जालना, बुलढाणा ३
भाग ३
मेहकर येथील प्राचीन मूर्ती, परडा येथील मालिकार्जून शिव मंदिर आणि उस्वाद येथील शिव मंदिर.
सतगाव-भुसरी येथील मंदिर, बीबी ची गडी पाहून आम्ही लोणार ला मुक्कामी आलो.
मेहकर
भटकंतीचा आज तिसरा दिवस, आज आम्ही मेहकर येथील बालाजी मंदिर, मठ, नृसिंह मुर्ती पाहून, मालिपेठ येथील अजून दोन प्राचीन मुर्ती पहिल्या, आणी नृसिंह मुर्ती जिथे ठेवली होती ती गुहा हि पहिली. ते पाहून आम्ही दुपारी परडा आणि उस्वाद येथील शिव मंदिर पाहिले.
सकाळी साडेसात ला आम्ही मेहकर साठी निघालो.
लोणार ते मेहकर अंतर २१ कि.मी आहे. त्यामुळे आम्ही लोणार ला नाश्ता करुन निघालो. मेहकर ला पोहोचायला आम्हाला पाउण तास लागला.
मेहकरला आम्ही पहिले बालाजी मंदिर पहायला गेलो.
मंदिर शंभर वर्षे जुन असावे. पण मंदिरातील विष्णु ची मुर्ती बाराव्या शतकातील आहे. मंदिरात फोटो काढून देतात. अगदी मूर्तीचा सुधा. मूर्तीला बालाजी का म्हणतात माहित नाही पण मुर्ती विष्णुची आहे. साधारण ११ फुट उंच आहे. मूर्ती कार्तिकी पौर्णिमा निमित्ताने पूर्ण फुल हाराने सजली होती. पण मूर्तीच्या बाजुच्या प्रभावळीवर विष्णुचे दश अवतार दिसत होते. विष्णु च्या डाव्या पायाजवळ लक्ष्मी मातेची मुर्ती आहे.
मुर्ती बद्दल गावातले सांगतात, मुर्ती ई स वीसन अठराशे मध्ये मंदिर परिसरात एका सागाच्या पेटीत, चंदनाच्या भुस्या मध्ये ठेवलेली सापडली. त्या सोबत ताम्रपट होता. पण ताम्रपट ब्रिटिश सरकारने नेले. मुर्ती ही नेणार होते पण गावातल्या लोकांनी लगेचच त्या जागी मंदिर उभारून तिची पूजा अर्चना सुरू केली. त्यामुळे ब्रिटिश सरकारने मूर्तीला हाथ लावला नाही. बाकी मुर्ती बद्दल वर्णन मंदिरात फलक लावला आहे, त्याचा मी फोटो लावला आहे.
मंदिराच्या गर्भ गाभार्या वर वेद मधील श्लोक लावला आहे. त्यात प्रणिती नदीचा उल्लेख आहे, त्यावरून मेहकर प्राचीन आहे असे म्हणतात.
मंदिर परिसरात अजून ही काही मंदिर आहेत. बालाजी मंदिराचा समोर (बाहेर) गरुड च मंदिर आहे. मुर्ती च्या पाठी आरसा आहे, त्यात पाहिला असता बालाजी मुर्ती दिसते.
गरुड मंदिराच्या बाजूला, डावीकडे शिवाच मंदिर आणि उजवीकडे मारूतीचे मंदिर आहे. तिन्ही मंदिर लहानच आणि नवीनच आहेत. पण शिव मंदिराचे खांब फक्त प्राचीन आहेत. बालाजी मंदिराच्या समोर खाली प्रणिती/पैनगंगा नंदी दिसते, पण लोकांनी तिचा नाला केलेला दिसत होता.
मंदिराच्या पाठी ( मंदिर परिसरात) ही तीन मंदिर आहे, भवानी माता, कार्तिक आणि केशव. त्यातील उजवीकडचे केशवराज मंदिर मधील मुर्ती प्राचीन आहे. मुर्ती दोन फुट उंच असावी. ही मुर्ती जेथे आहे त्याच ठिकाणी बालाजीची-श्री शारंगधर मुर्ती आणि केशवराजची मुर्ती सोबत सापडली. केशवराज मूर्तीच्या प्रभावळीवर हि विष्णु दशावतार आहेत.
