कुर्डूगड
मार्चचा पहिल्या
आठवड्यात कुर्डूगड आणि मानगड करायचा आमचा ठरला होता. पण ऐनवेळी बहुतेक जण
नाही म्हणाले, म्हणून मग आम्ही दुसरा गड करायचा ठरवत होतो. पण नाही म्हणता
म्हणता पुन्हा आमही ५ जण झालो. मग अजून कोणी २ जण आले तर आपण गाडी करून
कुर्डूगड आणि मानगड ला जाऊ शकतो. त्याप्रमाणे अनिलने त्याचा ३ मित्रांना
विचारले आणि ते तयार झाले. मग आम्ही आमची नेहमीची गाडी ठरवली. आमचा बेत
रात्रीनिघून उंबरखिंड किव्हा पन्हाळजेंगड करायचा होता. पण आमचा गाडीमालक
रात्री येऊ शकत होता. म्हणून मग आम्ही सकाळी निघायचा ठरला.
सकाळी
५. ४५ ठाण्याला भेटायचं ठरला. आम्ही चौघे जण ठाण्याला तर बाकीचे चार जण
जुईनगरला भेटणार होतो. ठाण्यावरून निघता निघता आम्हाला निघायला ६. ३०
वाजले. जुईनगर पोहचेपर्यंत ७. १५ वाजले. मार्च महिना असल्यामुळे, तसेच
कुर्डूगड चढायला वेळ लागणार त्यासाठी सकाळी पहिला कुर्डूगडला जायचा आम्ही
ठरवलं.
गडाचा पायथ्याचा गावी कसे पोहचावे
मुंबई ते उंबर्डी अंतर १४६ किमी आहे. आम्ही
पनवेल वरून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने खोपोली, पालीवरून आतील रस्त्याने
नांदगाव- कांदळगाव- कडपे फाटा - कडपे - जिते - उंबर्डी गावात गेलो.
आम्हाला उंबर्डी गावात पोहचायला १० वाजले. आम्ही
पाली मध्ये नाश्त्याला थांबलो होतो म्हणून उंबर्डी गावात जास्त वेळा न
वाया घालवता आम्ही ट्रेकला सुरवात केली. जितेगावातून कुर्डुगडावर जायायला
२ ते २.३० तास लागतात, असे प्रणव आणि मी नेटवर वाचले होते. पण प्रणवने
सांगितले उंबर्डी वरून १ ते १. ३० तासात आपण गडावर पोहचतो म्हणून आम्ही
उंबर्डी गावातून ट्रेकला सुरवात केली. जिते ते उंबर्डी अंतर २.५ ते ३ किमी
आहे
कुर्डूगड करायचा असेल तर खाजगी गाडी करून जाणे
फायद्याच ठरेल. कारण त्यामुळे तुम्हाला मानगड हि करता येतो.पण जर सार्वजनिक
गाडी ने प्रवास केला तर फक्त कुर्डूगड एक च करता येईल.
आम्ही
खाजगी गाडीने गेलो त्यामुळे आम्हाला st चा वेळ आणि कुठून st पकडायची समजला
नाही. पण जिते गावात गेलो असता, आम्हाला काही वडाप (टमटम) दिसल्या.
त्यावरून माझ्या मते. माणगाव, इंदापूर किंवा कोलाड वरून येथे वडाप बदलत जाऊ
शकतो. किव्हा बहुतेक जिते गावातून कडपें फाट्यापर्यंत ( म्हणजेच आतील
मुख्य रस्त्या पर्यंत ) पोहचू शकतो.
