टकमक गड (विरार)
शनिवार असल्यामुळे आमच्या ग्रुप मधले सगळे व्यस्त होते. त्यामुळे माझ्या सोबत ट्रेक करायला कोणी नव्हता. त्यामुळे विचार करत
होतो ट्रेक करू कि नको आणि केला तर कुठचा करू. मी एकटा ट्रेक करत होतो म्हणून विचार केला. अशा
ठिकाणी करायचा जे रेल्वे स्थानकापासून जास्त लांब नसेल आणि तिथे गाडीची
रहदारी सतत असेल. मग मी टकमक गड करायचा ठरवलं.
टकमक गडासाठी कसे जावे
मी सकाळी सात वाजता घरांतून निघालो. पश्चिम रेल्वेचा दादर स्थानकावरून ७. २० ची विरार जलद ट्रेन पकडली. मी ८. २० ला विरारला पोहचलो. तिकडून मी विरार पूर्वेला बाहेर वसई-विरार महानगरपालिकेची शिरसाड फाट्याला जाणारी शिरसाड बस पकडली. विरार पासून शिरसाड फाटा पोहचायला अर्धा तास लागतो, हे अंतर १० ते ११ किमी आहे. शिरसाड फाट्या वरून सकवार फाट्याला जायायला टमटम (म्हणजेच सध्याचा नवीन छोट्या मॅक्स गाडी) असतात. महामार्ग असल्यामुळे शिरसाड फाटा ते सकवार फाट्याला पोहचायला १५ ते २० मिनिटे लागतात. पण हे अंतर हि १० किमी आहे. सकवार फाट्याला महामार्गाचा पुला खाली गाडी वाले सोडतात. तिकडून पलीकडे सकवार गावात डांबरी रस्ता जातो . त्या रस्त्याने तुम्ही ५ मिनिटात गावात पोहचतात.
गावात गेल्यावर गडाची वाट कुठे जाते गावातल्याना विचारायला लागते. कारण वाट गावाच्या मागच्या शेतातून जाते त्यामुळे गडाची वाट शोधायला वेळ लागतो. मी एका घरात मुलाला विचारला, मला गडावर नेशील का तुला १०० रुपये देतो. पण त्याने मला २०० रुपये सांगितले. मी त्याला विनंती केली मी एकटा आहे, दोघं तिघे असतो तर तुला दिले असते. पण तो मुलगा काही तयार होईना. शेवटी मी त्याला बोललो १२५ रुपये देतो. पण तो काही २०० रुपये पेक्षा कमीत तयारच होईना. शेवटी मी त्याला गडाची पायथ्याची वाट दाखवून दे सांगितलं. तेव्हा त्यांनी मला गडाची पायथ्याजवळची वाट दाखवली .
तो मला जिकडून घेऊन गेला मला त्याच वर्णने देता येत नाही आहे . पण एके ठिकाणी मला त्यांनी ओढा पार करून नेला. पण मी तुम्हाला नंतर ज्या वाटेने आलो त्याच्यावरून कसा जायायचा ते सांगायचं प्रयत्न करतो.
त्यांनी मला गडाची पायथ्याची वाट दाखवली त्या बद्दल मी त्याचे आभार मानले. पुन्हा एकदा शेवटचा त्याला विचारून बघितला. पण तो काही तयार होईना. मग मी विचार केला जाऊदे आता मी एकटाच जातो. पण नंतर गड उतरून आल्यावर मी विचार केला. त्याने सांगितले होते ते त्याचा हि दृष्टीने बरोबर होते. कारण गड चढायला ३ तास तरी लागतात.

गडावर पोहचण्याची वाट
तुम्ही गावात पोहचल्यावर गावात एक मोठी उंच सिमेंटची पाण्याची टाकी आहे . त्या दिशेला जावे. टाकी जवळ पोहचल्यावर
डाव्या बाजूने गावातील घरांचा पाठी मागे जावे. तुम्ही तिथे पाठी आल्यावर
तुम्हाला एक मोठी कंपाउंड ची भिंत दिसेल. तिथून डाव्या बाजूने वाटेने तिरकस जाणे. त्या भिंतीचा पुढे गेल्यावर तुम्हाला डावीकडे ताडाची दोन झाडे
दिसतील. त्या झाडांन पासून डाव्या बाजूला जाणे. बरेच ठिकाणी गावातल्यानी
आपआपल्या जागेत ऐनाची झाडे लावली असल्यामुळे त्यांना फांद्या-काट्यांचे कुंपण
केले आहे. त्या कुंपणातून पायवाट जाते. त्यामुळे तुम्हाला दोन कुंपणनाचे
दरवाजे हि लागतात. एके ठिकाणी तुम्हाला डावीकडे ओढा लागतो . पण मला ओढा
ओलांडावा लागला नाही पण भिंतीचा तिकडे एक पाणथळ जमीन लागली. बहुतेक पावसात
तिकडे पाणी असावे. असा करून मी एका कुंपणाच्या बाहेर आलो. तिथून उजव्या बाजूला मला कुंपण लागत वाट सरळ वर गडावर जात होती.