मंदिर परिसराच्या दरवाजावर (गेट) ही प्राचीन अवशेष दिसतात. तसेच मंदिराच्या दरवाजाच्या (गेट) च्या बाजूला आपल्याला रस्त्याला एक बुरुज आणि थोडी तटबंदी दिसते.
मंदिर बघून आम्ही मठ बघायाला गेलो. मंदिराच्या इथून आम्ही सरळ रस्त्याने खाली गेलो असता, आपल्याला दरवाजा (गडीचा दरवाजा सारखा) लागतो.
दरवाजातून पुढे आलो असता, डावीकडे मठ लागतो. मठाला दगडी बांधकामाची भिंत आहे, त्यामुळे बाहेरून लगेच दिसत नाही. मठा मध्ये आत नक्षीदार दगडी खांबाचा मंडप आहे. समोर चौरसाकृती सुकलेले कुंड दिसते. मठ बघून आम्ही नृसिंह मंदिर बघायाला गेलो.
नृसिंह मंदिर
मेहकर मध्ये खूपच गल्लीतून फिरायला लागते. त्यामुळे गुगल नक्षा पेक्षा ही माणसांनाच विचारायला लागते.
आणि लगेच कळत नाही. विचारत विचारत आम्ही मंदिराजवळ पोहोचलो.
नृसिंह मुर्ती मेहकर जवळील माळीपेठ/मळीपेठ रोड येथे भुयारात मिळाली. पण सागरने मला सांगितले, प्राचीन काळात नृसिंह देवाची पूजा उपासना एकदम कडक शिस्तीत करायचे. त्यामुळे नरसिंह चे मंदिर असे जमिनी खाली भुयारात असायचे. ते भुयार पाहून मला हि पटले, कारण आत छोट्या मंदिर सारखेच होते.
पाऊणे अकरा वाजता आम्ही नृसिंह मंदिरात गेलो तेव्हा पुजारी पूजा करत होते, त्यामुळे मूर्ती वरील सगळे अलंकार आणि वस्त्रं काढून बहुतेक अभिषेक/स्नान घालत असावेत. त्यामुळे आम्हाला मूर्तीचे मूळ रूप दिसले. आमची वेळ चांगली होती त्यामुळे आम्हाला ती मुर्ती मुळ स्वरुपात दिसली. मुर्ती बद्दलची सविस्तर माहिती मंदिरात फलकावर लावली होती, त्याचा फोटो मी खाली दिला आहे.
मुर्ती 2 फुट उंच असावी पण सुंदर दिसत होती. मंदिराच्या बाजूला तिथेच एक संत/बाबा ह्यांच मंदिर आहे. त्यांना ती मुर्ती भेटली होती.
माळीपेठ/मळीपेठ येथील दोन विष्णू मंदिर
पुजार्याने आम्हाला मेहकर जवळ माळपीठ येथे विष्णुच्या अजून दोन प्राचीन मुर्ती आहेत ह्याची माहिती दिली. त्यातील एक मुर्ती गोपाळ बाळकृष्ण मंदिर मध्ये आणि एक पांडुरंग जावळे म्हणुन गृहस्थ आहे त्यांचा घरी आहे, असे सांगितले. मेहकर पासून माळपीठ १\२ कि.मी असल्यामुळे आम्ही त्या मुर्ती पाहायला गेलो.
