Friday, 4 November 2022

जालना, बुलढाणा प्राचीन ५ - देऊळराजा येथील गडी, बारव, सिंधखेडराजा दर्शन.

जालना, बुलढाणा प्राचीन ५ - देऊळराजा येथील गडी, बारव, सिंधखेडराजा येथील महाल, समाधी इत्यादी. जालना येथील मस्तगड भुईकोट, दरवाजा.

आज आम्ही देऊळराजा येथील गडी, बारव पाहून.  सिंदखेडराजा पाहून जालण्याला जाऊन मुंबई साठी ट्रेन पकडणार होतो.

देऊळगावराजा बारव 
पहिली बारव
ठरल्याप्रमाणे आम्ही सकाळी साडे सहा वाजता देऊळगावराजा साठी निघालो. सिंदखेडराजा ते देऊळगावराजा 15 कि.मी आहे. अर्धा तासात आम्ही तेथे पोहोचलो. पहिले आम्ही गावाच्या थोड्या बाहेर असलेल्या बारव पाहायला गेलो. गावातील लोकांना विचारात विचारात, आम्ही तिथे पोहोचलो. पण रस्त्याचा बाजूला सकाळी बरेच जण चिंपाट घेऊन बसले होते. त्यामुळे आम्ही तोंडाला मास्क घातला, कारण पूर्ण रस्ताच भरला होता. त्यात आम्ही एकदमच चुकीच्या वेळेत पोहोचलो होतो. ह्या वरुन कळलं गाव हागणदारीमुक्त नाही.

रस्त्याला उजव्या बाजूला एकाचा खाजगी जागेत बारव आहे. तिथे त्याची शेती आणि घर दोन्ही आहे. त्यामुळे आम्ही त्यांना विचारलं आणि त्यांनी आम्हाला विहीर दाखवली. बारव मोठाची विहीर सारखी आहे आणि त्याला जाण्यासाठी पायऱ्या आहेत. काही पायऱ्या उतरून दोन्ही बाजूला छोटी  देवडी आहेत त्यातील एका देवडीच्या बाजूलाच भिंतीवर एक शिलालेख आहे. 
शिलालेखचा फोटो शेवटी दिला आहे. 

दुसरी बारव आणि प्राचीन समाधी 
ती बारव बघून, अजून त्याचा पुढची बारव पहायला गेलो. 
हि बारव अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरच पुढे एका शेतात आहे. बारव आणि प्राचीन समाधी आहे. समाधी बहुतेक कोणी सरदार किंवा राज घराण्यातील व्यक्तीची असावी. त्यामुळे तिची डागडुजी चांगली ठेवली आहे. पण बारव दुर्लक्षित आहे, त्यामुळे पूर्ण झाडा झुडपाने झाकलेली दिसते. तसेच विहिरीच्या बाजूला असलेल्या मोठा जवळ काही घरा सारखा अवशेषची भिंत ढासळलेली दिसते. ही बारव, पहिल्या बारव सारखीच दिसते, पण आकाराने लहान दिसते. बहुतेक त्याकाळी बारवचे पाणी समाधी समोर असलेल्या चौकट मध्ये सोडत असावेत. सुशोभिकरण साठी. हि बारव बघून पुन्हा आम्ही गावात बालाजी मंदिराच्या बाजूला असलेली बारव पहायला गेलो. पुन्हा नाकतोंड झाकुन घेतलं आणि निघालो.

बालाजी मंदिरा शेजारी असलेली बारव आणि दरवाजा आणि तटबंदी 
बालाजी मंदिराच्या बाजूला लागून रस्त्यालाच बारव आहे. 
रस्त्याचा बाजूला 10 ते 12 फुटाची भिंत असल्यामुळे दिसत नाही, पण त्या भिंतीला सीमेंटच्या दोन छोट्या चौकनी खिडकी आहेत, त्या मधून थोडीशी दिसते. त्या भिंतीच्या दोन बाजूला बारव मध्ये जायला पायऱ्या आहेत. पण तिथे लोकांनी कचरा आणि अडगळ ठेवली आहे. आम्हाला वाटलं आम्हाला काही बारव बघायला भेटत नाही, पण तिथे एकाने सांगितले, मंदिराच्या समोर मंदिर कार्यालयात विचारा ते तुम्हाला सांगतील. 

