Tuesday, 21 March 2017

Basgad fort बसगड (भास्करगड)

बसगड (भास्करगड)

दिवाळीच्या सुट्टीनंतर २ आठवड्याने विकेंड ट्रेककर ग्रुप वर बसगड करायचा ठरला. त्यासाठी सकाळची लोकल पकडायची का रात्रीची ह्या विषयावर विचारविनिमष होऊन ठरल,  सकाळी ५ची मुंबई कसारा गाडी पकडायची. मी ५. १२ ला करीरोड स्थानकावरून गाडी पकडली. माझ्या सोबत सचिन हि त्या गाडीत होता. अनिल आणि सर्वेश ठाण्याला भेटणार होते. आणि विनय आणि प्रणव डोंबिवलीला. पण अनिल वेळेत पोहचू शकला नाही त्यामुळे त्याची गाडी ५ मिनिटासाठी सुटली. त्याला कल्याण वरून ६.५२ ची गीतांजली एक्सप्रेस पकडायला सांगतली बाकी सगळ्यांनी आपआपल्या ठरलेल्या ठिकाणी गाडी पकडली. ठाणे येईपर्यंत गाडी भरली होती. त्यामुळे डोंबिवलीच्या आमच्या २  गिरिमित्रांपैकी एकाला बसायला भेटले नाही. कसारा येईपर्यंत मग आमच्या नेहमीच्या वेगवेगळ्या विषयावर चर्चा चालल्या होत्या.

कसाऱ्याला पोहचेपर्यंत ८ वाजले. अजून अनिल येण्याचा बाकी होता.  तो पर्यंत आम्ही नाश्ता करून घेतला. तितक्यात १० मिनिटांनी अनिल हि पोहचला.

कसारा स्थानकाच्या बाहेर पडताच गाडी वाले विचारू लागले कुठे जाणार. आम्ही बसगाडच्या पायथ्याचा गाव निरगुडपाडा चा भाव विचारला सगळ्यांनचा एकच भाव ३००० रुपये. बहुतेक कसारा वरून सकाळी st असते पण आम्ही सकाळी पहिली कसारा लोकल पकडली असती तर आम्हाला भेटली असती. त्यामुळे आम्हाला आता खाजगी गाडी करण्याशिवाय पर्याय नव्हता. शेवटी आम्ही एकाशी भाव करून २०००रू ठरवून थेट निरगुडपाडा ते पुन्हा कसारापर्यंत येऊन जाऊन गाडी ठरवली. आजून ४००ते ५०० रुपये दिले असते तर त्यांनी आम्हाला १० आसनाची बोलेरो दिली असती. पण आम्ही ७जण होतो त्यामुळे त्यांनी आम्हाला कमी भाड्यात दिलेली ओमीनी गाडी हि ठीक होती. आमचा प्रवास बसगाडच्या दिशेने सुरु झाला.

  कसारा ते निरगुडपाडा , खोडाळामार्गे जाऊन येऊन साधारण १०० किमी असेल. दुसरा एक मार्ग इगतपुरी, घोटी- वैतरणा रस्ता ,मार्गे जातो ह्या मार्गे तुम्हाला जाऊन येऊन१३०/१४०किमी आहे. पण बहुतेक गाडीवाले खोडाळामार्गे लवकर पोहचतात म्हणून ह्या रस्त्याने जातात. निरगुडपाड्या पर्यंत रस्ता चांगला आहे फक्त मध्ये थोडा २/३ किमी खराब आहे. बसगड हा हरिहर गडाच्या समोरच आहे दोघांचा मुख्य गाव एकच निरगुडपाडा. पण निरगुडपाड्याला गेल्यावर एके ठिकाणी एक रास्ता सरळ हरिहरगड ला जातो आणि एक डावीकडे पाठी वळला आहे तो बसगड ला जातो,  तिकडून आम्ही डावीकडे आत शिरलो. पुढे गेल्यावर तुम्हाला एका नाल्यावर पूल लागतो तो पार करून थोडा अजून पुढे जायायला लागते. पुढे रस्ता खराब होता त्यामुळे आम्ही गाडी तितेच थांबून चालू लागलो. वाटेत काही गावकरी भेटले त्यांना गडावर जायायला वाट विचारली.  तिथेच थोडा अंतरावर पुढे रस्त्याला एक मोठा दगड होता त्याला काही ठिकाणी शेंदूर लावला होता. तिकडून एक पायवाट जात होती त्या दिशने आम्हाला जायला सांगितलं. आम्हाला कसारावरून बसगाडच्या पायथ्याशी पोहोचायला १.३० लागला.
हरिहरगडाचा पायथाचा वाडीतून टिपलेले बसगडचे दृश्य

    ट्रेकला सुरवात करताच थोड्या वर गेल्यावर एका ठिकाणी बऱ्याच वाटा फुटलेल्या होत्या तिथेच शेळ्या चारवात असलेल्या काकांना विचारले,  त्यांनी पुन्हा कसा जायायचा सांगितले. पण काही दुर्गप्रेमी आणि गिर्यारोहण प्रेमीने गडावर जाण्यासाठी दगडावर दिशादर्शवणारे बाण केले होते. बहुतेक बाण पुसट झाले होते.  तरी पण त्यामुळे आम्हाला वाट शोधायला खूप मद्त झाली. अशा प्रकारे आम्ही एका पठारावर  पोहोचलो.