गोपाळकृष्ण मंदिर येथील विष्णू मूर्ती
पहिले आम्ही गोपाळकृष्ण मंदिरात पोहोचलो. हि मुर्ती मुख्य मंदिरात आहे. मंदिर नव्याने बांधलेले आहे, आत देवडी सारखं पुन्हा छोट मंदिर आहे त्याला लोखंडीदार लावुन टाळा लावलेला असतो. त्यात हि विष्णुची मुर्ती आहे. मुर्ती साधारण दोन ते अडीच फुटाची असावी. गावातील लोक ह्या मूर्तीला गोपाळकृष्ण मुर्ती बोलतात. बहुतेक त्यावरूनच ह्या मंदिराला नाव दिलं आहे. गावकरी बहुतेक नित्य नेमाने पूजा अर्चना करत असावे, कारण मूर्तीला वस्त्रं आणि पुष्पहार घातले होते. त्यामुळे मुर्ती आम्हाला मुळ रुपात पाहता आली नाही. मंदिराच्या समोर बाहेर छोट्या पत्र्याचा छताखाली शिवाची पिंड, नंदी, एक जुनी झिज झालेली मुर्ती ठेवली आहे. बहुतेक ती कुठच्या तरी प्राचीन मंदिराच्या खांबावर असावी असी दिसते. तसेच तिथे एका मूर्तीचा झिज झालेला भग्न मूर्तीचा मुखवटा आहे.
पांडुरंग जावळे ह्यांची विष्णुची मुर्ती
ती मुर्ती पाहून आम्ही पांडुरंग जावळे ह्यांची विष्णुची मुर्ती पाहायला गेलो. मंदिरा पासून अगदी ३००\४०० मीटर अंतरावर असावे. गावात कोणाला ही विचारले असता तुम्हाला सांगतील. जावळे ह्यांचे स्वताचे दुकान आहे त्याचा पाठी मागेच त्यांच घर आहे.
आम्ही मंदिर पासून दुचाकीवरून २ मिनटात जावळे ह्यांचा दुकाना जवळ पोहोचलो, तिथून डावीकडे दुकानाच्या बाजूने एक छोटा रस्ता जावळे ह्यांचा घराजवळ जातो. अगदी हाकेच्या अंतरावर आहे.
आत मध्ये गल्लीत अजून वस्ती आहे.
जावळे ह्यांचे दोन मजली घर आहे. त्याचा बाहेरच त्यांनी मंदिर बांधून ही मुर्ती ठेवली आहे. जावळे ह्यांना घर बांधत असताना, आताच्या त्यांचा दरवाज्याच्या पायऱ्या आहेत, तिथे हि मुर्ती सापडली. तो दिवस अक्षय तृतीया होता. म्हणून त्यांनी त्यांचा दरवाजा समोर तिथेच मंदिर बांधले आणि मुर्ती स्थापित केली. ही मुर्ती सुद्धा दोन ते अडीच फुटाची असावी. जावळे मूर्तीची नित्य नेमाने पूजा करतात. त्यामुळे ह्या हि मूर्तीला धोतर वस्त्रं आणि पुष्प हार घातला होता. त्यामुळे आम्हाला मूर्तीचा पूर्ण मूळ रूप पाहता आले नाही. जावळे यांनी आम्हाला मुर्ती आत जाऊन नीट पाहून दिली.
जावळे ह्यानी आम्हाला जिथे नृसिंह देवाची मूर्ती सापडली ती गुहा दाखवली. जावळे ह्यांचा घराचा बाजूला डावीकडे गाव गल्लीत रस्ता जातो. तिकडे घेऊन गेले अगदी दोन मिनटात आम्ही चालत पोहोचलो. गल्लीच्या छोट्या रस्त्याचा बाजूलाच गुहा आहे. पण लगेच कळत नाही. त्या जागेला वर छप्पर केले आहे, गुहा खाली आहे. ६\७ पायऱ्या उतरल्यावर आपण गुहे च्या दारातून आत गेल्यावर आपण एका चौरस खोली मध्ये गेल्या सारखे वाटते. आत ४\५ मानस बसतील आणि वाकून उभी राहतील अशी जागा आहे. दरवाजातून आत गेल्यावर, पुन्हा डावीकडे एक छोटा भुयाराचा दरवाजा (चौकट) लागतो. भुयाराच्या पहिल्या दरवाजा पेक्षा ही आतील दरवाजाची चौकट थोडी लहान आहे. मी अगदीच गुडघ्यांवर आणि डोपरावर लहान मुलां सारखा गेलो. आत मध्ये गुहेच्या ह्या मुख्य गाभाऱ्यात मुर्ती होती. मूर्तीचा भद्र पिठ अजून तिथेच ठेवलं आहे. आत मध्ये थोडं वाकून उभा राहता येईल येवढा उंच आहे. कारण आत थोड घुमट सारखं भाग आहे. आणि २\३ माणस उभे राहतील येवढी जागा आहे.
