जीवधन ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE लिंक वर क्लिक करा
बरेच वर्ष जीवधन ट्रेक करायचा विचार करत होतो. शेवटी विनयशी एक डील केली, त्याला बोललो, तु माझ्या बरोबर जीवधन किल्ला कर, मी तुझ्या बरोबर गोरखगड करेल. डील डन झाली, आणि ऑक्टोबर २७ चा शनिवारी एका दिवसात नाणेघाट मार्गे जीवधन करायचा ठरवलं. विनय ने ह्या अगोदर प्रणव बरोबर ५ ते ६ वर्षांपूर्वी हा ट्रेक केला होता. पण त्यावेळी पूर्ण पहिला नव्हता. ह्या वेळी आम्ही पूर्ण करायचा ठरवलं. तरी आम्ही बहुतेक ८० ते ९० टक्के गड पिंजून काढला. त्यात आमची मुख्य जिवाई देवीची मूर्ती पाहायची राहिली.
मुंबई ते नाणेघाट पायथा प्रवास वर्णन
पूर्ण गड पिंजायचा होता, म्हणून
आम्ही लवकर निघायचा ठरवलं. मी सकाळी ४. १५ ची सीएसमटी ते खोपोली ट्रेन,
करीरोड वरून ४.३६ ला पकडली. ठरल्याप्रमाणे मी कल्याण ला ५. ४५ ला पोहचलो,
पण विनयची गाडी चुकली, त्यामुळे तो पाठच्या ट्रेनने १० मि. उशिरा आला.
आम्ही तसच कल्याण एसटी आगार मधून नाणेघाटला कुठची एसटी जाईल म्हणून बघू
लागलो. सहाची भिवंडी - अहमदनगर आळेफाटा मार्गे लागली होती. वाहकाला मोरोशी
पर्यंतची तिकीट द्या आणि नाणेघाटला सोडा सांगतील म्हणून तयार झाला. मग ती
एसटी पकडली. तरी गाडी सुटे पर्यत सव्वा सहा वाजले.
आम्ही
पाऊणे आठला नाणेघाटला उतरलो. आमचा नाश्ता राहिला होता, म्हणून तिथे काही
टपरी वर खाऊ असा विचार केला. पण आता पावसाळा नसल्यामुळे, तिथे कोणी येत
नाही म्हणून त्या टपरी बंद होत्या.
ट्रेकला सुरवात
आम्ही ८
वाजता आमचा ट्रेक चालू केला. नाणेघाटाच्या पायथ्याला सुधारणा केल्यामुळे,
वाटेचा जागी मातीचा
मोठा
रस्ता केला आहे. त्यामुळे वाट चुकण्याचा प्रश्न येत नाही. साधारण तासभरात
आम्ही नाणेघाटच्या मुख्य घाटाच्या दगडी वाटेच्या पायथ्याला पोहचलो.
इथून पूर्ण तासाभराचा नागमोडी वळणाचा दगडी वाटेचा खडाचड चडून, आपण
नाणेघाटाच्या माथ्यावर पोहचतो. हा चढ चढतेवेळी, वाटेत कातळातल्या पाण्याचा
टाक्या लागतात. पण त्यातले पाणी पिण्यायोग्य वाटत नव्हते.
सकाळी
९. ४५ ला आम्ही नाणेघाटाच्या मुख्य गुहेत पोहचलो. तिथे ५ ते १० मिनिट
गुहा पाहून आणि थांबून. आम्ही पुढे चालू लागलो. तिथून अगदी ५ मिनटात आम्ही
माथ्यावर पोहचलो. माथ्यावरील अवशेष पाहून आम्ही पुढे चालू लागलो.
नाणेघाट माथ्यावरून जीवधन किल्ल्याचा ट्रेक वर्णन
साधारण १०. १५ मिनटांनी, आम्ही जीवधन किल्ल्याचा दिशेने चालू लागलो.
नाणेघाटाचा
माथ्यावर पोहचल्यावर
समोर एक डांबरी रस्ता जुन्नर- घाटघर मार्गे आलेला आहे. ह्या रस्त्याने गाडीने
सरळ नाणेघाटाच्या माथ्यावर पोहचतो. ह्याच रस्त्याने मुंबई किंवा पुणेहून
खाजगी गाडी करून आलो असता. जीवधन दोन्ही वाटेने करू शकतो.
एक
वाट घाटघर मार्गे तर दुसरी वाट नाणेघाट मार्गे गडावर जाते. नाणेघाट मार्गे
म्हणजेच नाणेघाटाचा पठारावरून दीड ते दोन तासात गड चढता येतो. तर घाटघर
मार्गे बहुतेक दोन ते अडीच तासात गडावर पोहचता येते.
