोळ |
खोल महादेव मंदिर, चांडोळ |
चांडोळ गावात अजून एक महादेवाचा मंदिर ह्याला (गडीच महादेव मंदिर बोलतात) आहे आणि त्याचा समोर एक पत्र्याचं छोटं मंदिर आहे. त्यात एक विरगळ दिसते, पण तीला रंग मारल्यामुळे ती प्राचीन आहे का नवीन कळत नव्हतं |
गावात अशी काही जुनी घर दिसतात. |
सकवार गावातील शिवमंदिर, उजवीकडे कोपऱ्यात लेख असलेली गद्धेगळ |