गुहेच्या मी विडिओ काढला आहे. लवकरच YouTube वर टाकेल.
गुहा पाहून आम्ही पुन्हा जावळे ह्यांचा घराजवळ आलो. तिथून पुन्हा उजवीकडे पाठी मागे दोन मिनिटावर जुनी बारव आहे. जावळे ह्यानी आम्हाला ती ही दाखवली. बारव पूर्ण पणे नष्ट झालेली दिसते, बाजूला पूर्ण झाडी झाली होती. बारवचे काही दगड दिसत होते. पण ती बारव कमी आणि कचरा कुंडी जास्त वाटत होती.
श्री पांडुरंग जावळे ह्यानी आम्हाला केलेल सहकार्य आणि त्यांनी केलेला पाहुणचार आम्ही कधी विसरणार नाही.
कांचन महाल
तिथून आम्ही कांचन महाल पाहायला गेलो. २ कि.मी वर असल्यामुळे, आम्ही लगेच पोहोचलो. महाल तसं काही पाहण्यासारखे नाही आहे, त्यामुळे आम्ही ५ मिनटात पाहून,
पुन्हा मेहकर मार्गे निघालो. वाटेत आम्हाला मेहकरला रस्त्यात एक प्राचीन वास्तू दिसली ती पाहायला गेलो. दिसताना एखाद्या सरदाराची समाधी असावी अस वाटत होतं. पण तिथे गेल्यावर तेथील लोकानी सांगितले दत्त ( दत्तगुरू ) मठ दिसले. आम्ही ते पाहायला गेलो. आत मध्ये दरवाजा बंद असल्यामुळे लोखंडी दरवाजातून पाहताना समाधी सारखेच दिसत होते pan बहुतेक लोकानी तिथे दत्ताची मुर्ती/ फोटो ठेवून मठ केला असावा, असे मला वाटले. बहुतेक मी चूक ही असेल.
परडा येथील मल्लिकार्जुन शिव मंदिर
ते पाहून आम्ही लोणारला निघालो. कारण आम्हाला आता परडाला मल्लिकार्जुन शिव मंदिर पाहायला जायचे होते. त्यासाठी आम्हाला पुन्हा लोणार मधूनच जायचे होते. मेहकर ते परडा अंतर ३४ कि.मी आहे. आणि लोणार ते परडा १२ कि.मी.
आम्हाला साधारण १ तास पोहोचायला लागला. मंदिर थोडं गावाचा बाहेरच आहे. दुपारी वाजता आम्ही मंदिरात पोहोचलो.
मंदिर परिसरात छोटे कुंड आहेत. त्यामुळे पावसात त्यातील पाण्यामुळे मंदिरात आणि मंदिर परिसरात पूर्ण पाणी भरते. ह्या वर्षी पाऊस जास्त लांबला होता म्हणुन आम्ही गेलो होतो तेव्हा पूर्ण शेवाळ झाले होते आणि काही ठिकाणी त्यावर पाणी ही होतं. त्यामुळे जपूनच पाय टाकायला लागत होता. मंदिर बंद होतं,त्यामुळे गाभाऱ्यात जाता आले नाही. बाहेरूनच बघायला लागले. पण मंदिरातील मध्य गाभाऱ्यात ७\८ फुट लांब झोपलेली मुर्ती होती. बहुतेक शेषशाही विष्णु अथवा नुसता मुद्रा अवस्थेतील विष्णु मुर्ती होती. मुख्य गाभाऱ्यात आत शिवाची पिंड आहे. आणि दोन मुर्ती देवडी मध्ये दिसत होत्या. लांबून प्राचीन आहे की नाही कळत नव्हते.