कार्यालयात विचारले असता तेथील एक काका चावी घेऊन आम्हाला बारव दाखवायला आले. 

बारव वर्णन
बारव खूप सुंदर आहे. बारवच पाणी थोडं स्वच्छ दिसत होते. त्यात पाईप टाकले होते, त्यावरुन ते पाणी कशाला तरी वापरत असावेत. बारवला दोन बाजूने दरवाजा आहेत. तसेच बारवच्या थोडीशी मध्ये अशी, एक मजली दगडी इमारत आहे, त्याचावर बहुतेक नंतर बारीक विटांने अजून एक मजला (बहुतेक नंतर बांधलेला दिसतो) आहे. त्या मजल्यावर जाण्यासाठी भुयार सारख्या पायऱ्या आहेत. तिथून वर गेले असता आपल्याला वरुन बारव दिसते पण पूर्ण दिसत नाही. आणि तेथे वर जुन घर आहे. आम्ही बारव पाहून नाश्ता करून अजून आजुबाजूचे अवशेष पाहून घेतले. मंदिराच्या आजूबाजूच्या पूर्ण परिसरात आपल्याला जुनी वाड्या सारखे घर दिसतात. ह्या वरुन अंदाज लावता येतो. त्याकाळी  ह्या बारवच पाणी प्यायला वापरत असावेत.
दरवाजा 
बारवच्या पुढे, रस्त्याला समोर दरवाजा आहे. आणि बाजूला थोडी फार तटबंदी दिसते. त्याकाळी एक प्रवेश द्वार असावे. 
बाकी नामशेष झालेली दिसते. आम्ही मंदिराच्या समोरच एका छोट्याशा गल्लीत वाडा आहे. वाडा सध्या आतून पूर्ण ढासळलेला आहे, फक्त बाहेरून भिंती चांगल्या दिसतात. तो पाहून घेतला.

शाळेतील गडी 
तो वाडा बघून आम्ही कस्तुरबा कॉन्व्हेंट शाळा बघायला गेलो. कारण त्या शाळेत गडीचा दरवाजा आहे, आणि त्याला लानूनच अथवा त्या गडीतच शाळा बांधली आहे.
गुगल नक्षा वरती बघितल्या वर अंदाज येतो बहुतेक हि गडी असावी. कारण त्याचे तीन बाजूचे बुरुज आणि तटबंदी दिसते. एका बाजूने पडलेली किंवा ढासळलेली असावी, त्यात अतिक्रमण मुळे एका बाजूला घर दिसतात. 

शाळेच्या दरवाज्याने आत गेलो असता. डावीकडे आपण मुख्य दरवाजा आहे, तेथे जातो. दरवाजा रस्त्याने दिसतो पण रस्त्याचा बाजूने प्रवेश बंद ठेवतात. दरवाजा चांगल्या स्थितीत दिसतो. त्याला बहुतेक शाळेने रंगवलं आहे. 

शाळेच्या दरवाज्याने आत आल्यावर उजवीकडे आपल्याला दोन बुरुज दिसतात. पण त्यावर वाढलेली झाडे झुडपे वाढलेली आहेत आणि मुख्य करुन बुरुज आतून ढासळलेला आहे, त्याचा माती वरुन चालणे धोकादायक वाटत होते. म्हणून आम्ही बुरुज लांबूनच बघितला. पन बुरुज आणि तटबंदी बाहेरच्या बाजूने चांगली दिसते. 

त्यामुळे आम्ही बाहेरून बघायला गेलो. पण त्या रस्त्याने पुढे चालू लागलो असता,  एक जन रस्त्याला चिंपाठ घेऊन बसलेला दिसला. आणि तेथे आलेला दुर्गंध आणि रस्त्याला दिसलेली घाण आम्ही समजलो, हा रस्ता हागणदारीचा आहे. मग आम्ही तिथूनच फोटो काढून पाठी फिरलो.