गडावर कसे पोहचावे
उंबर्डी
गावात बौद्धवाडी मध्ये रस्त्याला एक मंदिर आणि एका शाहिद जवानाचं
स्मरणार्थ त्यांचा पुतळा स्थापित केला आहे. तिकडून एक मातीचा रस्ता आणि
त्याचा बाजूनेच एक पायवाट गेली आहे. मातीचा रस्ता पुढे एक सुखलेला
ओढ्यातून जातो. तो पुढे ३/४ घरे आहे त्याचा शेवटचा घराजवळ संपतो. दोन्ही
वाटेने पुढे गेलो असता आपल्याला भिंती सारखी एक जुन्या वास्तूचे अवशेष
लागतात. त्याचा भिंत बघितली असता येथे वाढा होता कि मंदिर हे नक्की कळत
नाही . पण हि भिंत २०० ते ३०० मीटर लांब दिसते. भिंत जिथे तुटली आहे तीथून
मातीचा रस्ता किंवा सुखलेला ओढा गेला आहे. ह्या रस्त्याने पुढे गेलो असता. २
/४ मिनिटात तुम्हाला घर लागतात. त्यातील शेवटचा घराजवळ हि वाट संपते.
त्यांचा घराचा अंगणातून किव्हा समोरूनच गडावर जायायला वाट मिळते.त्या
वाटेने पुढे गेलो असता. तुम्हाला एक छोटा सुखलेला ओढा लागतो आणि त्याचा
थोडा पुढे गेलॊ असता .वर उजवीकडे वाट कुर्डुवाडीचा डोंगरात जाते, येथून
कुर्डुवाडीत विजेचा तारा गेल्या आहेत. त्यामुळे वाटेत चढते वेळी
कुर्डुवाडीपर्यंत तारा सतत आपल्या डोक्यावर असतात. त्यामुळे न चुकता आपण
कुर्डुवाडीत पोहचतो.
कुर्डुवाडी पर्यंत पोहचायला आम्हाला १ तास लागला.
कुर्डुवाडीत
पोहचल्यावर गडाचा सुळका आणि बुरुज जवळ दिसतात. त्याचा पायथाशी शाळा आहे
त्यात मंदिर हि आहे.
मंदिरात २ तोफगोळे मूर्तीच्या बाजूला कुंकू लावून
पूजेला ठेवलेले दिसतात. मंदिराचा बाहेर दरवाजाचा जवळ गजलक्ष्मी ची मूर्ती
आहे आणि मंदिराचा समोर काही अंतरावर वीरगळ आहेत.
आम्हाला गडावर दिसलेल्या वास्तू किंवा अवशेष
कुर्डुवाडीतून
गडावर पोहचायला २०/२५ मिनिट लागतात. शाळेचा जवळून गडाचा बुरुज जिथे दिसतो त्यादिशेने
वाट गेली आहे. त्या वाटेने वर चढायला सुरवात केली असता आपण
दरवाज्याचा पायऱ्या पर्यंत पोहचतो. तिथेच डाव्याबाजूला आपल्याला
पानाची
मध्यम आकाराची टाकी लागते आणि समोर कातळात खोदलेल्या पायऱ्या दिसतात, हिथे दरवाजा असावा असे मला वाटते पण हिथे दरवाजाचा काहीच अवशेष दिसत नाही.
येथून वर आल्यावर सरळ
निमुळती वाट पुढे जाते. ती पुढे जाऊन उजवीकडे वळत वर गडावर घेऊन जाते. आणि
आपण काही मिनिटातच गडावर पोहचतो. गडावर आपण गडाचा वरचा मुख्य सुळक्याचा
पायथापाशी पोहचतो. हाच गडाचा माथा मानायला हरकत नाही . कारण गडाचा
सुळक्यावर जायला वाट नाही. गडाचा सुळक्याचा शेवटच्या टोकावर पोहचायचं असेल,
तर तांत्रिकी रित्त्या गिर्यारोहण करायाला लागेल.
वर पोहचल्यावर उजव्याबाजूला बुरुज लागतो आणि डावीकडे मारुतीची मूर्ती आहे.
आम्ही
प्रथम उजव्याबाजूला बुरुजाचा दिशेने गेलो. बुरुजाचा दिशेने जाताना मधेच एक
छोटीशी भिंत किंवा तटबंदी जमिनीचा सपाटीला बांदली आहे. बहुतेक हि तटबंदी
वरील कातळातील फट भरून काढण्यासाठी बांधली असावी. हि भिंत आपल्याला वर
येते वेळी उजवीकडे जेथे वाट वर वळते तिथून दिसते. पुढे बुरुजावर भगवा
पताका लावलेला आहे. पण बुरुजाची वरील तटबंदी उध्वस्त दिसते. तिकडून वाट
पुढे सुळक्याचा भोवती गोल फिरते, त्यादिशेने आम्ही पुढे गेलो. वाटेत
सुळक्याचा कातळाचे मोठं मोठे दगड पडलेले असल्या कारणामुळे दगडावरून वाट
काडत जावे लागते.
