Wednesday, 30 November 2016

Sindola fort सिंदोळा

सिंदोळा ट्रेक 

ह्या रविवारी सिंदोळा गड करायचा ठरला. नेहमी सारख कसा जायायचा  कुठे उतरायचा , नकाशे  सगळ  गुगलवर शोधू लागलो. ह्या गडाचा वापर आजुबाजुच्या परिसरावर शत्रूचा आक्रमणापासून नजर ठेवण्यासाठी करत असे. अजूनपर्यंत कुठच्याही ग्रुप ने सिंदोळा ट्रेक टाकलेला मी अजून बघितला नाही आहे. त्यामुळे बहुतेक ट्रेकिंग ग्रुप ह्या गडावर जात नाही हे नक्की. त्यामूळे नवखे ट्रेकरला ह्या गडाबद्दल जास्त माहित हि नसेल. पण ह्या गडावर बहुतेक करून ट्रेकर स्वतःहून खाजगी ट्रेक करत असतील. आजूबाजूचा गावातले हि क्वचितच जात असतील.कारण गडाचा जाण्याचा वाटेवर आणि गडावर फक्त माजलेले गवत दिसत होते पण जरा सुद्धा प्लॅस्टिक किंवा कपड्याचा कचरा दिसला नाही.

        ह्यावेळी आम्ही १० जण  होतो. सकाळी ५.२९ ची मुंबई सीएसटी - टिटवाळा गाडी पकडायचं ठरला.  मला जरा निघायला उशीर झाला त्यामुळे धावधावत जाऊन तिकीट काडून वेळेत करीरोड वरून ट्रेन पकडली. ह्यावेळी अनिल वेळेत ठाण्याला आला त्यामुळे त्याला हि ट्रेन भेटली . त्याचा सोबत सर्वेश, सुहास आणि कावेरी होते. आणि बाकी हिमेश, स्वप्ना, विनय , प्रणव आणि प्रथमेशने डोंबवलीला गाडी पकडली. कल्याणला ट्रेन बरोबर ७ वाजता पोहचली. तिकडून आम्ही कल्याण st आगार मध्ये गेलो.



कल्याण ते पुणे st  ने प्रवास करते वेळी 


 आम्हाला करंजाळे फाट्याला उतरायचा होता त्यामुळे  कुठचीहि अहमदनर-कल्याण रोड, आळेफाट्यावरून जाणारी st  पकडायची होती. ७ ची कल्याण- आळेफाटा - पुणे st  लागली होती. गाडी आधीच भरली होती त्यामुळे आम्हाला आता एकाद दुसरी जागा भेटली तरी नशीब असाच विचार करत होतो . तितक्यात वाहक (कंडक्टर) बोलला गाडी जुन्नर वरून नाही जाणार लगेचच भरलेली गाडी बहुतेक खाली झाली आणि आम्हाला बसायला आसन मिळाले. गाडी ७. १५ ला सुटली. कल्याण ते करंजाळे  फाटा साधारण ९०ते ९५ किमी अंतर st  ने पोहचायला ३ तास लागतात. गाडी मध्ये टोकावडेला नाश्त्यासाठी १५ मिनिट थांबते. तिकडून मग पुढे माळशेज घाट लागतो. माळशेज घाटाततून सह्याद्रीची सुंदर रांग दिसत होती.  एका बाजूला मोरोशीचा भैरवगड, नाणेघाट दिसत होते तर दुसरीकडे  घाटात गाडी अजून वर जाताच हरिशचंद्र गड दिसत होता. घाट संपताच  पहिला खुबी फाटा लागतो त्याचा पुढे १ ते १. ३० किमी अंतरावर करंजाळे  फाटा लागतो.

करंजाळे  फाटा


करंजाळे  फाट्यावरून दिसणारे सिंदोळा गडाचा दर्शन

गडाचा वरील कातळाच्या डाव्याबाजूने वाट जाते



खालचा पठारावरून तुम्ही पहिल्या सोंडेवर येतात तिकडील दृश्य
चित्रात दाखवलेली लाल रेष खालचा पठारावरून वरचा पहिल्या सोंडेवर येण्याची वाट ( चित्रात अंदाजे रेष दाखवली आहे, पण तिकडूनच वाट येते )
कातळात कोरलेल्या पायऱ्या तुम्हाला घळीत वर दरवाजा जवळ घेऊन  जातात
पायऱ्याचडून वर  जायायची  वाट