सिंदखेडराजा दर्शन
तिथून आम्ही नाश्ता करून पुन्हा सिंदखेडराजाला आलो.
दुचाकी असल्यामुळे आम्हाला फिरायला जास्त वेळ लागला नाही.
सिंदखेडराजाला बघण्यासारखे म्हणजे, लखोजीराजे ह्यांचा वाडा जेथे राज माता जिजाऊ साहेब यांचा जन्म झाला. तसेच लखोजीराजे ह्यांची समाधी, शिवाच एक प्राचीन मंदिर. काळा कोट बघण्यासारखे आहे. 

लखोजी राजे जाधव ह्यांचा राजवाडा
पहिला आम्ही राजवाडा पाहायला गेलो. वाड्याचा बाहेरच्या तटबंदी अजून चांगल्या दिसतात. पण आत मात्रं चौथरे दिसतात. एके ठिकाणी जिजाऊ साहेबांच जन्म झाला, ती खोली आहे. चौथरा खाली मोठा तळ मजला आहे  बहुतेक त्यावेळी तेथे सैन्य ठेवत असावेत. थोडं पाठी मागे राजदरबार आहे. आम्ही महाल बघून 
काळा कोट बघायला गेलो.

काळा कोट, शिव मंदिर आणि समाधी
काळा कोटमध्ये बहुतेक संग्रहालय बनवत आहेत, त्याच काम चालू आहे. आम्ही तिथे असलेल्या प्राचीन मुर्ती बघायला गेलेलो. ते पाहून आम्ही शिव मंदिर पाहायला गेलो. शिव मंदिर पाहून आम्ही लखोजी राजेची समाधी पाहिली. 

जालना प्रवास
आमचं सिंदखेडराजा बघून झालं. मग आम्ही दुपारी जालना साठी निघालो.  कारण तेथून रात्री आमची मुंबई साठी ट्रेन होती. आम्ही संध्याकाळी ४\५ दरम्यान पोहोचलो. आमच्याकडे बराच वेळ होता. त्यामुळे आम्ही तेथील रस्त्यात लागलेला दरवाजा, तसेच मस्तगड भुईकोट पाहिला.

मस्तगड भुईकोट
भुईकोट होता, रस्त्याचा बाजूने बाहेरून एका बाजूची तटबंदी दिसते. भुईकोटला दरवाजा नाही पण दरवाजा आतील भागातील देवडी आहे. तसेच दरवाजातून आत गेल्यावर एका बाजूला (उजव्या बाजूला) थोडी तटबंदी लागते आहे. आत मैदानात दोन तोफा ठेवलेल्या आहे.
ह्या भुईकोट मध्ये आता नगर परिषदेची पाण्याची उंच टाकी बांधली आहे. आत बरेच नगर परिषदेचे भंगार सामान काही जुन्या गाड्या ठेवल्या आहेत. तसेच काही घरे पण आहेत. आणि बहुतेक काही बैठी कार्यालय आहेत. बहुतेक जालना नगर परिषदेची असावीत. कारण भुईकोटच्या मुख्य दरवाजा वर जालना नगर परिषदेचा फलक लावला आहे.

भुईकोट बघून एक मंदिरात काही वीरगळ, आणि प्राचीन मुर्ती आहेत. त्या बघितल्या. 

अश्या प्रकारे आमचा जालना, बुलढाणा दौरा पूर्ण झाला.

धन्यवाद
पाहिली बारव 


देवडीच्या बाजूला असलेला शिलालेख 







दुसरी बारव आणि समाधी 







बालाजी मंदिरा शेजारी असलेली बारव


बालाजी मंदिरा येथील दरवाजा 



मंदिराजवळ असलेले जुनी घरे. 

शाळेतील गडीचा दरवाजा 





गडीची तटबंदी आणि बुरुज 

गडीची तटबंदी आणि बुरुज 

गडीची तटबंदी आणि बुरुज 


मस्तगड भुईकोट, जालना

जालना येथील एका मंदिरात ठेवलेल्या प्राचीन मूर्ती.