Tuesday, 21 February 2017

कैलासगड किंवा घोडमांजरीचा डोंगर

कैलासगड किंवा घोडमांजरीचा डोंगर (फेब्रुवारी २०१७)

कैलासगडाचा वडुस्ते गावातून टिपलेला दृश्य


आतापर्यंत मी बरेच ट्रेक केलेआहेत . पण कैलासगडा वरून दिसणाऱ्या मुळशी धरणाच्या निळसर पाण्याचा दृश्य अजून पर्यंत दुसऱ्या कुठच्या गडावरून मला एवढ अप्रतिम दिसला नाही. कैलास गडाचा हे नाव ह्या गडाला कशे ठेवले माहित नाही.  पण मुळशी धरण आणि भोवतालीच्या निसर्गाच सुंदर दृश्य आणि सहयाद्रीमधील मनाला प्रसन्न करणारी शांती ह्या वरून ठेवले असेल असा मला वाटते. गडाचा इतिहास काही मला नेट वर फारसा मिळाला  नाही. पण हा गड टेहळणी साठी (watchtower) वापरत असावे असे मी नेट वर वाचले. गडावर काही उध्वस्थ वास्तू  व्यतिरिक्त काही अवशेष आढळत नाही आणि गडाला कुठेही तटबंदी आणि बुरुज हि नाही.
कैलासगडावरून दिसणारे मुळशी धारणाच अप्रतिम दृश्य


दोन चार दिवस आमचा ग्रुपवर कुठे जायायच आणि कोण येणार ठरत नव्हत. आदल्या दिवशी सर्वेशने फोन करून सांगितला माझा गाडीने जाऊ तस मग आम्ही कैलास गड करायचा ठरला. सोबत विजेंद्र ही आला.

पोहचण्याचा मार्ग
तुम्ही जर ST ने जाणार असाल तर बहुतेक तुम्हाला वस्ती साठी जायायला लागेल.  लोणावळा ते वडुस्ते गाव st आहे. पण मला
ST ची वेळ माहित नाही पण एक गावकरी काकाने सांगितले एक ST सकाळी ११ किंवा १ ला येते ती पुन्हा लगेच जाते आणि दुसरी संध्याकाळी वस्तीला येते  आणि सकाळी लवकर निघते.  पण तिचा वेळ आम्हाला माहीत नाही पडला. 
पण जर तुम्हाला १ दिवसात गड करायचा असेल तर खाजगी गाडी करून जावे. आम्ही सकाळी 7.30 ला खान्देशवर स्थानकाबाहेर सर्वेशला भेटून नाश्ता करून निघालो. तिथून आम्हाला लोणावळ्याला पोहचायला १तास लागला. लोणावळावरून पुढे वडुस्ते गाव ४८कि मी आहे.
लोणावळ्यावरून आम्ही भुशीधरण - लायन पाँईट - कोरीगड - आंबेगाव - भांबुरडे - अहिरवाडी, पिंप्री फाटा, वांद्रे गाव मार्ग वडुस्ते गावी पोहचतो.

मुंबई ते वडुस्ते साधारण १३७ किमी आहे. आणि लोणावळा ते वडुस्ते ४९ किमी.
पिंप्री फाटा वरून एक रस्ता पिंपरी गाव (अंधरबन ट्रेक सुरवातीचा पाँईट) मार्गे ताम्हीनी घाटातुन पालीला जातो. तर एक रस्ता वाद्रे.गावातुन वडुस्ते गावात. आंबेगावापासुन पुढील बहुतेक रस्ता खराब आहे.

पण तुम्ही कोकणातून हि पालीमार्गे - ताम्हीणीघाट - पिंपरी गाव - पिंप्री फाटा मार्गे - वडुस्ते येऊ शकतात. पण तुम्हाला ह्या मार्गे अंदाजे २५/३० किमी जास्त अंतर कापायला लागेल.