 पठारावर पोहचताच समोर बसगड  दिसतो आणि पाठी फिरून पहिले असता तुम्हाला ३ डोंगर दिसतात त्यात पहिला फणीचा डोंगर, उजिवाकडचा हरिहरगडआणि डावीकडचा ब्रह्म  डोंगर





बसगाडच्या कातळाच्या बाजूने घनदाट रानटी झाडातून वाटकडून जातेवेळी

तिकडून आता आम्हाला बसगडचा कातळ दिसत होता.  त्यामुळे आता वाट चुकण्याचा काही प्रश्न नव्हता. पठारावरून सरळ रस्त्याने गडाच्या कातळाजवळ पोहचलो तिकडून उजवीकडची वाट धरून आम्ही गडाच्या पायऱ्यांजवळ  पोहचलो.








गडाच्या पायऱ्या सुंदर कातळात घडवल्या होत्या पण प्रत्येक गडाचा पायऱ्या प्रमाणे ह्या गडाच्या हि पायऱ्या उद्धवस्त झालेल्या होत्या. सुरवातीच्या थोड्या पायऱ्या चांगल्या होत्या.  पायऱ्या चडून  वर गेल्यावर मुख्य दरवाजा लागतो, तो अर्धा जमिनीत बुजला गेला आहे त्यामुळे तुम्हाला वाकून /बसून आत जायायला लागते. नंतर तुम्ही थोडे अजून वर गेल्यावर गडाच्या माथ्यावर पोहचतात.




गडाचा मुख्य  दरवाजा आर्धा मातीमध्ये गेला आहे त्यामुळे आत वाकून किंवा बसून शिरायला लागते


उतवड डोंगर, गडावर आलेली बाजूच्या गावातील मुलं ह्याला उताड्या बोलत होती


                                                            गडावरील हनुमंताचे मंदिर
                     हरिहरगडाचा दिशेला असलेल्या माथ्यावरील पठाराचा शेवटी एक छोटा बुरुज लागते




 
                                                 वैतरणा नदीचे पात्र आणि पाठबंधारा



तिथून तुम्हाला एकीकडे समोर हरिहरगड आणि आजूबाजूचे गड  दिसतात . आणि एकीकडे बाजूला उताड्या डोंगर. आणि एकी कडे वैतरणा नदीचे पात्र आणि काही छोटे छोटे धरण /पाटबंधारे दिसतात . आम्हाला गडावर पोहचायला २ तास लागले. आम्ही जरा हळू चालत होतो म्हणून आम्हाला थोडा अर्धा तास जास्तच लागला नाही तर सव्वा ते दिड  तासात हि पोहचू शकतो.

गडाला मानव निर्मित तटबंदी दिसत नाही. आणि गडावर काही पाण्याचा सुकलेल्या टाक्या आहेत . आणि एक टाकीच्या बाजूला हनुमंताची मूर्ती. त्याचा वरच उंच ठिकाणी काही उधवस्त वस्तू चे अवशेष आहेत.  पूर्ण गड  फिरायला तुम्हाला १ ते १. ३० तास पूर्ण होतो . पण गडावर गवतातून वाट काडत आणि नकाशातले बुरुज शोधण्याचा वेळात आणि  जेवण ह्या गोष्टीमुळे आम्हाला ३ तास लागले. गुगलवर नकाशात तुम्हाला २ बुरुज दाखवले आहेत, पण प्रत्येक्षात तुम्हाला दगडाचा एक साधा बुरुज दिसतो . तो बुरुज न वाटता छोटीशी दगडाची ३ फुटाची भिंत वाटते



गड पाहून झाल्यावर आम्ही ३ वाजता उतरायला सुरवात केली. खाली उतरते वेळी ,  गडाच्या पायथजवळ जिथे अनेक वाट दिसत होत्या तिथे  बोलण्याचा नादात आम्ही वाट चुकलो. वाट चुकल्यामुळे  आमची १५/२० मिनिटे  वाया गेली. तरी आम्हाला पुन्हा पायथाला पोहचायला  ४. ४५ वाजले.

जाते वेळी पुन्हा आम्ही आलेल्या मार्गाने कसाऱ्याला पोहचलो.









No comments:

Post a Comment