Wednesday, 14 February 2024

रोहिडा- रायरेशवर-केंजलगड 10-11 Feb24

*रोहिडा- रायरेशवर-केंजलगड, मोहनगड,कावळागड आणि शिवतरघळ.* 
10-11 फेब्रुवारी, 2024

 _दिवस पहिला_ .
 *रोहिडा गड/ विचित्रगड* 
* पायथ्याच गाव- बाजारवाडी
* सकाळी 7.20 वाजता ट्रेकला 
   सुरवात.
* 11 वाजता गडफेरी पूर्ण करून 
   पायथ्याशी पोहोचलो
* पाउण तास गड चढायला लागला. 

* गडावर पाहण्यासाठी 7 बुरुज,
  तटबंदी, पाण्याचा टाकी, 1छोट तळ 
  राजवाड अवशेष, मंदिर, जुनी 
  मातीच्या भांडीचे अवशेष आहेत. 

* गडावर वाघजाई बुरुजाचा बाजूने   
   समोर धारेवर असलेल्या 
   वाघजाई मंदिरात जाता येते. 
   देवीच्या नावावरून ह्या बुरुजाच 
   नाव ठेवलं आहे. 
    इथून खाली दिसणार्‍या 
   चिखलगावमध्ये वाटाड्या सोबत 
   असेल तर उतरू शकतो.

* रोहिडा-रायरेशवर अंतर रस्त्याने 36km.

 *रायरेशवर पठार* 
* पायथ्याच गाव - कोले॔ गाव
* पठारावर जाण्यासाठी घाट रस्ता 
   आहे. किंवा
* कोले॔ गावातून 2 तासात चढूनजाऊ 
  शकता 
* रायरेशवरला गाडी जेथे पार्क होते, 
   तिथपासून 15 मिनटात पठारावर 
   पोहोचतो.

* दुपारी सव्वा एक वाजता सुरवात 
  केली. 
* संध्याकाळी पाच वाजता पुन्हा 
   पार्किंग मध्ये पोहोचलो.

* रायरेशवर पठारावर एक लेणी, 
   रायरेशवर मंदिर, कुंडातुन पाणी येते 
   ते टाक, सात रंगाची माती आणि 
   एक छोट पाण्याच टाक आहे. 
   रायरेशवर पठार पसरलेल 
   आहे, त्यामुळे हे सगळ बघण्यात 
   वेळ जातो. 

 *केंजलगड* 
* पायथ्याच वस्ती / गाव- 
   पाकेरेवस्ती, कोले॔ गाव
* संध्याकाळी 5 वाजता ट्रेकला 
   सुरवात.
* संध्याकाळी 6.15 वाजता गड 
   माथ्यावर.
* संध्याकाळी 7.10 ला गडफेरी 
  करून पाकेरेवस्ती गावात पोहोचलो 
* उतरते वेळी 20/25 मिनिटात
   पाकेरेवस्तीत पोहोचलो.

* रायरेशवर पार्किंग ते केंजलगड 
  पाकेरेवस्ती रस्त्याने 10 मिनटात 
  पोहोचतात. पाकेरेवस्तीतून 
  अर्ध्या तासात/तासाभरात 
  गडावर पोहोचता येते.

* आम्ही पाकेरेवस्तीतून चडाई न   
   करता. रायरेशवर पठार आणि 
   केंजलगडच्या मध्ये, केंजलगडची 
   एक धार रस्त्याला येते. या धारेवरून 
   चढायला सुरवात केली. ह्या वाटेने 
  आम्ही सव्वा तासात गडावर 
  पोहोचलो. 
   **वाट मळलेली आहे. पण 
  केंजलगडचा कातळटोपी /वरील 
  कातळाच्या बाजूने वळसा घालत 
  जाणारी वाट. जरा निसरडी आह़े. 
  त्यामुळे जपूनच जायला लागते.** 
* गडमाथा लहान असल्यामुळे गड 
   लवकर पाहून होतो. गडावर 
   तटबंदी, बुरुज, 
  पाण्याची टाकी, कोठार, 
  चुन्याचा 2 घाणे, मंदिर (तुटलेल, 
  उघड्यावर) आहे. गडाच्या कातळात 
  कोरलेल्या पायऱ्या.