नाणेघाटाच्या
माथ्यावरून, आपल्या उजव्या हाथाला जीवधन किल्ला दिसतो. सुरवातीला डांबरी
रस्त्यावरून ५ ते १० मिनटं चालल्यावर, उजवीकडे एक कच्चा रस्ता जाताना
दिसतो. आम्ही त्या रस्त्याने चालू लागलो. पाच मिनीटांनी डावीकडे तुम्हाला
एक हॉटेल दिसेल, तिथे न जाता, उजिवाकडे सरळ रस्ता जाताना दिसतो. त्या
रस्त्याने जावे, त्या रस्त्याने थोडा पुढे गेलो असता. अजून एक हॉटेल लागते.
ह्या हॉटेलच्या पाठून जीवधन कडे वाट जाते. आम्ही ह्या हॉटेलच्या पाठून
गेलो.
जीवधन किल्ल्याला जायायला पठारावरती
ठराविक वाट दिसत नाही. त्या साठी आम्ही त्या हॉटेल वाल्याला विचारला असता
त्यानी हाताने वाट दाखवत "असा जा" म्हणून सांगितलं. सोबत त्यांनी त्याचा
कुत्र्याला घेऊन जायायला सांगितलं. आणि बोलला कि हा दाखवेल तुम्हाला वाट.
पण खरंच त्या कुत्र्याने आम्हाला गडाच्या पायऱ्यापर्यंत अचूक वाट दाखवली.
पठारावर
जर वाट भेटली नाही, तर हे लक्षात ठेवावे. वानरलिंगी सुळका आणि जीवधन गड
ह्या मधील घळच्या दिशेने चालत जावे. त्यानंतर ज्या बाजूला गडाचा टोक येतो
तिथूनच वाट पायथ्याचा जंगलातून वर जाते. आम्हाला जंगलात दोन झाडावर, वाट
दर्शविणारे बाणाचे चिन्ह केलेलं दिसले.
गडाच्या पायऱ्या
पायथ्याचा
जंगलातून वाटेने वर चढत आम्ही १० मिनटात गडाच्या पायऱ्या जवळ पोहचतो. इथून गडाचा कातळ लागतो. पहिल्या टप्प्यातील पायऱ्या नंतर मध्ये पायऱ्या
नसल्यामुळे कातळाच्या बाजूने वाट चढत, आम्ही दुसऱ्या टप्प्यातील
पायऱ्याजवळ पोहचलो. ह्या टप्प्यातील पायऱ्या गडाच्या दरवाज्या पर्यंत
जातात. ह्या टप्यातील पायऱ्या तुटलेल्या आहेत. त्यामुळे जपून जायायला लागते.
खास करून, दरवाजाचा बुरुजाजवळच्या पायऱ्या एकदमच तुटलेल्या आहेत. त्यामुळे
येथे कातळ जास्त जपून चढायला किंवा उतरायला लागतो. त्याचा पुढे आपण लगेच
दरवाजा जवळ पोहचतो. दरवाजापर्यंत पोहचायला आम्हाला १०.३५ वाजले.
दरवाजा
पाहून आम्ही गडावर आलो. दरवाज्याचा बुरुजावरून उजवीकडे वाट वानरलिंगी
सुळका दिसतो तिथे जाते. ह्या वाटेने ५ मिनटात तिथपर्यंत पोहचतो. आम्ही परत
उतरतेवेळी वानरलिंगी पहायला गेलो.
गड पहायला सुरवात कशी केली
आम्ही
दरवाजाने वर आल्यावर, समोर गडमाथ्यावर वाट
जाताना दिसते. त्या वाटेने आम्ही माथ्यावर गेलो. ह्या वाटेने जातना
आपल्याला वाटेत, दोन ठिकाणी पाण्याचा टाकी लागतात. पहिली एक मोठी आडवी रुंद
लागते. अजून थोडा ५ मिंनट वाटेने वर चढल्यावर, आपल्याला अजून ५ टाकी
लागतात. पाच मधल्या दोन टाक्या मोठ्या आहेत. त्याचा पुढे लागून ३ छोट्या
टाक्या आहेत. त्यासाठी टाकीच्या पुढंपर्यंत जावे.
ह्या
वाटेने आपण गडाच्या माथ्यावर पोहचतो. इथून आपल्या उजव्या हाथाला एक वाट
गडाचा माथ्यावरील मंदिराजवळ जाते. तरी डावीकडील वाट माथ्याच्या दुसऱ्या
टोकाला जाते. ह्या टोकावर अवशेष किंवा मंदिर नाही. आणि एक वाट समोर खाली
जाते. हि वाट आपल्याला गडाच्या दुसऱ्या बाजूला घेऊन जाते.
