Monday, 21 February 2022

जालना, बुलढाणा 2 प्राचीन मंदिर, गडी आणि बारव , Jalna-Buldhana Part 2- Ancient Temple, Fortress and Ancient well

जालना, बुलढाणा 2

भाग दुसरा , दिवस दुसरा 

सतगाव- भुसरी मधील प्राचीन विष्णू-शिव मंदिर, धोत्रानंदाई मधील मंदिर आणि बारव, बीबीची गडी 


सतगाव- भुसरी मधील प्राचीन विष्णू-शिव मंदिर, 

आम्ही सकाळी ७.३० वाजता नाश्ता करुन सतगाव- भुसरी मधील प्राचीन विष्णू-शिव मंदिर पहायला गेलो. चिखली पासून फक्त १० कि.मी वर असल्यामुळे आम्ही १५ मिनटात पोहचलो. चिखलीवरुन बुलढाणा महामार्गावरील हातनी गावातून आत २ कि.मी वर सतगाव-भुसरी गाव आहे. मंदिर रस्त्यावरुन डाव्या बाजूला थोडं खाली दिसते. त्यामुळे बाइक वर रस्त्यालाच
लाऊन मंदिरात गेलो. 


मंदिर १२\१३व्या शतकातील असावीत. मुख्य मंदिर विष्णुचा आहे, त्याचा बाजूलाच/पाठी शिवाच मंदिर आहे. त्या व्यतिरिक्त अजुन एक लहान मंदिर आहे. पण आम्ही पूर्ण मंदिर परिसर फिरून पहिला, आम्हाला त्या बागे मध्ये अजून तीन चौथर्‍याचे अवशेष दिसले. आणि त्या मंदिर परिसराच्या कुंपणाच्या बाहेर एक गणपतीच लहान मंदिर, हे मंदिर नवीन वाटते पण त्याची दरवाजाची लहान चौकट प्राचीन दिसते. असे मिळून एकूण सात मंदिर त्यावेळी असावेत.

मुख्य मंदिरातील मूर्ती विष्णूची होती हे त्याचा वाहन गरुड वरुन कळते. मुख्य मूर्तीचे फक्त पायाचे तळवे बाकी आहेत बाकी पूर्ण मुर्ती खंड होऊन नाहीशी
झाली आहे. मंदिराचा आतील खांबावर, कळसावर सुंदर शिल्प दिसतात. मंदिरात अजून काही शिल्प अशीच खाली उभी करून ठेवलेली दिसतात. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर नृत्य आणि काही काम शिल्प ही दिसतात. 

विष्णु मंदिर पाहून आम्ही त्याचा पाठी किंवा बाजूलाच असलेले शिव मंदिर पाहिले. शिव मंदिरात शिवाची पिंड आहे. गावातील काही लोकं नित्य नेहमी पूजा करत असावी, कारण आम्ही गेलो तेव्हा फुल आणि अगरबत्ती लावून पूजा केलेली दिसत होती.  मंदिराच्या दरवाजाच्या चौकटीच्या ललाटीवर सप्त/अष्ट मातृका पट दिसतो. 
मंदिराच्या बाहेरील भिंती किंवा आत अजून काही शिल्प दिसत नाही. एके ठिकाणी मंदिराच्या चौथरा (जागृती) ला एक शिल्पाचा पट लावलेला दिसतो. 

शिव मंदिर बघून आम्ही विष्णु मंदिरच्या बाजूला असलेले लहान मंदिर पाहिले. ह्या मंदिरात काही शिल्प गोळा करून ठेवली होती. ह्या मंदिराचे पुढील खांब आणि दरवाजाची चौकट असा पुढील भाग व्यवस्थित होता. पण बाकी मंदिराचा भाग आणि छप्पर नव्याने दगड रचून आणि (छप्पर) सीमेंट ने केलेला दिसतो.

