Wednesday, 10 May 2017

Kaldurg fort काळदुर्ग



काळदुर्ग

 बरेच दिवसाने नंदूने फोन करून विचारले ह्या रविवारी ट्रेक ला जाऊया का. पण ३ दिवस सतत सुट्ट्या होत्या,  म्हणून मी मित्रानं बरोबर बाहेर जायायचा ठरवल होता. पण काही कारणास्तव आमचा रद्द झाला. मग मी नंदूला फोन केला आणि बोललो आपण रविवारी ट्रेक ला जाऊ . पण कुठे जायायचा ठरला नव्हता ते ठरवायचं होता.

 मे  महिन्याचा तापत्या उन्हात ट्रेक करायचा म्हणजे तो कठीण किव्हा मध्य श्रेणीतला नसावा. हे डोक्यामध्ये ठेऊन मी काळदुर्ग करायचा ठरवला.  मी एका वेबसाइटवर काळदुर्ग चढायला १. ३० तास लागतो असा वाचला होता. आणि गुगल मॅप वर पण गडाचा परिसर आणि वाटेत झाडे भरपूर दिसली. म्हणून हा गड करायचा ठरवल.

मुंबई ते काळदुर्गचा पायथ्याचा प्रवास
 आम्ही तिघे जण होतो.  प्रणव, नंदू आणि मी. नंदू आणि मी लोअरपरेल  वरून येणार होतो आणि प्रणव डोंबिवली वरून येणार होता.  प्रणव सकाळची ५. ४३ ची डोंबिवली ते डहाणू  शटल पकडून येणार होता. त्यामुळे आम्ही विचार केला विरार वरून एकत्र प्रवास करू.  म्हणून आम्ही  दादर वरून ५. ४१ ची चर्चगेट ते डहाणू लोकल न पकडता त्याचा नंतरची विरार लोकल पकडून आम्ही विरारला डहाणू शटल पकडली.  आम्हाला पालघरला पोहचायला ७. ५० वाजले. पालघरला आम्ही नाश्ता करून पुढचा मार्गाला लागलो. 

काळदुर्ग गडासाठी आम्हाला वाघोबा मंदिरला जायायचा होता. त्यासाठी मनोरला जाणारी कुठचीही बस चालणार होती. आम्हाला पालघर पश्चिम वरून सकाळी ८. ३० ची पालघर ते मनोर एसटी भेटली. ती एसटी पकडून आम्ही वाघोबा मंदिर बस थांब्यावर उतरलो.  पालघर ते वाघोबा मंदीर अंतर ७ किमी आहे. अवघ्या १० ते १५ मिनिटात आम्ही पोहचलो. मंदिर रस्त्याला लागूनच आहे. मनोरचा दिशेने जातेवेळी मंदिर उजव्या हाताला दिसते.

वाघोबा  मंदिर ते काळदुर्ग गडाचा माथ्यावर पोहचण्याचा प्रवास
गडाचा पायथाशी असलेले वाघोबाचा मंदिर आणि मंदिराला लागून असलेलं छोटा दुकान.  ह्या दुकानाचा बाजूने गडावर जायायला  वाट आहे.
हाथपंम्प चा समोर वाट चालू होते. सुरवातीला मोठी वाट केलेली आहे.
वाघोबाचे मंदिर
आम्ही पाऊणे नऊला गड चढायला सुरवात केली. मंदिराला लागून एक छोटासा दुकान आहे. त्याचा बाजूने म्हणजेच आपल्या उजव्याबाजूने गडावर जायायला वाट आहे. तिथेच वाटेचा सुरवातीला खाली आपल्याला हात पंम्प लागतो.  गडावर जाणारी वाट चांगली मुरलेली आहे. त्यामुळे न चुकता गडावर पोहचता येते.  कोणी तरी दुर्गप्रेमींने  वाटेचा बाजूला दगड लावून आणि झाडे झुडपे साफ करून काम केलेले दिसते.

सुरवातीला थोडं वर चढल्यावर एके ठिकाणी , एक वाट सरळ उजवीकडे खाली जाते आणि  एक डावीकडे वर जाते. त्यामुळे न चुकता डावीकडच्या वाटेने वर चढावे.  थोडा वर चालून आल्यावर खालील फोटोत दिसत आहे तशी एक गोल जागा आहे तिथे हनुमान मंदिराचा फलक लावला आहे पण मंदिराचे काही अवशेष दिसत नाही. अर्ध्यातासात तुम्ही एका छोट्या कातळी पठारावर पोहचतात. हा पठार साधारण ३० ते ५० मीटर चा असावा.  पठारावर आल्यावर समोर उजवीकडे गड दिसतो. त्याच दिशेला उजवीकडे वाट जाते.  येथून तुम्ही अर्धा तासात गडावर पोहचतात.