गडाच्या ह्या बाजूला आपल्याला गडावरील बहुतेक वाड्याचे अवशेष, तटबंदी
इत्यादी दिसतात. ह्या बाजूला जुन्नर-घाटघर मार्गे गडावर वाट येते.
गडाच्या दुसऱ्या बाजूला आढळणारे अवशेष
आम्ही समोरील वाट उतरून,आधी दुसऱ्या बाजूला गेलो. वाटेने खाली आल्यावर पाच
मिनटात आपण धान्यकोठाराजवळ पोहचतो. वाटेच्या बाजूला डावीकडे धान्यकोठार
लागते तर उजवीकडे पाण्याच्या टाक्यांचा समुदाय.
आम्ही
पहिला
पाच टाक्यांचा समूह बघायला गेलो.ते पाहून आम्ही धान्यकोठार कडे गेलो.
कोठार आतील भाग कातळात कोरलेला आहे. तर त्याचा बाहेरील भाग दगडाने बांधकाम करून बांधलेला आहे.
कोठाराच्या
आतील दरवाज्यावर गजलक्ष्मी कोरलेली आहे. आत वाड्यासारखे चार खांब आहे.
कमानीसारखे त्याचा वरती छताला पुष्पाची नक्षी आहे. हे सगळं काम दगडात
केलेलं आहे. त्याचा पुढे २ मोठ्या कातळातल्या खोल्या लागतात. ह्या खोल्या
आत मध्ये प्रशस्त आहे. त्याचाच बाजूला एक छोटी खोली लागते. अशे एकूण मिळून
तीन खोल्या लागतात. कोठार आतून नीट बघण्यासाठी बॅटरी घेऊन जावी.
एक वाजला होता, म्हणून कोठार बघून आम्ही तिथेच जेवून घेतला आणि पुढे चालू लागलो.
कोठारचा समोर वाट खाली जाते. ह्या वाटेने आम्ही खाली उतरून पहिला डावी कडे तटबंदीकडे गेलो.
तटबंदी कडे जाताना आढळणारे अवशेष
ह्या
वाटेने आम्हाला वाटते बऱ्याच घराच्या जोत्याचे दगडी अवशेष लागतात. तसेच
एक टाकी लागते. थोड्याच वेळात आम्ही तटबंदी जवळ पोहचलो. सुरवातीला एक छोटी तटबंदी लागते साधारण १० ते १५ मीटर लांबीची. हि तटबंदी बुरजासारखी आहे किंवा बुरुजच वाटतो. ह्या तटबंदीच्या बाजूने वाट पुढे जाते. दोन-चार मिनटं पुढे गेलो असता, आपल्याला अजून एक तटबंदी लागते. साधारण ४ फूट उंच आणि साधारण २०ते २५ मीटर लांब असेल. नीट पाहिल असता, असा अंदाज येतो कि मधली तटबंदी तुटली असावी.त्यामुळे ह्या दोन तटबंदी फट पडून वेगळ्या झाल्या असाव्यात. तटबंदीच्या बाजूने
पुढे गेलो असता, पुढून तटबंदीचा बाहेरील भाग दिसतो. अजून इतर कुठे आम्हाला तटबंदी दिसली नाही. तटबंदीच्या पुढे एके ठिकाणी, एक बुरुज खाली बांधलेला दिसतो, त्यासाठी खाली उतरायला कोरलेल्या पायऱ्या हि दिसतात. पण पायऱ्या झिजलेल्या दिसतात त्यामुळे उतरू शकत नाही.
आम्ही वेळ कमी असल्यामुळे जास्त पुढे न जाता. तटबंदीच्या थोडा पुढे जाऊन चौथऱ्याचे अवशेषश बघून पुन्हा पाठी फिरलो. आणि दुसऱ्या बाजूला जिथून गडावर जुन्नर मार्गे दुसरी वाट येते. ते बघायला गेलो.
या बाजूला आम्हाला उजव्या बाजूला वाटेचा वर एक पडक्या वाड्याचे अवशेष दिसतात. ह्या वाड्याचा बाजूने वाट धान्यकोठाराजवळ जाते. त्यामुळे परत येतेवेळी हा वाडा बघून पुढे जाऊ शकता. पण आम्ही हा वाडा बघून पुन्हा खाली वाटेला येऊन. पुढे वाटेचा डावीकडे छोट्या वाड्याचे किंवा घराचे अवशेष लागतात. आणि तशीच वाट वाड्याचा बाजूने खाली जाताना किंवा येताना दिसते. हि वाट जुन्नर-घाटघर मार्गे गडावर येते.