मंदिराच्या आवारात एक घोडेस्वार वध करताना मुर्ती आहे. तसेच अजून दोन खंड पावलेल्या मुर्ती दिसतात पण फक्त पायाचा भाग असल्यामुळे नीट ओळखता येत नाही. बाकी मंदिर परिसरात मंदिराच्या कळसाचे, खांबाचे असे बरेच अवशेष दिसतात.

तसेच वर सांगितल्याप्रमाणे, मंदिराच्या कुंपणाच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर डावीकडे गणपतीचा छोट मंदिर आहे. 

धोत्रानंदाई मधील तीन मंदिर आणि बारव 
मंदिर बघून आम्ही पुन्हा चिखलीला आमच्या लॉज मधून सामान घेऊन धोत्रानंदाई साठी निघालो. चिखली ते धोत्रानंदाई अंतर ३४ कि.मी आहे. महामार्गावरून गाव आत दीड ते दोन कि.मी आत आहे. 
इथे आम्हाला तीन प्राचीन शिव मंदिर आणि एक बाराव पहायची होती.

गावात पोहोचल्यावर मारुती मंदिरा कडून एक रस्ता सरळ जातो आणि एक उजवीकडे. मारुती मंदिराच्या थोडं पुढे/बाजूस सरळ रस्त्याला प्राचीन शिव मंदिर आहे. (आम्ही हे मंदिर शेवटी पाहिलं म्हणून मी ह्याला तिसरे मंदीर म्हणालो आहे.).  आम्ही उजवीकडच्या रस्त्याला वळलो आणि पहिला तिकडचा शिव मंदिर बघून घेतलं. उजवीकडे वळल्यावर लगेच २ मिनटात आम्ही मंदिराजवळ पोहचलो.

मंदिर परिसराला कुंपण केला आहे. मंदिराच्या आत आणि बाहेरील भिंतीवर कुठेही शिल्प दिसत नाही. मंदिराचा गर्भ गाभाऱ्याला फक्त छप्पर आहे. ते ही सीमेंट चे केलेले आहे. बाकी मंदिराचे फक्त खांबच दिसतात.
मंदिराच्या उजव्या बाजूला एक मोठा सुकलेल कुंड सारखी जागा दिसते. त्याकाळी बहुतेक पाणी साठवत असावे किंवा काही वेगळा असावे. तेथेच एक दगडाच राजन ही आहे.

मंदिर बघून आम्ही तिसरा मंदिर आणि बारव आधी बघायाला गेलो. तिसरं मंदिर जरा गावाच्या बाहेरच आहे. अंदाजे अर्धा किलोमीटर. बाइकमुळे आम्ही लगेच पोहचलो. मंदिर शेत जमिनीत आहे पण रस्त्याचा बाजूलाच आहे.त्यामुळे लगेच दिसते. मंदिराच्या सुरक्षेसाठी कुंपण केला आहे. मंदिरात शिवाची पिंड आहे. मंदिराच्या आत बाहेर शिल्प दिसत नाही. पण मंदिरावरील नक्षी सुंदर आहेत. 
बारव: मंदिराच्या थोडं पुढे रस्त्याने २ ते ४ मिनिटे चालत गेल्यावर डावीकडे बारव आहे. ही बारव नर्सरी बाजूला आहे. बारवच्या बाजूला काही बांधकाम केलेलं आहे. बारव मध्ये थोडं पाणी होतं पण अस्वच्छ होतं. 
बारव मोडकळीस आलेली आहे. बारवच्या एका बाजूच्या पायर्‍यांवर काही तांदळा स्वरूपातील शेंदूर लावलेले देव आहेत. बहुतेक गावातील लोक त्याला देवी मानतात. 
बारव बघून आम्ही तिसरा मंदिर बघायाला पुन्हा गावात
गेलो. 

