Friday, 10 March 2017

Kavnai fort कावनई गड

कावनई 
कपिलधारा तीर्थक्षेत्रा मधून दिसणारे कावनई किल्ल्याचे दर्शन
दोन महिन्या अगोदर विनय त्याचा कार्यालयातील सहकाऱ्यांना कावनई किल्ल्यावर घेऊन जाणार होता, त्याचा सोबत मी हि जाणार होतो. पण काही कारणामुळे विनय जाऊ शकला नाही. त्यामुळे आमचा कावनई राहिला आणि आमच्या ग्रुपमध्ये बहुतेक सगळ्यांचा झाला होता. रविवारी विनय आणि मी दोघांनी कावनई ट्रेक करायाचा ठरवलं. त्यासाठी कसा जायचा सगळी माहिती इंटरनेट वरून काडली. त्यानुसार आम्ही सकाळी ६ ची गीतांजली एक्सप्रेस पकडून इगतपुरीला उतरायचा ठरवलं. मी दादर वरून तर विनय ने कल्याण वरून ट्रेन पकडली. आम्ही ठरल्याप्रमाणे एकाच साधारण डब्ब्यात चढलो. गाडीला गर्दी खूप होती त्यामुळे आम्हाला बसायला नाही मिळालं. आम्हाला इगपुरीला पोहचायला ८. ४५ वाजले. इगतपुरीला आम्ही नाश्ता करून घोटीला जाण्यासाठी शेअर रिक्षा पकडली.  रिक्षा वाले इगतपुरी ते घोटी प्रत्येकी १० रुपये घेतात. पुन्हा घोटी वरून आम्ही st ने न जाता शेअर रिक्षाने वाकीला गेलो. घोटी ते वाकी शेअर रिक्षा प्रत्येकी १० रुपये घेते.  वाकी ते कावनई अंतर ५ कि मी आहे. रिक्षावाल्याला आम्ही वाकी वरून कावनई पर्यंत किती घेईल विचारले असता त्याने आम्हाला १५० रुपये सांगितले. त्यामुळे आम्ही वाकी गावातून कावनई किल्ल्या पर्यंत रस्त्याने चालत गेलो.
आम्हाला कावनई गावात पोहचाल १ तास लागला. 

हा ट्रेक मी जानेवारी मध्ये केला आणि ब्लॉग मार्चचा पहिल्या आठवड्यात  लिहीत आहे त्यामुळे चुकून एकाद  दुसरी गोष्ट स्मरणात नसेल राहिली. ती येथे नमूद नसेल केली. पण बहुतेक मी बरोबरलिहले केले आहे.

वाकी गाव किव्हा वाकी फाटा. आणि येथून दिसणारा कावनई 


Add caption


ह्या टाकीचा तिकडून आम्ही शेतातील वाट धरली. शेतातून काढलेला फोटो


मुंबई ते कावनई गाव कसे पोहचावे
कावनई ला जाण्यासाठी मुंबईहून घोटीला पोहचावे. मुंबई ते घोटी अंतर १२८ किमी आहे.  पण जर तुम्ही रेल्वेने जाणार असाल तर मुंबईहून इगतपुरीला जावे.  तिकडून घोटीला जायायला शेअर रिक्षा उभ्या असतात. पुढे घोटी वरून वाकी गावाला जाणाऱ्या शेअर रिक्षा उभ्या असतात त्याने वाकी फाट्यावर उतरावे. तिकडून कावनई ५ किमी वर आहे. घोटीला जाण्यासाठी भुसावळ पॅसेंजर ट्रेन आहे पण ती ट्रेन घोटी स्थानकात पोहचायला १० वाजतात त्यामुळे  तुम्हाला पुढे उशीर होऊ शकतो. त्यासाठी सकाळी गीतांजली किंवा तपोवन एक्सप्रेस पकडून इगतपुरीला उतरावे.

गडावर जाणारी वाट
कावनई गावाचा अगोदर कपिलधारा आश्रम लागतो त्याचा पुढे १ किमी वर कावनई गाव आहे. कावनई किल्ल्यावर जायायला कावनई डोंगराची एक सोंड गावात जाते त्या सोंडेवरुनच वाट गडावर जाते. गडावर जाणारी वाट मुरलेली. सोंडेवरून वर गेल्यावर सोंडेचा एक छोटा टेकाड लागते. तिकडे गडाचा वरील कातळ लागतो.  तिकडून वाट डावीकडे फिरते ती वर जात उजवीकडे फिरते. ती थेट गडाचा दरवाजा जवळ घेऊन जाते. आम्ही रस्त्याने चालत आल्यामुळे गाव लागायचा आधीच थोड्या अंतरावर रस्त्याला एक उंच सिमेंटची पाण्याची टाकी लागली . तिकडून आम्ही  उजवीकडे शेतात जाण्याऱ्या वाटेने जाऊन. सोडेंच्या दिशेने चालत गेलो.
गडाचा दरवाजाजवळ चडतेवेळी सुरवातीला काही दगडाच्या पायऱ्या आहेत त्या अजून चांगल्या आहेत पण त्याचा वरती दरवाजा जवळील पायऱ्या पूर्ण उध्वस्थ झाल्या आहे.  पण काही गडदुर्ग प्रेमीने तिथे १ लोखंडी शिडी लावली आहे त्यामुळे चढायला सोपे पडते. 
 गडाचा सोंडेवरून दिसणारा बुरुज, हिथे कातळापाशी आल्यावर वाट डावीकडे जाऊन वर उजवीकडे दरवाजा जवळ घेऊन जाते.


