जालना, बुलढाणा प्राचीन ४- लोणार दर्शन, अंजनीची बारव
चौथ्या दिवशी आम्ही लोणार पाहून संध्याकाळी सिंदखेडराजाला वस्तीला गेलो. वाटेत अंजनीची बाराव पाहून पुढे गेलो. सिंदखेडराजाला खूपच कमी हॉटेल्स आहेत, त्यामुळे लोणार वरुन सकाळी लवकर उठून आलो असतो, तर बरं झालं असतं. असे वाटू लागले. पण बड्या मेहनतीने शेवटी एक हॉटेल मिळाल. त्यामुळे सिंदखेडराजाला राहण्याची योजना करू नका.
लोणार दर्शन
लिंबी बारव
लिंबी बारव
आज आम्ही सकाळी उठून पूर्ण लोणार फिरायचा ठरवलं. सगळ्यात पहिला आम्ही लिंबी बारव बघायला गेलो. बारवचा दरवाजा बंद होता. बहुतेक कोरोना मुळे बंद ठेवली होती. बारवला लोखंडी जाळीचा कुंपण होता, तेथे राहणारे मुलांना पाहून आम्हीही तसेच त्यावरून उडी मारून आम्ही गेलो.
बारवची अवस्था खराबच होती. त्यामुळे जास्त काही नक्षी काम दिसल नाही, बहुतेक जास्त नक्षी काम नव्हते. त्यामुळे आम्ही बारव पाहून दैत्य सुदन मंदिर पाहायला गेलो.
लिंबी बारव |
दैत्यसुदन मंदिर |
दैत्यसुदन मंदिर |
दैत्य सुदन मंदिर
दैत्य सुदन मंदिर खूपच सुंदर आहे. मंदिर पाहता, आपण कर्नाटकच प्राचीन मंदिर पहात आहोत असे वाटते. पण मंदिर आतून मात्रं साध्या विटांच किंवा जास्त कलाकृती केलेल दिसत नाही. बहुतेक मंदिर आतून मजबूत व्हावे म्हणून मंदिरात काही बद्दल केले असावेत, किंवा पुन्हा नवीन काम केले असावे. असे मला वाटते.
मंदिराच्या बाजूला, आपल्या डाव्या बाजूला छोट प्राचीन मंदिर आहे. त्यात ब्रह्म, विष्णु आणि गरुड मुर्ती आहेत. आम्ही लवकर गेलो होतो. त्यामुळे तिथे असलेल्या पहारेकरीची नऊ वाजता येण्याची वाट पहात होतो. पण तो काही आला नाही. मग आम्ही दहा वाजता, लोणार सरोवर पहायला निघालो.
धर्मशाळा
सरोवरलाजो रस्ता जातो तिथे सरोवरला पोहोचण्याआधी एक चौक लागते. त्याचा डाव्या बाजूला रस्त्यालाच पण थोडी उंचावर अशी धर्मशाळा लागते, ती पाहिली. धर्मशाळा बंदच होती, त्याचा लोखंडी दरवाजा वरुन गेलो, बहुतेक कोरोनामुळे लोकांसाठी बंद होती.
लोणार सरोवर आणि सरोवर काठाची मंदिर
लोणार सरोवर जग प्रसिद्ध आहे, मला जास्त काही सांगायची गरज नाही. पहिला सुरवातीचे गोमुख मंदिर आणि पापहरेश्वर मंदिर पाहून, आम्ही तलाव काठावरची मंदिर पाहायला गेलो.
गोमुख मंदिर नंतर खाली सरोवर कडे जाताना वाटेत अजून काही प्राचीन मंदिर लागतात. गोमुख मंदिर नंतर कुमारेश्वर मंदिर, चोपड महादेव मंदिर, यज्ञेश्वर महादेवी मंदिर, कपिला संगम मंदिर, विष्णु बघिच्छा मंदिर, रामायण मंदिर, वाघ महादेव मंदिर, मोर महादेवी मंदिर, कमळजा देवी मंदिर.
कमळजा देवीच्या मंदिराच्या पुढे ही एक अंबरखाना आहे. पण कोरोना मुळे सरोवर बंद असल्यामुळे तेथील झाडी खूप वाढल्यामुळे जंगल झाले होते. त्यामुळे तेथील वाट बंद केली होती. सागर ह्याआधी जाऊन आला होता, त्यामुळे त्यांनी सांगितले. सरोवर काठ मोकळा असतो आणि तिकडे काही विशिष्ट दगड हि दिसतात. पण पूर्ण जंगल वाढल्यामुळे, सरोवराचा काठा पर्यंत जंगल पसरले होते, त्यामुळे काठ दिसत नव्हता.
नंतर आम्ही view tower वरुन सरोवराचा दृश्य पाहायला गेलो. इथे हि वेगळी तिकीट घ्यायला लागते. पुन्हा इथे DSLR कॅमेराने फोटो काढून देत नव्हते. पण आम्ही सरोवर पहायला जाताना खाली जंगलात जाते वेळी, (माझ्या कॅमेरा माझा गळ्यात लटकलेला होता) पावती फाडली होती. ती दाखवली त्यावेळी त्यांनी आम्हाला फोटो काढून दिले. सागरकडे पन DSLR होता, पण त्याच्या बॅगेत होता, त्यामुळे त्या वन अधिकाऱ्याला कळल नाही. पण त्या पावतीचा आम्हाला इथे फायदाच झाला. एकच पावती असल्यामुळे, आम्ही दोघांनी आलटून पालटून एकमेकांचे कॅमेरे काढत होतो. कारण पुन्हा एक पावती एक कॅमेरा असा काही बोलायला नको, म्हणून आम्ही धोका पत्करला नाही.
सरोवर पाहून आम्ही बारा वाजता हॉटेल वर पोहोचलो.
तसेच आम्ही बॅग घेऊन सिंदखेडराजा साठी निघालो. वाटेत आम्ही अंजनीची बारव पाहिली आणि वस्तीला पोहोचलो.
अंजनीची बारव
अंजनी लोणार पासून सुलतानपूर मार्गे १६.९ कि.मी आहे. आम्ही अर्ध्या तासात तिथे पोहोचलो.
पाऊस जास्त झाल्यामुळे बारव एकदम भरली होती, त्यामुळे नीट पाहता नाही आली. तरी पण बारवच्या एका बाजूला छोटा मंडप दिसतो. बाकी बारवच्या तीन बाजूला पायऱ्या आहेत. आम्ही ४.३० वाजता, सिंदखेडराजासाठी पुढे निघालो. अंजनीवरुन सिंदखेडराजा ४१.४ कि.मी आहे. आम्हाला पोहोचायला एक ते सव्वा तास लागला.
त्यानंतर आम्हाला हॉटेल शोधायला वेळ लागला. शेवटी एक बालाजी लॉज मध्ये आम्ही ९०० रुपये भाडे देऊन राहिलो. पण हॉटेल ठीक होत.
दुसर्या दिवशी, आम्ही सकाळी लवकर उठून देऊळराजा येथील गडी, आणि काही बारव पाहणार होतो. आणि नंतर सिंदखेडराजा येथील लखोजीराव जाधव ह्यांचा राजवाडा, समाधी स्थळ, प्राचीन मंदिर आणि बारव पाहून जालना साठी निघणार होतो. वर सांगितल्याप्रमाणे आम्हाला हॉटेल शोधायला खूप मुश्किल झाले.
गोमुख मंदिर |
कमळजा देवी मंदिर |
धर्मशाळा |
धर्मशाळा |
लोणार सरोवर view tower वरून टिपलेले दृश्य. |
No comments:
Post a Comment