मग आम्ही मंदिर परिसरात मंदिराच्या पाठी भिंतीला लागून ठेवलेल्या विष्णु अवताराच्या मुर्ती पाहिल्या. ह्या मुर्ती दीड फुटाचा असतील, त्यात कूर्म (कासव), मत्स्य, बलराम, बुद्ध (बहुतेक) आणि नृसिंह ह्यांच्या मूर्त्या चांगल्या अवस्थेत होत्या. त्या बाजूला अजून काही मूर्त्या भग्न झालेल्या अवस्थेत होत्या. मंदिर परिसरात भिंतीला लागून अश्या अजून काही मुर्ती दिसतात, पण ओळखता येत नाही.
मंदिराच्या दरवाज्याच्या बाजूला नागाची हि मुर्ती आहे.
तसेच तिथे एक खांब आहे त्याच्यावर लहान शिल्प दिसतात. त्यात काम नृत्य, ढोल वादक, काम शिल्प आहेत, तर खांबाचा एका बाजूला गद्देगळ सारखं ही शिल्प दिसते.
मंदिर बघून बाहेर आल्यावर मंदिरा समोर झाडा खाली एक विरघळ सारखी छोटा खांब आहे. पण त्याचा फक्त वरच्या बाजूला शिल्प आहे. मंदिर परिसराच्या बाहेर दरवाज्याच्या उजवीकडे थोडं आत एके ठिकाणी एक सात चेहरे असलेली पट्टी सारखी दगडाची शिळा आहे. त्याचा अर्थ काय कळला नाही. त्याचा बाजूलाच एक घोडेस्वारची रंग मारलेली दगडी मुर्ती आहे. तिचा तळ बघितला असता असे वाटते बहुतेक मंदिराच्या खांबाच्या वर मुर्ती असतात तशी असावी.
मंदिर बघून आम्ही उस्वाद गावातील मंदिर पाहण्यासाठी निघालो.
उस्वाद गावातील मंदिर
परडा ते उस्वाद अंतर १५ कि.मी आहे. आणि लोणार ते उस्वाद २२ कि.मी. पण इथे मंठा ते उस्वाद एस.टी बस ठराविक वेळ मध्ये आहेत. बहुतेक एक लोणार ते मंठा वाया उस्वाद पण एस.टी आहे. आमची बाइक असल्यामुळे आम्ही अर्ध्या तासात मंदिरात पोहोचलो.
मंदिर पूर्णा नदीच्या शेजारी आहे. आम्ही संध्याकाळी ५ वाजता पोहोचलो. त्यामुळे संध्याकाळी नंतर सुर्यास्त वेळी वातावरण सुंदर दिसत होते.
मंदिर नव्याने बांधकाम केलेले आहे. पण आत मंदिरात प्राचीन आहे. आत पूर्ण दगडी खांब आहेत. आणि आत मंडपाच्या वरती छतावर चार कोपर्यात सुंदर शिल्प कोरलेली आहेत. मध्य भागी श्रीकृष्ण. त्याचे फोटो मी शेवटी ठेवले आहेत. त्यामुळे जास्त वर्णन लिहित नाही.
मंदिर बघून आम्ही पुन्हा लोणार साठी निघालो.
वाटेत येते वेळी उस्वादच्या आधी अंदाजे ४\५ कि.मी वर, एका टेकाडवर गडी सारखी वास्तू दिसली होती. आम्ही ती बघायला जाणार होतो पण आम्ही चुकून दुसर्याच गावात शिरलो. तिथे हि आम्हाला बाहेरून गडी सारखे अवशेष दिसले होते. पण ती, ती गडी नव्हती. पण त्या गावात हि कोणाच्या तुटलेल्या वाड्या सारखे अवशेष दिसत होते. त्यात संध्याकाळ झाली होती आणि काळोख पडला होता, म्हणून मग आम्ही ती गडी न शोधता, सरळ लोणारला हॉटेल वर गेलो.