हनुमान मंदिर म्हणून येथे फलक लावला आहे. पण मंदिराचे काही अवशेष दिसत नाही.
गडाचा माथ्यावर पोहचायचं आधी डावीकडे कातळ आहे. आणि उजवीकडे ५ मिनिटात चडून आपण गडाच्या माथ्यावर जातो. हया दोन्हीचा मध्ये उभे राहिला असता किंवा डावी कडच्या कातळावर उभे राहिले असता. आपल्याला उजवीकडे गडावर वाट जाते तिकडे मधेच वाटेचा बाजूला  तटबंदीचा एकदम छोटासा भाग दिसतो. तटबंदी वर गवात उगवला असल्यामुळे लगेच नजरेत पडत नाही. बहुतेक तटबंदी उध्वस्थ झालेली आहे, ह्यावरून मी अंदाज लावला, ह्या वाटेवर पूर्वी लांब तटबंदी असावी.

तटबंदीचा जवळून वर आल्यावर गडाचा माथ्याचा कातळाचा पायथ्यापाशी माथ्यावर जाण्यासाठी एक वाट उजवीकडे जाते आणि दुसरी डावीकडे. कुठच्या हि वाटेने गेलो तरी आपण फिरून माथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या जवळ पोहचतो.

उजवीकडून गेल्यावर एक छोटी ७ते ८ फुटाची टाकी लागते. आम्ही डावीकडून गेलो.  डावी कडे कातळात खोदलेली मोठी टाकी लागते.  टाकी पूर्णपणे सुखलेली आहे.  टाकीचा तळ कातळाचा असल्यामुळे पूर्ण सुकलेली होती. बहुतेक फक्त पावसाळ्यातच टाकीत पाणी साचत असावे.  टाकीचा बाजूने पुढे गेल्यावर, माथ्यावर जाण्यासाठी उजिवीकडे वर ७/८ पायऱ्या लागतात. ह्या पायऱ्या चडून आपण लगेच माथ्यावर पोहचतो. 

गडाचा माथा थोडा वर खाली असल्यामुळे एक उंच माथा लागतो आणि एक खाली त्याला लागून . उंच माथा बहुतेक पूर्ण कातळाचा आहे आणि दुसरा थोडा कातळाचा आणि थोडा आपला नेहमीचा डोंगराचा माथ्यासारखा आहे. आपण पहिले, खालच्या माथ्यावर पोहचतो  आणि मग वर कातळ माथ्यावर पोहचायला ७ते ८ पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्या चढल्यावर आपण लगेच गडाचा उंच कातळ माथ्यावर पोहचतो.

गडावर पोहचल्यावर अंदाज येतो हा गड टेहेळणी साठी वापरत असावे.  कारण गडावरती केवळ पाण्याची टाकी आहे. गडावरती बाकी वाड्याचे अवशेष आढळत नाही.

गडाच्या कातळाचा उंच माथा आकाराने छोटा आहे .  रुंदीला  २० फूट आणि लांबीला ३० ते ३५  फूट असावा . गडावर कातळात खोदलेली एक छोटीशी टाकी आहे. आणि कातळात केलेले छोटे छोटे गोल खड्डडे ( खोगीर) आहेत. गडावरील सगळ्या टाक्या सुकलेल्या होत्या. 




अर्धा तासात आपण ह्या कातळी  पठारावर पोहचतो आणि खालील फोटोत प्रणव आणि नंदू पठारावर विश्रांती घेताना आणि त्यांचा पाठी काळदुर्ग दिसत आहे


प्रणव आणि त्याचा पाठी काळदुर्ग दिसत आहे

लाल मध्ये गोल केला आहे तिकडे तटबंदी आहे आणि त्याचा बाजूने उजवीकडून आणि डावीकडून जाणारी वाट लाल रेषेने दाखवली आहे.

गडावरून दिसणारे दृश्य
गडाचा माथ्यावरून पूर्ण पालघर शहर दिसतो. तसेच लांबवर ची डोंगररांग  दिसते. ह्या डोंगर रांगेत नक्कीच जवळ पासचे गडकिल्ले दिसत असतील. पण मला ते ओळखता आले नाही. एकीकडे जवळच असलेल धरण दिसते. आकाश मोकळा असेल तर पश्चिमेचा समुद्र स्पष्ट दिसतो .  थोड्यावेळाने ऊन जरा कमी झाल्यामुळे आम्हाला समुद्र स्पष्ट दिसत होता . तसेच एकी कडे वैतरणा नदी दिसते.