* रात्री वस्तीला मोहनगडच्या 
   पायथ्याच गाव दुर्गाडी येथे गेलो.

 *दिवस दुसरा* 
* पायथ्याच गाव- दुर्गाडी, शिरगाव.
* दुर्गाडी गावातून चढायला दीड तास 
   लागला.
* शिरगाव उतरायला 1 तास लागला 

* मोहनगड साठी शिरगाव आणी 
  दुर्गाडी गावातून जाता येते. दोन्ही 
  वाटा काळकाईचा ठाण पाशी येऊन  
  मिळतात. 
* _काळकाईचा ठाण्यापासून गावकरी 
   बिना चप्पल गड माथ्यावर जातात._ 

* *शिरगावची वाट* मळलेली आहे.     
    हि वाट सरळ सोंडे वरुन येते, 
    त्यामुळे बर्‍यापैकी सरळ वर चढत 
    जाते. वाटेत जागो जागी बानाचे 
    चिन्ह केले आहेत़. त्यामुळे न 
    चुकता जाऊ शकता. ह्या वाटेने 
   आपल्याला मोहनगड सतत समोर 
   दिसतो.

 * *दुर्गाडीच्या वाट* फिरून येते 
    त्यामुळे गावातून गड दिसत नाही. 
    डोंगराच्या एका सोंडेवर आल्यावर 
    गड दिसतो. 
    ह्या सोंडेवरुन आजूबाजूचा 
    परिसर सुंदर दिसतो. हि वाट 
    जंगलातून येते आणि एके ठिकाणी 
    गडाचा कातळ टोपीच्या पायथ्याच 
    जंगलातून काळकाईच्या 
    ठाण्यापाशी मिळते.

* ह्या वाटेने सुरुवातीला गावातील 
  जनी मातेचा मंदिर लागते. ह्या 
   मंदिरात 10/12 जण राहू शकतात. 
   _वाटाड्याने सांगितले. काही लोक 
   इथे दारू प्यायचे म्हणून मंदिर बंद 
   असते._ 

* *गडाचा माथा* लहान आहे. 
   गडावर जननी /दुर्गा माता मंदिर, 
   एक चौथरा (किंचित राहिलेला),
   4 टाकी (1 छोटी) आहे.
   __वाटाड्याने सांगितले, गावची 
   काही जुनी लोक 7 टाकी आहेत़   
   सांगतात.पण कोणाला बहुतेक 
   माहीत नाही.__ 

* *एका टाकी कडे जाण्याची वाट  
   अवघड आहे. जपून जायला 
    लागते.* 

* शिरगाव मंदिराच्या पत्र्याचा मंडपात 
   25/30 लोक वस्ती करू शकतात.

 *कावळा गड* 
* गड चढायला अर्ध्या तास लागला.
* पूर्ण गडफेरी करुन पायथ्याशी 1 
  तासात पोहोचलो.

* वरंधा घाटात महाड आणि भोरच्या 
  सीमेवर खिंड आहे तिथेच गड   
  चढायला सुरवात होते.

* गडाचा माथा मोठा आणि पसरलेला  
  आहे. पण गडावर आम्हाला जास्त 
  अवशेष दिसले नाहीत. (गडावर 
  अजून तटबंदी, इत्यादी अवशेष 
  आहेत. असे वाचल होतं. नक्की कुठे 
  माहीत नव्हते. गडावरील जंगल मुळे 
  शोधायला जमल नाही.)

* सुरुवातीला काही पायर्‍या लागतात,
   गडावर 2 टाकी आहेत 
   (1 सुखलेल) तिथेच तांदळा 
   स्वरूपातील देव, 
   1 चौथरा, गडाचा एका टोकाला 
   गोल बुरुजावर भगवा फडकविला 
   आहे. 