गड चढायला कुटून सुरवात करावी 
वडुस्ते गावात पोहचल्यावर थोडा पूढे गेल्यावर एका खिंडीतून पुढचा गावात रस्ता गेल्या सारखा वाटतो आणि तिथेच रस्ताचा बाजुला एक विजेचा मुख्य युनिट असलेला खांब लागतो (ट्रांसफाँरमर) आणि एक कैलासगड / घोडमांजर डोंगर नावाचा छोटा फलक लागतो. तिथुन ऊजवा बाजुला कैलासगडावर वाट जाते.

जिथे गडाची वाट सुरवात होते तिथे उजवाबाजूला कैलासगडचा डोंगर आणि डाव्या बाजूला छोटी टेकडी आहे. नीट बघितल तर हि पूर्ण गडाचा डोंगराची अखंड सोंड आहे. पण रस्तामुळे सोंड विभागून डाव्याबाजूला छोटी वेगळी टेकडी झाली आहे. आणि उजव्या बाजूला गड वेगळा झाला आहे
रस्त्याचा बाजूचा विजेचा मुख्य युनिट आणि त्याचा समोरून गडाची वाट उतरतेवेळी विजेंद्र आणि सर्वेश.
तिथेच रस्त्याला फलक दिसत आहे.

कैलासगड/ घोडमांजरीचा डोंगराचा फलक

डोंगराचा सोंडेची पहिली टेकडी आणि त्याबाजूला लाल रंगात अंदाजे दाखवलेली वाट.

गडाच्या माथ्यावर वर आल्यावर उजवीकडे भगवा झेंडा लावलेला आहे.

भगव्या जवळ सर्वेश आणि विजेंद्र 

गडावर झेंड्याचा पुढे सुखलेला छोटा तलाव

गडावर जाण्यासाठी वाट मुरलेली आहे. त्यामुळे चुकण्याचा शक्यता खूप कमी आहे. आम्ही गड चडायला सुरवात करताच १० मिनिटात एका दरीजवळ आलो. तिथेच वर उजवा बाजूला एक वाट डोंगराचा सोंडेचा टेकडी वर गेली आहे. टेकडीवरुन समोरील मुळशी धरणाच्या अप्रतिम दृश्य दिसते विशेष करून धरणाचा निळ्याशार पाण्यात पडणाऱ्या डोंगराचे सुंदर प्रतिबिंब कॅमेरात टिपता येते. पुन्हा खाली उतरुण त्यादरीजवळ आल्यावर, डाव्याबाजूने डोंगरावर वाट जाते. त्या वाटेने पुढे जावे. त्याच वाटेने थोडा पुढे गेले असता, अजून एक वाट उजवीकडे वर जाते ती वाट बहुतेक सोंडेचा दुसऱ्या अजून एक उंच टेकडीवर जात असावी. पण ती वाट न पकडता सरळ जी डावीकडची पायवाट जाते त्याने चालत राहावे. मधेच वाट चड-उतार होते आणि पुढे जाऊन वाट उजवीकडे वर वळते हिथून तुम्ही गडाचा माथ्यावर लगेच पोहचतात.
आम्ही १० ला गड चढायला सुरवात केली आणि ११ पर्यंत १ तासात गडाचा माथ्यावर पोहोचलो.
गडावर पाहण्यासारखे
गडावर पोहचताच एक छोट्या पठारावर भगवा झेंड्यापाशी पोहचतो. त्याचाच पुढे एकदम छोटासा सुखलेला नैसर्गिक तलाव दिसतो. त्याचा पुढील कडेवर ऊभे राहिले असता समोरील मुळशी धरण आणि त्याचा आजूबाजूचा निसर्ग दिसतो. येथून डावीकडे बघितले असता घनगड आणि तैलबैला हि दिसतो.