हि वाट तुम्हाला डोंगराच्या सोंडेवर वर घेऊन जाते. तिकडून मग तुम्हाला बहुतेक सरळ वाट सोंडेवरुनच चढायची आहे. वाटेत बरेच ठिकाणी दुर्ग प्रेमीने पिवळ्या / लाल ऑईलपेंट रंगात केले बाण आहेत. असे मी नेटवर वाचला होता. पण प्रत्येक्षात ते बाण आता जास्त दिसत नाही किंवा पुसट झाले आहे. पण दगडावर सफेद खडूने केलेले बाण बरेच ठिकाणी दिसतात. त्यामुळे खूप मदत होते. सोंडेवरून चालत असताना. डोंगराची वरील सोंड हि टेकडी सारखी आहे त्यामुळे चड-उतार करायाला लागतो. पायथ्यापासूनचा वाटे पासून गडाच्या वरील सोंडेवर पोहचायला मला १ तास लागला. वरील सोंडेचा उंच भागी असलेल्या छोट्या टेकडी वर खूप सारे काळे तासलेले पाषाण एकाच ठिकाणी पडलेले दिसतात. त्यावरून माझा असा अंदाज होता बहुतेक हिथे छोटे दरवाजे किंवा चौकी असतील . गडाचा वरील शेवटच्या कातळाच्या पायथ्याला पोहचाण्याचा आधी एक ठिकाणी वाट नसल्यामुळे वर दगडावरून जपून चढायला लागते.

गावात ह्या सिमेंटची पाण्याची टाकी कडून डावीकडे जी घरे दिसत आहे. त्या घरांचा पाठी मागे घरचा डावीकडून जावे. |
घरांचा पाठी मागे आल्यावर पाठी सिमेंट ची भिंत दिसते. तिकडे डावीकडून पायवाटेने जावे. तसेच मी अंदाजे गडाचा सोंडेला वर जाणारा लाल बाण दाखवला आहे. हिकडून आपण गडाचा खालील जंगला खालून वर सरळ सोंडेवरती येतो. |
गडाचा वर जाते वेळी शेवटचे दोन मुख्य कातळ लागण्या अगोदर ह्या पायऱ्या लागतात. |
गडाचा वरील सोंडेवर आल्यावर जायायला बहुतेक अशीच वाट चड-उतार होत गडावर जाते. |
गडावर पाहण्यासारखे
(गडावर मी जेवढे पहिले ते मी हिथे वर्णन केला आहे)
(गडावर मी जेवढे पहिले ते मी हिथे वर्णन केला आहे)
गावातून मला गडाचा माथ्यावर पोहचायला मला
२. ३० तास लागले. गडाचा माथ्यावर पोहचण्याचा आधी तुम्हाला चढते वेळी समोर
तटभिंत दिसते. भिंत अजून हि नवीन असल्या सारखीच वाटते.
तिकडून
वर आल्यावर डावीकडे तुम्हाला दोन पाण्याचा टाक्या दिसतात. (टाकीतील पाणी खराब झालेले दिसत होते आणि थोडी घाण हि पडलेली दिसत होती , बराच टाक्यांमध्ये मध माश्या पाण्याजवळ भिनभिनतं होत्या. गडावरील पाणी मला पिण्यायोग्य वाटले नाही ). त्या
टाक्यांजवळून डावी कडे म्हणजेच उत्तरेकडे वाट जाते.त्या वाटेने पुढे जावे.
त्या वाटेने गेले असता तुम्हाला गडावरील बहुतेक अवशेष दिसतात आणि हि वाट
तुम्हाला पुढे गडाचा उत्तरेकडील डाव्या टोकाला घेऊन जाते.
गडावर दोन अर्ध्या तुटलेल्या तोफा दिसतात आणि त्याचाच बाजूला उघड्यावर पाषाणावर कोरलेला देव आहे. पुन्हा वाटेला परत येऊन पुढे गेले असता, दोन्ही बाजूला पडक्या वास्तूचे जोथे दिसतात. तीच सरळ वाट धरून पुढे जाताच एक वाट उजवीकडे टोकाजवळ पठारावर जाते आणि एक वाट डावीकडे खाली असलेल्या आठ टाक्याजवळून पुढे गडाचा टोकाला जाते.
आठ टाक्या लागूनच एका कातळात खोदलेल्या आहेत. त्यातील ३ टाक्या सुखलेल्या आहेत. (एकूण गडावर मला ११ टाक्या दिसल्या). त्याच्यावाटेने
पुढे गेला असता गडाच्या उत्तरेच्या टोकाच्या माथ्यवर पोहचतो. त्या
पठारावर एक छोटा २ फूट रुंद आणि २ फूट खोल एक कातळी खड्डा आहे. पुन्हा
पाठी फिरताना जी वाट उजवीकडून वर येत होती. त्या वाटेल माथ्यावरच तुम्हाला अजून एक टाकी दिसते.