* **रस्त्याचा पलीकडे गडाचा दुसरा 
   भाग आहे.** 
* इथे आम्हाला 6 टाकी, जुन 
   वाघजाई मंदिर, कातळातील 
   पायऱ्या दिसल्या 
    _( मंदिराच्या पुढे उजवीकडे 
   खालीआहे, पण सध्या ह्या वाटेवर 
   गुरढोर तसेच बहुतेक माणसे जाऊ 
   नये म्हणुन लाकडे टाकून वाट 
   बंद केली होती.)_ 

* ह्या टाकी पाहण्यासाठी (भोर 
  बाजूला) टपरीवाले आहेत. त्यांचा   
  थोडं पुढे, एक वाट वर जाते. 
  इथून/10 मिनटात टाकी 
  जवळ पोहचतो. टाकी डावीकडे 
  आहेत आणि मंदिर उजवीकडे.

 *शिवतरघळ* 
* गड पाहून आम्ही शिवतरघळ येथील
  रामदास स्वामी ह्यांची गुहा पाहायला 
  गेलो.

* गुहेत दर्शन घेऊन दुपारी साडेतीन 
  वाजता. मुंबई साठी प्रवास सुरु 
  केला.

Monday, 5 February 2024

हटकेश्वर ते लेण्याद्री

04022024 रविवार
* कोळेवाडी -हटकेश्वर- लेण्याद्री  
   गणपती पर्यंत 12.5 km चा 
   ट्रेक आहे. 
* कोळेवाडी गावातून सकाळी 6.30 
   वाजता ट्रेकला सुरवात 
   केली, सकाळी 10 वाजता आम्ही 
    मंदिरा जवळ पोहोचलो. 
   लेण्याद्री गणपती मंदिरात दुपारी 
   3.30 वाजता पोहोचलो.
* एकूण 9 तास लागले.
* कोळेवाडी ते हटकेश्वर मंदिर 
   साडेतीन तास चढायला लागले.
* हटकेश्वर ते लेण्याद्री गणपती मंदिर 
  साडेतीन तास लागले.

* डोंगरावर हटकेश्वर शिव मंदिर, 
  2 गुहा, 3 टाक्या आहेत. 
  माथ्यावर हे सगळ पाहण्यासाठी वेळ 
  लागतो.
* छोटया गुहेमध्ये गणेश मुर्ती आहे. 
* दुसरी गुहा आतमध्ये खोलवर अरुंद 
   होत जाते, किती खोलवर 
   आहे कळत नाही. 
* मंदिराच्या बाजूला पाण्याची टाक 
   आहे, पण त्यातील पाणी   
   पिण्यास योग्य नाही. जेथे नैसर्गिक 
   पूल/नेढ आहे त्या बाजूला  
   2 टाक आहेत, त्यात एक बुजलेले 
   आहे. बुजलेल्या टाकीच्या 
   वरील, टाकीतील पाणी पिण्यास 
   योग्य होते. 

* कोळेवाडी तून जाणारी वाट 
   मळलेली नाही, त्यामुळे चुकायला 
   होते. खास करून वरच्या टप्प्यातील 
   वाट, काही ठिकाणी 
   कारवीच्या झाडीतून वाट जाते. 
   बरेच ठिकाणी वाटेत माती 
   भुसभुशीत आहे, त्यामुळे पाय 
   सरकन्याचे प्रमाण जास्त आहे. 
   खास करून माथ्यावर पोहोचण्याचा 
   आदि एक कातळ टप्पा 
   आहे. तिथे माती जास्त पडते. ह्या   
   टप्प्यावर दोर घेऊन गेले तर 
   जास्त सोयीचे ठरेल.

* रात्री कवडधारा देवी मंदिरात वस्ती 
   केली, मंदिर महामार्गाला 
  लागूननच आहे. मंदिरात 50 माणसं 
  झोपू शकतात. पण मंदिर 
  संध्याकाळी बंद करतात, त्यामुळे 
  गावातील पुजारी कडून चावी 
  आधीच घ्यायला लागते. कोळेवाडी 
  गावात आत ही मारुती 
  मंदिर आहे, ते मंदिर ही संध्याकाळी 
  बंद करतात.

* आम्ही हॉटेल हर्ष मध्ये सकाळच्या 
  नाश्त्याची सोय केली होती. 
   त्यावेळी त्या हॉटेल मालकाने 
  आमच्यासाठी मंदिराची चावी घेऊन     
  ठेवली होती. आम्ही त्यांचा कडून 
  चावी घेतली.

* हॉटेल हर्ष - गणपत कुमाकर - 
   9766562973