दरवाजाजवळील अरुंद वाट




     करंजाळेला पोहचे पर्यंत आम्हाला १० वाजले.  आम्ही तसा दुसऱ्यांचा ब्लॉग मध्ये गुगल मॅपचा फोटो वर वाट दाखवलेली बघितली होती. तरी पण सुरवातीला थोड चुकलो मग तिथेच पायथाशी एका काकांना वाट विचारली. त्यांनी कसा जायचा सांगितलं.  पायथ्यापासून  २० मिनिटे वर चढल्यावर तुम्ही एका पठारावर पोहचतात. तिकडून तुम्हाला उजवीकडे थोडा सिंदोळयाचा दिशने चालून.  झुडपातून एक वाट वर सिंदोळ्याचा सोंडेवर पोहचवते. सोंडेच्या पठारावरून सरळ वर चडून गेल्यावर सिंदोळ्याचा.कातळाच्या डाव्या बाजूने वाट जाते ती पकडून तुम्ही एक घळीजवळ पोहचतात. घळीत पुढे न जाता उजवीकडे वाटेच्या बाजूलाच छोट्याशा अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात त्या वर तुम्हाला घळीतुन गडाच्या दिशेने घेऊन जातात.  तिकडून तुम्ही पुन्हा उजवीकडे वर गडाच्या दरवाजाकडे जातात.  गडाच्या दरवाजा जवळ जी वाट जाते ती बघून तिथे पायऱ्या असल्याची काही चिन्ह दिसत नाही. पण गड आहे म्हणजे पायऱ्या असतीलच आणि ह्या पायऱ्या पण ब्रिटीशांनी उधवसस्त केलल्या अस्तिलच ह्यात काही शंका नाही.  तसेच दरवाजाचे हि काही अवशेष बाकी राहिले नाहीत, डाव्या बाजूला एक भिंत दिसते त्या वरून कळते हिते दरवाजा होता. आणि थोड आत जाताच उजव्या बाजूला दगडात कोरलेली श्रीगणरायाची मूर्ती आहे. त्याचा खाली भग्न अवस्थेत एक मूर्ती आहे. त्याची शेपुट बघून वाटते ती मारुतीरायाची असावी. त्याचाच बाजूला म्हणजेच प्रवेशदारा  समोर एक कोसळलेली  भिंत आहे. त्याचा एका दगडावर एकदम लहानसा वर्तुळाकार आकार आहे त्यावरून असा अंदाज लावता येतो, येथे बहुतेक काही तरी नक्षी किव्हा चिन्ह असाव. 
 
दरवाजातून प्रवेश केल्यावर उजवीकडे दिसणारा गणपती आणि त्याखाली भग्न अवस्तेत असलेली मारुतीची मूर्ती



गडावरील तट (पण हि भिंत पूल म्हणून बांधल्यासारखी वाटते
गडावरील पाण्याचा टाक्या


 दरवाजातून आत शिरताच तुम्हाला वाट उजवीकडे घेऊन जाते. ती एका तटबंदी वरती घेऊन जाते पण ती तटबंदी कमी तर दोन दगडाची छोटीशी दरी भरण्यासाठी भिंत बांधून पूल सारखी बांधली आहे अशी वाटते . गडावर काही  पाण्याचा टाक्या आहेत त्यातली एक सुखलेली आहे पण उर्वरित टाकीतले पाणी वापरण्यायोग्य नाही. बाकी गडावर प्राचीन अवशेष काही नाही. ह्या वरून हा गड आजूबाजूच्या परिसरावर लक्ष्य  ठेवण्यासाठी वापरात असावा असे कळते. गडाच्या उंच भागावर गेल्यावर भोवतालीचा पूर्ण माळशेज घाट दिसतो आणि त्याचा समोर असलेला हरिश्चंद्र गड आणि त्याबाजूची पर्वत रांग दिसते. तर त्याचा पायथाचा गावापाशी  पिपंळगाव धरण आणि त्या लागत बसलेलं खुबी, कारंजाळे आणि आजुबाजूचे गावं दिसतात.  पाठी फिरून पहिला असता निमगिरी-हनुमंत गड दिसतो तर अजून डावीकडे बघितले कि हडसर गड दिसतो . गडावर पोहचायला आम्हाला १. ३० तास लागला.




गड तसा  छोटा असल्यामुळे फिरायला जास्त वेळ लागत नाही पण आजूबाजूचं निसर्गरम्य दृश्य पाहण्यात वेळ जातो. ऊन जास्त असल्यामुळे आम्ही एक झुडपाचा खाली आडोसा घेऊन १० जणांनी जेवून घेतला. साधारन ३ वाजता आम्ही परतीच्या वाटेवर चालू लागलो. उतरते वेळी खालती सोंडेच्या एका पठारावर अचानक अनेक  माश्या घोळक्यात आल्या. प्रथमेश आणि मी पाठी होतो आम्ही मधमाशी म्हणून घाबरून पळालो आणि सगळ्यांना मधमाश्या म्हणून बोलून पळू लागलो .  पण त्या माश्या आमच्या पाठी न लागता. त्यापुन्हा कुठे  तरी अदृश्य झाल्या. आम्हाला जरा जीवात जीव आला बहुतेक त्या साध्या  माश्या होत्या.  नंतर प्रणव बोलला त्याने एकाचा ब्लॉग वाचला होता त्यात त्या ट्रेकर चा पाठी हि लागल्या होत्या पण त्या मधमाश्या नव्हत्या म्हणून सांगितले . आम्हाला गड उतरून करंजाळे फाट्यावर पोहचायला ४ वाजले. तितक्यात  कल्याण st  आली. ती पकडून आम्ही ६.४० ला कल्याणला पोहचलो. 

No comments:

Post a Comment