गडाचा मुख्य दरवाजा


मुख्य दरवाजाचा आत उजव्या बाजूला लागणारी गुहा 


डोंगराची गावात गेलेली सोंड

गडाचा मुख्य दरवाजाचा आतील पायऱ्या

गडावर पाहण्यासारखे ( मी गडावर जे काही पहिले, ते मी तुम्हाला सांगत आहे)
वाट चडून आल्यावर आपल्याला पहिला गडाचा दरवाजा लागतो. दरवाजा जवळ उजव्याबाजूला एक छोटीशी गुहा आहे. दरवाजातून वर आल्यावर काही पायऱ्या लागतात. थोडा वर गेल्यावर आपण गडाचा माथ्यावर पोहचतो. गडाचा माथ्यावर पोहचायला आम्हाला १ तास लागला.  गडाचा घेर जास्त नाही त्यामुळे गडाचा माथा हि फिरायला जास्त वेळ लागत नाही. पण गडाचाचा माथ्यावर आल्यावर डावीकडे गडचडतेवेळी दिसणारा बुरुज लागतो तिकडे एक वाट जाते, हि वाट मंदिराचा पाठून कड्यावरून जाते आणि एक वाट उजवीकडे तळ्याजवळील मंदिराजवळ जाते. आम्ही पहिला डावीकडे बुरुजाकडे गेलो. तिकडून आम्ही त्या डाव्यावाटेनेच पुढे गेलो. डाव्या वाटेने पुढे तुम्ही गडाचा दुसऱ्या सोंडेकडे पोहचतात.  ह्या सोंडेचा टोकाला पोहचायचं आधी तुम्हाला २ते ३ पाण्याचा टाकी  लागतात. पहिली एक मोठी टाकी कडेवर एक बाजूला भिंत बांधून बांधली आहे. आणि थोडा पुढे वर डाव्या हाताला  दुसरी छोटी टाकी लागते. ह्या दोनी टाकीतील पाणी खराब शेवाळ बांधलेले दिसते.  तिकडून सरळ पुढे चालत गेलो असता अजून एक मोठी पाण्याची सुखलेली टाकी लागते.पण हि टाकी खोल दिसत नाही  तर सपाट दिसते त्यामुळे ती टाकी असावी का अन्यथा दुसरा काही शंका येते. आणि कडेवर तुम्हाला एक बुरुज हि लागतो.  ह्या तिन्ही टाक्या आणि बुरुज जवळ जवळच आहेत. 

डाव्या वाटेने जाताना गडावरून कपिलधारा तीर्थक्षेत्राचा पूर्ण दृश्य दिसते.  बुरुजाचा जवळच एक वाट थोडी खाली जाते. तिकडे एक कातळात झऱ्या जवळच खोदलेली छोटीशी २ हात रुंद टाकी आहे. अजून हि कातळातून छोटीशी पाझर लागलेली होती. ते पाणी टाकीत साचत होते. टाकीतील पाणी साफ आणि स्वच्छ दिसत होते.  त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य वाटत होते. माझ्या आता नक्की स्मरणात नाही पण बहुतेक तिकडेच खाली किंवा वर कातळात कोरलेल्या झिजलेल्या पायऱ्या हि दिसतात.  