गडाचा उंच माथ्यावर जाणारी वाट. ह्याच वाटेचा डावीकडे एक वाट गुहे जवळ (पाण्याचा टाकी) जवळ गेली. गडावर बाणाच चिन्ह मार्ग दर्शवण्यासाठी लावलेले आहे.
पुन्हा पाठी वळून गडाचा उंच माथ्यावर जाण्यासाठी वाट गेली आहे त्यावाटेने पुढे जावे. पण उंच माथ्यावर जाण्याचा आधी एक वाट डाव्या बाजूला खाली जाते तिथे अर्धवट खोदलेली गुहा आहे त्यात पाणी साचून पाण्याची टाकी वाटते. त्यातील पाणी वापरण्या योग्य नाही. गुहा/ टाकी बघून झाल्यानंतर पुन्हा ज्यावाटेने खाली आला होतात तिकडे पुन्हा येऊन वर उजव्या वाटेने पुढे जावे. गडावर दुर्गप्रेमीने मार्ग दाखवणारे बाणाचे चिन्ह लावलेले आहेत. त्यामुळे खूप मदत होते. त्या वाटेने वर गेल्यावर उजव्या बाजूला एक पडकी वास्तू दिसते. सध्या त्यामध्ये पिंपळाचा झाड आले आहे.  त्याचाच उजव्याबाजूला वर गडाचा माथ्यावर वाट जाते. माथ्यावर अवशेष काहीच नाही पण फक्त तुम्हाला त्या माथ्यावरून पूर्ण गड आणि त्या भोवतीचा दृश्य दिसतो. आम्ही माथ्यावर जाऊन पुन्हा खाली वास्तू जवळ आलो, आणि वाट धरून पुढे चालू लागलो. पुढे काही अंतरावर तुम्हाला अनेक ठिकाणी काळे पाषाण विखुरलेले दिसतात त्यामुळे शंकराची पिंड नीट कुठे आहे तो शोधायला लागते.


गडाचा उंच माथा आणि त्याचा खाली लाल रंगाच वर्तुळ केलेली जुने अवशेष असलेली वास्तू. ज्या मध्ये पिंपळाच झाड आले आहे
वरील फोटोत लाल रंगाच वर्तुळ करून दाखवलेली वास्तू ज्या मध्ये पिंपळाचा झाड आले आहे


शंकराची पिंड

शंकराची पिंडी भवती असलेली पडकी भिंत 

पण पिंडी चा बाजूला २ ते २.३० फुटाची गोलाकार पडकी भिंत आहे. जी एखाद्या पडलेल्या बांधा सारखी दिसते.  शंकराची पिंड हि कातळात कोरल्यासारखी आहे.
जिथे शंकराची पिंड आहे तिथेच बहुतेक गड संपतो. कारण आम्ही सुरवातीला शंकरची पिंड शोधण्याचा हेतूने पाय वाटेने बरेच पुढं पर्यंत जंगली झाडी तोडत गेलो. पण वाट काही संपत नव्हती. वाट पुढे पुढे जातच होती. त्यामुळे आम्ही तिकडून पुन्हा पाठी फिरलो. कारण गडाचा डोंगर पुन्हा पुढे दुसऱ्या डोंगराला जुळतो.  त्यामुळे डोंगर हा खूप पसरलेला आहे. (हे तुम्हाला कैलास गडाचा वडुस्ते गावातून काढलेल्या फोटो वरून कळेल). पण बहुतेक मुख्यगड  शंकराचा पिंडी जवळच संपतो कारण पुढे काही अवशेष किव्हा वास्तू आम्हाला दिसल्या नाही. गडावरून दुसऱ्या गावात उतरायला वाट आहे असे मी इंटरनेट वर वाचला होता, त्याप्रमाणे आम्हाला २ वाटा दिसल्या पण नेमकी कुठची वाट कुठे जाते हे आम्हाला माहित नव्हता. 
पूर्ण गड १ तासात पाहून होतो.

आम्हचा गड पाहून जेवण करून आम्ही २. ३० ला उतरायला सुरवात केली. आम्ही पाऊण तासात खाली पुन्हा रस्त्याला पोहचलो. आणि पुन्हा आल्या त्यामार्गाने पनवेलला गेलो.
बहुतेक पुढे वर्षभर येथील रस्ता चांगला असेल कारण निवडणुकीमुळे रस्त्याचा काम चालू होता. तरी पण गाडी सोबत स्टेपनी न विसरता घेऊन जाणे.

गडाचा उंच माथ्यावरून दिसणारा गडाचा झेंड्याचा विरुद्ध दिशेचा भाग

No comments:

Post a Comment