वाट काडत पाठी पोहचल्यावर आपण एका सुकलेल्या
टाकीजवळ पोहचतो. येथून पुढे जायायला वाट नाही त्यामुळे पुन्हा पाठी फिरायला
लागते. टाकीजवळ कातळाचा खाली नैसर्गिक गुहा आहे. गुहेची उंची साधारण ४
ते ५ फूट, लांबी ३५ ते ४० फूट आणि रुंदी ५० ते ६० मीटर असावी. गुहा बघून
झाल्यावर पुन्हा पाठी सुरवातीचा जागी यायला लागते. तिकडून कातळाचा
दुसऱ्याबाजूला बाजूला वाट जाते.
पण येथे हि दगडावरून जाऊन पुढे
जायायला लागते. येथे हि कातळाचा खाली नैसर्गिक गुहा आहे. हि गुहा
त्याबाजूचा गुहेपेक्षा खूप मोठी आहे. हि गुहा साधारण १०० मीटर रुंद , ३५ ते
४० फूट लांब आणि ६ ते ७ फूट उंच आहे. दोन्ही गुहेत छोटीछोटी दगडी आणि
माती आहे. ह्या गुहेचा बाजूनेच पुढे वाट जाते तिकडे आपल्याला एक अर्धवट
बुरुज दिसतो . बुरुजाचा भिंतीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. बुरुज अर्धा
गोलाकार आकार मध्ये आहे. पुन्हा वाट कातळाचा बरोबर फिरते, पुढे बुरुजाचा
टोकाला उजवीकडे कातळात घळ झाल्या सारखी एक वाट कातळातून वर जाते. ह्या
वाटेने वर आले असता. बुरुजाचा बाजूने जाऊन जी टाकी बघितली होती. ती टाकी
येथे वरून दिसते. बाकी येथे बघण्यासारखे काही नाही. अर्थात येथे आल्यावर
तुम्ही गडाच्या सुळक्याला पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करतात.
येथून आम्ही
पुन्हा पाठी फिरून सुरवातीचा जागी येऊन आम्ही उतरायला सुरवात केली. आम्हाला
खाली पोहचायला १. ३० तास लागला. काही वर्षांपूर्वी काही गिर्यारोहण
करणाऱ्याने गडाचा वरील सुळक्यावर गुहा शोधून काडली आहे. पण येथे
चढण्यासाठी तुमच्याकडे गिर्यारोहणाचे तांत्रिकी सामान असणे गरजेचे आहे.
पुढे आम्ही मानगड साठी प्रस्थान केले.मांगडचा अनुभव मी हिथे लिहला नाही आहे.