माथ्यावरून दिसणारा समुंद्र

गडाचा

मेघोबा मंदिराजवळ पोहचण्याची वाट
कातळ माथ्यावरून पुन्हा परत फिरून पायऱ्या उतरल्यावर समोर डोंगराचा छोटा माथा आहे.  तिथून एक वाट समोर उजवीकडे खाली मंदिराजवळ जाते. ह्या वाटेने उतरत असतेवेळी आपण मनोरचा दिशेने उतरतो त्यामुळे आपल्याला मनोरला जाणारा रस्ता समोर दिसतो. ह्या वाटेने खाली गेलो असता १५ मिनटात आपण मंदिराजवळ पोहचतो. मंदिर झाडीत उघड्यावर आहे.  ह्या मंदिराला मेघोबा मंदिर बोलतात असे मी एका वेबसाईट वर वाचले होते.

मंदिर वाटेतच लागते त्यामुळे आजूबाजूला कुठेही शोधण्याची गरज लागत नाही. मंदिराला भिंती नाही.  त्यामुळे  मंदिराचा बाजूला जुन्या दगडाची २ फुटाची गोलाकार भिंत केली आहे. मंदिरात आत महादेवाची पिंड आणि एक मध्यम आकाराचा नंदी आहे. तसेच मंदिरात आत अजून हि काही पाषानावर कोरलेल्या मूर्ती आहे आणि फक्त आयताकृती पूजेला उभी करून ठेवलेले पाषाण हि आहेत .  पिंडीचा पाठी पाषाणावर कोरलेला शेषनागाचा पाषाण तुटलेल्या भग्न अवस्थेत आहे. तसेच एक पाषाणावर गणपतीचा चेहरा कोरलेला होता. हि मूर्ती  हि भग्न अवस्थेत होती 

आम्ही मंदिर बघून पुन्हा आलो त्यावाटेने पुन्हा गडावर गेलो आणि आलेल्या वाटेने पुन्हा गड उतरायला  सुरवात केली.  

उतरतेवेळी आम्ही एक पिशवीत जेवढा  होईल तेवढा  कचरा गोळा केला.  गडावर पूर्ण प्लॅस्टिकचा कचऱ्याचा विळखा आहे. आम्ही सगळा कचरा उचलायचा विचार केला असता तरी आम्हाला एक दिवस पूर्ण पडला नसता  आणि त्यासाठी १०/१२ गोणी हि लागल्या असत्या.  त्यामुळे आम्ही थोडा का होईना,  जेवढा जमलं तेवढा गोळा करून आणला. तो कचरा आम्ही गडाखाली न टाकता रेल्वे स्थानकातील कचरा डब्यात टाकला.

वाघोबा मंदिराजवळ खूप माकड असतात. रस्त्याने जाणारे गाडी वाले.  तसेच फळभाज्यांचा गाडी वाले माकडांना खायायाल टाकतात , म्हणून तुम्हाला फक्त मंदिराजवळच  खाली खूप माकड दिसतात. गडावर क्वचितच दिसतात. 

आम्हाला गड उतरायला  पाऊण तास लागला.  आम्ही दीड वाजता गडाचा पायथ्याचा मंदिरा पाशी पोहचलो.  
आम्ही २. ०८ ची एक्प्रेस ट्रेन पकडून दादरला साडेतीन ला पोहचलो. 


लांबून काढलेला  गडाच्या माथ्याचा फोटो. खालील फोटोत गडाचा माथ्यावर जाताना लागणाऱ्या पायऱ्या जवळून दिस. गडाचा माथा थोडा वर खाली आहे  हे ह्या फोटोतून दिसून येते. 

डाव्या बाजूच्या वाटेने येताना प्रणव आणि नंदू 


गडाचा उंच माथ्यावरील टाकी. खालील फोटोत लांबून फोटो काढलेला आहे






डाव्या बाजूने आल्यावर दिसणारी कातळातली मोठी  टाकी
मेघोबा मंदिराला जाणारी वाट. नंदू त्या वाटेने येत असताना. खाली बघितले असता समोर मनोरला जाणारा रस्ता  दिसत आहे 



मेघोबाचे मंदिर




गड उतरतेवेळी


No comments:

Post a Comment