गडाचे उत्तरेला दोन टोक आहेत. मी सांगितला त्या डाव्या टोकावरून आपल्या उजव्या बाजूला थोडा पाठीमागे अजून एक टोक दिसतो. त्या टोकावरून पूर्वेकडची दरी आणि डोंगर चांगले दिसतात. पण त्या टोकावर काही अवशेष दिसत नाही. त्या टोकाकडे जाणाऱ्या वाटेत बरीच झाडी लागते. पण त्याची वाट हि सुरवातीच्या दोन टाक्या आहेत त्याचा वरून म्हणजेच उजवीकडून वर जाते.
गडाचा माथ्यावर पोहचायचं आधीच हि गडाची तटबंदी दिसते. तटबंदी वर गडाचा माथा लागतो. |
गडाचा टोकावर पोहचताच जवळच गडाचा दक्षिणेकडील टोकावरून दिसणारे सोंडेचे आणि भवतालीचा निसर्गाचे दृश्य दिसते |
पुन्हा परतीचा मार्ग
मला गड फिरायला १ तास
लागला. माझ्या सोबत कोणीही नसल्यामुळे म्हणून मी जास्त वेळ थांबलो नाही. मी जेवून गड
उतरायला सुरवात केली. गडाचा वरील सोंड पठारासारखी मोकळी असल्यामुळे चांगला वारा लागत
होता त्यामुळे माझा सगळा थकवा निघून जात होता. पण जसा मी सोंडेवरून खाली जंगलातुन ते गावापर्यंत जाणारी वाट पकडली. मला उन्हाळ्याची चाहूल दुपारचा कडक उन्हाने होणाऱ्या थकव्यामुळे पूर्ण जाणवली. जास्त करून गडाचा पायथ्यापासून ते
गावापर्यंत.
मला पूर्ण गड उतरायला दीडतास लागला. मी जाते
वेळी ज्या घरातील मुलाला विचारला होता त्यांचाच घरी जाऊन पाणी पियालो. तो
मुलगा घरी न्हवता तरी पण मी जाणूनबुजून त्यांचा घरी जाऊन पाणी पियालो. त्याचे कारण, मी
एकटा ट्रेक करत होतो. त्यामुळे त्यांना हि कळावे कि गडावर सकाळी गेलेला
व्यक्ती सुखरूप गडावरून परत गेला.
पुन्हा मी सकवार फाट्यावरून शिरसाड ला गेलो आणि तिथून विरार. मला घरी पोहचायला ५. ४५ वाजले.
गडावर पोहचताच दिसणाऱ्या दोन टाक्या ह्याचा डावीकडून वाट जाते. त्याने पुढे गेलो असता रांगेत अवशेष सापडत जातात. |
वाटेत दिसणारे जोत्याचे अवशेष |
वाटेत दिसणारे जोत्याचे अवशेष |
गडावर तुटलेल्या अवस्थेत असलेल्या २ तोफा आणि उघड्यावर असलेले मंदिर. |
गडावरील कातळात कोरलेल्या आठ टाक्या. ह्यातील ३ टाक्या सुखलेल्या आहेत. |
उत्तरेकडील डाव्या टोकावरून दिसणारे दृश्य |
डाव्या टोकाचा माथ्यावर कातळातल खड्डा |
उत्तरेकडील टोकावरून दिसणारे दृश्य |
डाव्याटोकावरून दिसणारे उजवे कडील गडाचे टोक |
गडाचा डाव्या टोकाचा माथ्यावर असलेली टाकी |
गडाचा उजव्या टोकावरून दिसणारे डावीकडील टोकाचे दृश्य |
गडावरून दिसणारे पूर्वेकडील दृश्य |
मी
हा ट्रेक सोबत कोणी तरी गावातील व्यक्ती घेऊनच करणार होतो. पण त्या
मुलाने सांगितलेली किमंत मला एकासाठी जास्त वाटली. त्यामुळे मी आता पर्यंत केलेले बरेचसे ट्रेकचा अनुभवामुळे मी हा ट्रेक एकट्याने करण्याचा वेढा धाडस केला. पण ट्रेक करतेवेळी गडाच्या जंगलात एकाद मोठ जनावर दिसण्याची मला भीती सतत वाटत होती. अजून पर्यंत मला कधी तसा अनुभव आला नाही तरी पण कधीही दक्षता घेतलेली चांगलीच असते. पण मधेच काही गावकरी जंगलात लाकडासाठी झाडे छाटत होती. त्यामुळे माझी भीती जरा दूर होत होती. हे मी हिथे मुद्दामूनच लिहला आहे. कारण एकटा ट्रेक करणं खूप धोक्याचं आहे मला माहित आहे. पण ह्याचा अगोदर मी कधी एकट्याने ट्रेक केला नव्हता आणि पुढे करणार हि नाही. केला तर गावातल्या कुठच्या तरी एका व्यक्तीला थोडे जास्त पैशे देऊन सोबतच करेल.
No comments:
Post a Comment