|
उंबर्डी गावातील मंदिर आणि शाहिद जवानांचा स्मारक . आणि कुर्डुगडावर जाणारा मातीचा रस्ता दिसत आहे. |
|
मंदिराचाजवळ वाटेतच हि समाधी दिसते |
|
वाटेत लांब दिसणारी भिंत |
|
विजेचा तारा कुर्डुवाडी पोहचेपर्यंत सतत आपल्या डोक्यावर असतात |
|
शेवटचा घर. ह्या घराचा अंगणातून वाट जाते. ती मी खालील फोटोत अंदाजे लाल बाण करून दाखवली आहे |
|
घराचा अंगणातून वाट जाते ती अंदाजे मी बाणाने दाखवायचं प्रयत्न केला आहे. पुढे विजेचा तारा आपल्याला वाडी पर्यंत नेहतात |
|
पठारावर कुर्डुवाडी जवळ पोहचल्यावर दिसणारा कुर्डुगडाचा सुळका |
|
कुर्डुगडाचा सुळका, वरील मुख्य सुळक्याचा पायथाला बुरुज दिसत आहे आणि कुर्डुगडाचा पायथ्याजवळ असलेली शाळा |
|
लाल बाण दाखवला आहे तिकडे गजलक्ष्मी ची जुनी मूर्ती आहे. |
|
मंदिराचा बाहेरील गजलक्ष्मीची मूर्ती |
|
शाळेतील मंदिर |
|
डाव्या मूर्तीचा बाजूला मोठा तोफगोळा दिसतो आहे आणि एक बारीक तोफगोळा |
|
गडावर चढत असताना वाटेत खाली उजवीकड शाळा दिसत आहे आणि समोर झाडात कुर्डुवाडी |
|
उजवीकडे कातळात कोरलेल्या पायऱ्या आहे आणि डाव्याबाजूला पाईप दिसतो आहे तिकडे टाकी आहे. टाकीतील पाणी पिण्यायोग्य आहे. कुर्डुवाडीत प्ल्यास्टीक ची १००० लिटरची टाकी लावली आहे. टाकीत एक पाईप खाली वाडीत जातो बहुतेक पाइपणे ह्या टाकीतील पाणी घेत असावे. |
|
डावीकडील पाण्याची टाकी |
|
गडावर लागणाऱ्या पायऱ्या. हिथे दरवाजा असावा असे मला वाटते पण हिथे दरवाजाचा काहीच अवशेष दिसत नाही |
|
पायऱ्यांचा पुढे वाट निमुळती आहे आणि पुढे त्या सुखलेल्या झाडाजवळ उजवीकडे वळते |
|
प्रणव आणि हेमेश |
|
|
उजवीकडे वळून हि वाट वर गडावर जाते त्या वेळी लागणाऱ्या पायऱ्या |
|
हि तटबंदी बहुतेक मधली दरी भरून काढण्यासाठी बांधली असावी. कारण वर माथ्यावर गेल्यावर ती तटबंदी न दिसता सपाट जागाच दिसते |
|
जिथे आम्ही सगळे उभे आहोत तिकडे हि खालील फोटोतील हनुमंताची मूर्ती आहे. |
|
उजवीकडे वळल्यावर बुरुजावर पोहचतो. हाच बुरुजाची भिंत आपल्याला खालून दिसते पण बुरुज वरून उध्वस्त दिसतो |
|
बुरुजाचा हिकडून सुळक्याला लागून वाट उजवीकडे फिरते. तिकडे सुळक्याचे मोठे दगड कोसळून पडले आहेत. त्यातून पाठी वाट काडत गेलो असता. खालील फोटोत दिसणाऱ्या टाकी जवळ पोहचतो. |
|
टाकीचा बाजूला म्हणजे आपल्या डाव्याबाजूला कातळात गुहेचा मुख दिसतो. आणि खाली फोटोत गुहेचा आतील फोटो |
|
सुरवातीला जिकडे आपण गडावर पोहचलो तिथे डावीकडे येथून आपण गडाचं दुसऱ्या बाजूला जातो आणि उजवीकडे बुरुजाचा आणि येथून आपल्या बरोबर डाव्याबाजूला मारुतीची मूर्ती आहे. ह्या वाटेत हि सुरवातील कातळाची बरेच दगड कोसळून पडले आहे. |
|
डावी बाजू कडील कातळाचा सुळक्याखालील गुहा आणि सुळक्याचा बाजूने जाणारी वाट हि वाट पुढे दुसऱ्या अर्ध उध्वस्त बुरुज जवळ घेऊन जाते. |
|
हि गुहा खूप मोठी आहे |
|
अर्ध उध्वस्त बुरुज. बुरुजाचा पुढे टोकाला खालील फोटोत दिसत असलेली, कातळातील घळ वर उंच भागी घेऊन जाते येथून आपल्याला उजव्या बाजूची सुकलेली टाकी दिसते. येथे गडाचा सुळक्याला प्रदक्षिणा पूर्ण होते . |
|
वरून दिसणारी उजव्या बाजूकडील टाकी. |
|
पुन्हा परतीचा वाट उतरताना |
No comments:
Post a Comment