तिसर मंदिर: हि सुंदर आहे, ह्या मंदिराच्या बाहेरील भिंतीवर शिल्प नाहीत. तसेच मंदिरात आत हि कुठे शिल्प दिसत नाही. पण विशेष करुन मंदिराच्या गर्भ गृहाच्या दरवाजाच्या चौकटीच्या ललाटवर (माथ्यावर) नऊ चेहरे आहेत. ते पाहून खुप नवल वाटल, त्याचा अर्थ नक्की काय कळलं नाही. मंदिर परिसरात काही अवशेष दिसतात. एके ठिकाणी बहुतेक तुटलेल्या खांबाचा 
अवशेष आहे, त्यावर कुबेर आणि स्त्रियांचे शिल्प आहे.

मंदिराच्या बाजुला मारुतीच्या मंदिराच्या बाहेर खाली ७ मुर्ती ठेवलेल्या आहेत. बर्‍यापैकी मूर्तीं खंडित आणि झिज झाली आहे. निट जपवणूक नाही केल्या तर कदाचित काही वर्षात नष्ट होतील किंवा पूर्णपणे झिज होऊन ओळखता हि येणार नाही. कारण आताच  मुर्ती ओळखता येत नाही आहेत. त्यात काली माता, उमामहेश, कालभैरव मुर्ती खंड होऊन सुद्धा ओळखता येतात. पण बाकी मुर्ती ओळखता येत नाही.


बीबीची गडी
मंदिर पाहून आम्ही बीबी ची गडी पाहण्यासाठी निघालो.  धोत्रानंदाई ते बीबी अंतर ३० कि.मी आहे. साधारण आम्हाला १ तास लागला. 


आम्ही दुपारी पोहचलो. 
बाइक असल्यामुळे आम्ही गल्लीतून थेट गडीच्या दरवाजा जवळ पोहचलो. आम्ही ज्या गल्लीतून रस्त्याने आलो त्या बाजूनेच फक्त २ बुरुज आणि गडीची तटबंदी मजबूत दिसली. ह्या तटबंदी आणि बुरुजाच्या बाजूला थोडं मध्य भागी घराची वास्तू आहे. इतर बाजूने तटबंदी दिसत नाही. गडीचा दरवाजा वैगेरे काही दिसत नाही. पायर्‍या हि तुटलेल्या आहेत. पण पायर्‍याने चढते वेळी नीट पाहिले असता, एके ठिकाणी दरवाजाच्या चौकटीचा /सारखा पायथ्याच्या भाग दिसतो. त्यावरून अंदाज लावता येतो. 
पायर्‍या चढून वर गेलो असता, समोर आपल्याला घर दिसतो. घराचा चौथरा दगडाचा आणि त्यावर जुन्या बारीक विटांच काम आहे. त्या घरात एक व्यक्ति राहतात. त्यांना विचारले असता ते बाजूच्या खोली मधील भुयार दाखवतात. हा भुयार सिंदखेडराजाला निघतो असा आम्हाला गावाची मुले सांगत होती. पण त्या घरातील व्यक्तीं ने सांगितले, खाली फक्त खोली आहे. 

त्यांचा घराची खोली सोडली असता बाकी डावीकडच्या दोन्ही खोल्या बिना छत असल्यामुळे आत मध्ये गवत झाले होते. त्या दोन खोली मध्ये एक दरवाजा आहे, त्या दरवाजा जवळ भुयार आहे. पण आम्ही गेलो होतो तेव्हा गवत खूप होतं आणि त्यांनी भुयार साफ केला नव्हते. त्यामुळे त्यांनी आम्हाला दाखवले नाही त्यात त्यांची तब्येत पण खराब असल्यामुळे खाटे वर पडूनच बोलत होते.