आम्ही वेळ कमी असल्यामुळे जास्त पुढे न जाता. तटबंदीच्या थोडा पुढे जाऊन चौथऱ्याचे अवशेषश बघून पुन्हा पाठी फिरलो. आणि दुसऱ्या बाजूला जिथून गडावर जुन्नर मार्गे दुसरी वाट येते. ते बघायला गेलो.
या बाजूला आम्हाला उजव्या बाजूला वाटेचा वर एक पडक्या वाड्याचे अवशेष दिसतात. ह्या वाड्याचा बाजूने वाट धान्यकोठाराजवळ जाते. त्यामुळे परत येतेवेळी हा वाडा बघून पुढे जाऊ शकता. पण आम्ही हा वाडा बघून पुन्हा खाली वाटेला येऊन. पुढे वाटेचा डावीकडे छोट्या वाड्याचे किंवा घराचे अवशेष लागतात. आणि तशीच वाट वाड्याचा बाजूने खाली जाताना किंवा येताना दिसते. हि वाट जुन्नर-घाटघर मार्गे गडावर येते.
वाड्याचा
पुढे थोडा खाली गेलो असता आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात.
ह्या पायऱ्या पूर्ण खाल पर्यंत गेल्या आहेत. सुरुवातीला पायर्यांजवळ पोहचले
असता आपल्याला वरून बुरुज दिसतो. आम्ही पायऱ्या उतरून खाली बुरुजावर गेलो.
बुरुजाच्या बाजूने पायऱ्या खाली जातात. पुढे थोडा अजून खाली उतरलो असतात
आपल्याला तुटलेल्या दरवाजाचे अवशेष दिसतात. दरवाजा पूर्ण उध्वस्त झालेला आहे. पण
दरवाज्याचा बाजूची कमानीचा अगदी थोडा भाग दिसतो. त्यावरून कळून येतो येथे
दरवाजा असणार. दरवाजा जवळ आपल्याला
खांबटाकी दिसते. हि टाकी बुरुजावरून लगेच दिसते. पायऱ्या अजून खाल पर्यंत
जात होत्या. आणि आम्हाला परत फिरायचा होता. म्हणून आम्ही जास्त खाली न
जातात दरवाजा जवळून, पुन्हा पाठी फिरून गडावर आलो.
आणि पुन्हा धान्यकोठाराचा बाजूला माथ्यावरून जी वाट खाली आली होती, त्या वाटेने पुन्हा माथ्यावर गेलो. आणि
माथ्यावरील मंदिराजवळ गेलो.
हे मंदिर जिवाई देवीचे नाही. आमची जिवाई देवीची मूर्ती शोधण्याचे राहून गेले.
सर्वोच्च माथ्यावरील मंदिर
मंदिर
पूर्णपणे उध्वस्त झालेलं बिना छपराच आहे. मंदिराच्या बाजूला दगडाने २ फुट
उंच भिंत रचून ठेवली आहे., मंदिरात आत मूर्ती आहे. देवीचा दर्शन घेऊन,
आम्ही मंदिराचा पाठी गेलो. तिथे तुटलेले दगडी
खांब दिसतात. कदाचित मंदिरचा प्रवेश द्वाराचे खांब असावेत. येथे गवत जास्त असल्यामुळे, येथून कुठे वाट पुढे खाली जाते
का. आम्ही शोधला नाही. आम्ही आलो त्या वाटेने पाठी फिरून गड उतरायला केली.
परतीचा प्रवास
परतीचा प्रवास
जीवधन ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE लिंक वर क्लिक करा
फोटोत अवशेष आणि तटबंदी वर्तुळ करून दाखवले आहेत. आणि त्याला धान्यकोठार साठी वाट कशी जाते. ते हि लाल रेषेने दाखवले आहे. |
पहिली तटबंदी |
दुसरी तटबंदीचा पुढे गेलो असता. तटबंदीचा बाहेरील भाग दिसतो. |
तटबंदीच्या खाली असलेला बुरुज आणि त्याच्या कातळातल्या पायऱ्या दिसत आहेत. |
दरवाजा कडून माथ्यावर येताना. वाटेत टाक्या लागतात. त्याचे वरून काढलेला फोटो. |
जुन्नर मार्गे येणारी वाटेचा दरवाजा कडील बुरुज आणि पायऱ्या. आणि खाली बुरुजाचा जवळ समोर असलेली खांबटाकी |
जुन्नर वाटेच्या दरवाजाचे अवशेष |
नाणेघाट वाटे लागणारा दरवाजा |
जीवधन ट्रेकचा पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील YOUTUBE लिंक वर क्लिक करा