दुसर्या दिवशी आमच्या भटकंतीचा चौथा दिवस होता. आणि आम्ही त्या दिवशी पूर्ण लोणार बघून संध्याकाळी सिंदखेडराजाला वस्तीला जाणार होतो. त्याबद्दल मी पुढील ब्लॉग/लेखात लिहलं आहे.
|
बालाजी मंदिर मधील श्रीविष्णूची मूर्ती |
|
बालाजी मंदिर, मेहकर |
|
केशवराज मूर्ती, मेहकर |
केशवराज मूर्ती चे मंदिर. इथेच श्री विष्णूची मूर्ती मिळाली होती.
|
गरुड मूर्ती, बालाजी मंदिर, मेहकर |
शिव मंदिर, बालाजी मंदिर, मेहकर. ह्या मंदिराचे खांब प्राचीन दिसतात.
मंदिराचा एका बाजूला बाहेरून बुरुज आहेत
|
मठ, मेहकर |
|
हा दरवाजा रस्त्याला लागतो. त्याचा उजवीकडे मठ आहे. |
|
मंदिर परिसरात असे बरेच जुने वाडे किंवा घर पहायला मिळतात. |
|
मंदिर परिसरात असे बरेच जुने वाडे किंवा घर पहायला मिळतात.
|
नरसिंह मूर्ती, मेहकर
|
गोपाळकृष्ण मूर्ती,गोपाळकृष्ण मंदिर. माळीपेठ/मळीपेठ रोड, मेहकर |
|
मंदिरच्या बाहेर ठेवलेल्या काही मूर्ती |
|
गोपाळकृष्ण मंदिर, माळीपेठ/मळीपेठ, मेहकर |
|
पांडुरंग जावळे ह्यांचे घर, आणि घराच्या बाजूला बांधलेल्या मंदिरात प्राचीन विष्णूची मूर्ती ठेवली आहे.
|
|
पांडुरंग जावळे ह्यांची विष्णूची प्राचीन मूर्ती. |
|
पांडुरंग जावळे ह्यांचा घरापासून, अगदी काही अंतरावर हि बारव आहे. |
|
नरसिंह मूर्ती भेटली ती गुहा. माळीपेठ/मळीपेठ, मेहकर. |
|
गुहेच्या आतील फोटो. गुहेच्या आतील विडिओची लिंक खाली दिली आहे.
माळीपेठ/मळीपेठ, मेहकर, नृसिंह मुर्ती गुहा मंदिर विडिओ लिंक
https://youtu.be/BYLrCf6809s |
|
कांचन महाल, मेहकर |
|
दत्त मंदिर, मेहकर |
|
दत्त मंदिर, मेहकर |
|
दत्त मंदिर, मेहकर |
|
दत्त मंदिर, मेहकर |
|
नरसिंह मंदिर, मेहकर. |
|
दत्त मंदिर आतील फोटो. |
|
परडा येथे जाताना, वाटेत कुडपण येथे दिसलेला दरवाजा |
|
परडा येथे जाताना, वाटेत कुडपण येथे दिसलेला दरवाजा |
मल्लिकार्जुन मंदिर, परडा
|
मल्लिकार्जुन मंदिर, परडा |
|
परडा येथील मल्लिकार्जुन मंदिर |
|
परडा येथील मल्लिकार्जुन मंदिर |
|
परडा येथील मल्लिकार्जुन मंदिर |
|
परडा, मल्लिकार्जुन मंदिर. मंदिराचा बाहेर उजव्या बाजूला हे सात चेहऱ्यची शिळा आणि एक घोडेस्वार ची शिळा आहे. |
|
मल्लिकार्जुन मंदिर, परडा |
|
उस्वाद येथील शिव मंदिर |
|
उस्वाद येथील मंदिर |
|
उस्वाद येथील मंदिर |
माळीपेठ/मळीपेठ, मेहकर, नृसिंह मुर्ती गुहा मंदिर विडिओ लिंक
https://youtu.be/BYLrCf6809s