मग आम्ही त्या घराच्या आजूबाजूस फिरलो. बाकी काही अवशेष दिसले नाही. गडीच्या आजूबाजूला दाट वस्ती झाली आहे. त्यामुळे अजून काही अवशेष असतील तर कदाचित नष्ट झाले असावेत. पण ती गडी तेवढीच लहान असावी. कारण मघाशी सांगितल्याप्रमाणे फक्त एका बाजूचे बुरुज आणि तटबंदी व्यवस्थित दिसत होती, इतर बाजूचे फक्त ढासळलेली तटबंदी दिसत होती. जी तटबंदी आणि बुरुज व्यवस्थित होती, त्याचा वरती बहुतेक वीट किंवा चिखलाची भिंत असावी. ती नष्ट होऊन पूर्ण माती चा ढीग झाला होता. त्यात गवतामुळे निट दिसत नव्हती.

बाकी गावात गडी व्यतिरिक्त काही विशेष नाही वाटले. मुलानी आम्हाला गावातील मस्जिद बघायाला सांगितले. पण आम्ही त्यांना विचारलं अशीच जुनी आहे का?. फक्त जुनी आहे बोलले, म्हणून आम्ही तिथे न जाता लोणारला
मुक्कामी गेलो. 

तासाभरात आम्ही लोणारला पोहचलो. 
लोणारला आम्हाला लॉज शोधायला बराच वेळ गेला. एवढ प्रसिद्ध ठिकाण आहे, पण मोजून ५\६ हॉटेल असतील. त्यात एक विक्रांत हॉटेल ४\५ स्टार होतं. बाकी म्हणजे २ स्टार पण नव्हते. 

आमचे दोन तास तर त्यातच गेले. मग शेवटी श्रीकृष्णा लॉज मध्ये दिवसाला ५०० रुपये भाड्याने रूम घेतली.
हॉटेल तसं  ठीक ठाक होत. त्यात ८०० रुपये वाली खोली चांगल्या होत्या. पण आम्ही जरा स्वस्त वालीच घेतली. 
आम्ही लोणारला दोन दिवस मुक्काम केला. पहिल्या दिवशी मेहकर, परड आणि उस्वाद केला आणि दुसर्‍या दिवशी लोणार पाहून संध्याकाळी सिंदखेडराजा मुक्कामी गेलो. ह्या बद्दल मी तिसर्‍या दिवशीच्या, तिसऱ्या  भागात लिहले आहे.
सतगाव भुसरी येथील शिव आणि विष्णू मंदिर समूह येथील विष्णू मंदिर 


सतगाव भुसरी येथील शिव आणि विष्णू मंदिर समूह 
सतगाव भुसरी येथील शिव आणि विष्णू मंदिर समूह येथील समूहाच्या बाहेर असलेलं गणपतीचे मंदिर

सतगाव भुसरी येथील शिव आणि विष्णू मंदिर समूह 
सतगाव भुसरी येथील शिव आणि विष्णू मंदिर समूह येथील शिवाचे मंदिर (विष्णू ,मंदिराच्या  बाजूला अथवा पाठीच  लागून आहे.)


धोत्रे नंदाई येथील मारुतीच्या मंदिरा बाजूला असलेले शिव मंदिर 

शिव मंदिर  

धोत्रे नंदाई येथील  गावाच्या थोडे बाहेर शेतात असलेलं मंदिर, ह्याचा पुढे २/ ४ मिनटं  चालत गेल्यावर बारव आहे. 

धोत्रे नंदाई येथील  गावाच्या थोडे बाहेर शेतात असलेलं मंदिर
धोत्रे नंदाई येथील बारव 
धोत्रे नंदाई येथे मारुतीच्या मंदिराच्या बाहेर पायऱ्यांचा बाजूला ह्या मूर्ती ठेवलेल्या आहेत.



धोत्रे नंदाई येथील शिवाचे अजून एक मंदिर, आम्ही पहिले हे मंदिर पाहिले. 

बीबीची गडी 

बीबीची गडी 

बीबीची गडीच्या पायऱ्या 

बीबीची गडी ची बाहेरून दिसणारा बुरुज आणि तटबंदी. 

बीबीची गडीच्या बाजूला फिरले असता, अशी जुनी वास्तू दिसतात. 

बीबीची गडी 

बीबीची गडी बुरुज