पुन्हा वर वाटेवर आल्यावर एक वाट खाली सोंडेजवळ उतरते. आम्ही खाली जाऊन बघून आलो पण एके ठिकाणी ३० ते ४० फुटाचा मोठा कातळ लागतो.  माझ्या अंदाजे बहुतेक तिकडे पूर्वी दोर लावून उतरत असावे असा अंदाज येतो. कारण तेवढा कातळ उतरल्यावर सोंडेवरून सरळ खाली जायायला वाट दिसते. हि वाट तुम्हाला कावनई गावाचा साधारण १. ३० किमी आधी रस्त्यात भेटते. घाटात वर आल्यावर हि सोंडेची वाट दिसते.
टाकी आणि बुरुज बघून झाल्यावर.  सपाट टाकीजवळ आल्यावर वाट डावीकडे वळते ती जवळच मंदिराजवळ घेऊन जाते. सपाट टाकीजवळ येताच आपल्याला डावीकडे वर मंदिर दिसते.  मंदिरामध्ये देवीची मूर्ती आहे. आणि मंदिराचा समोरच तळ आहे .  तळ्याचा लगत उजव्याबाजूने वाट जाते. ती वाट पुढे तळ्याचा बाजूला उघड्यावर महादेवाचा पिंडी जवळ घेऊन जाते.  पिंडीचा बाजूला घराचे/ वाड्याचे  पडके अवशेष दिसतात. त्याच वाटने पुढे थोड्याच अंतरावर डावीकडे आजून एका घराचे/ वाड्याचे अवशेष दिसतात. तीच वाट पुढे मुख्य दरवाजा जवळ जाते.
गडावर बघण्यासाठी एवढेंच  अवशेष आहेत. त्यामुळे गड साधारण अर्धा ते एक तासात बघून होतो.
पण गडावरून दक्षिणे कडे पहिले असता नाशिक जिल्यातील कळसुबाई डोंगराची रांग दिसते. तर उत्तरेकडे थोडा डाव्या बाजूला पाहिल्यावर भास्करगड, हरिहर आणि त्रंबकगड आणि अप्पर वैतरणाचा जलाशय दिसतो. समोर उत्तरेला अंजनेरी दिसतो आणि गडाचा समोर मुखाने गावाचा धरण.
आम्ही जेवण करून तासाभराने निघालो. आम्हाला गड उतरायला पाऊण तास लागला.  पुन्हा आम्ही कावनई गावात न उतरता पुन्हा आलो त्यामार्गे रस्त्याला आलो. तिकडून आम्ही कपिलधारा तीर्थक्षेत्र दर्शनाला गेलो. कपिलधारा मध्ये आम्ही बराच वेळ थांबून विश्रंती घेतली आणि पुन्हा परतीचा मार्गाला चालू लागलो.

जाते वेळी आम्ही २ ते २.५० किमी चालत गेलो. तितक्यात आम्हाला  जवळच तेथील गावातील  एक रिक्षावाला घोटी ला जात होता. त्यामुळे तेवढा आमचा चालायचा वेळ वाचला. रिक्षावाल्याने शेअर मध्ये सोडल्याने आमच्या दोघांचे ३० रुपये घेतले. आम्ही ४.४५ पर्यंत इगतपुरीला पोहचलो. इगतपुरीहुन ५ ची एक्सप्रेस ट्रेन पकडून आम्ही मुंबईचा दिशेने निघालो.

गडावरून दिसणारे कपिलधारा तीर्थक्षेत्राचा दृश्य
गडावरून दिसणारे कपिलधारा तीर्थक्षेत्राचा दृश्य
गडाचा कडेवर भिंतबांधून बांधलेली टाकी



गडावरील दुसरी टाकी. हिथून तुम्हाला मंदिर दिसते.


गडाचा दुसरा बुरुज



कातळात खोदलेल्या पायऱ्या

कातळातुन पाझरणाऱ्या झऱ्या जवळ खोदलेली छोटी टाकी. ह्या टाकीतील पाणी पिण्या साठी स्वच्छ होते.

गडावरील तिसरी कमी खोल अशी सपाट टाकी. हि टाकी बघितली असता मला हि टाकी आहे का अन्य दुसरा काही होता याची शंका होती.

गडाची दुसरी सोंड . हिथे आम्ही खाली जाऊन बघितले असता हा ३० ते ३५ फुटाचा कातळ होता त्या नंतर सरळ वाट सोंडेवरून खाली जात होती. खालच्या फोटोत दिसेल तुम्हाला.


हि सोंड तुम्हाला कावनई चा छोट्या घाट रस्त्यावर घेऊन जाते

मंदिरासमोरील तळे आणि बाजूला उजवीकडून वाड्याचे अवशेष आणि महादेवाचा पिंडी कडे घेऊन जाणारी वाट.




गडावरील मंदिर आणि त्यासमोरील तळे
 
गडावरील वाड्याचे अवशेष
   
वाड्याचे अवशेष आणि महादेवाची पिंड

गडावरून दिसणारी कळसूबाईची रांग . आणि गडावरील मंदिर आणि वाड्याचे अवशेष



गडावरून दिसणारे हरिहर,भास्कर गड आणि अप्पर वैतरणा जलाशय


कपिलधारा तीर्थक्षेत्र मध्ये तीर्थक्षेत्राची आणि कावनई गावाची माहिती दिलेली आहे



No comments:

Post a Comment