दतिया, ओरछा आणि झाशी
भाग १-दतिया
दिनांक- ४ ऑकटोबर, २०१९
मध्यप्रदेश राज्यामधील हे दोन गाव दतिया आणि ओरछा. पण त्यासाठी तुम्हाला उत्तरप्रदेश मधील झांसी रेल्वे स्थानक जवळ आहे. कारण झांसी ते दतिया हे अंतर ३० किमी आहे. दतियासाठी काही मेल एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेन पण जातात पण खूपच ठराविक आहेत आणि त्या वेळेत येतील कि नाही त्याचा भरवसा नाही. त्यापेक्षा बसने गेलेलं बरं. इथे राज्य परिवहनचा बसेस नाहीत म्हणून खाजगी बसेस चालतात.
झाशी बस आगर मधून तुम्हाला दतिया साठी दर तासाला एक बस आहे. ह्याच बस आगारचा बाहेरून ओरछाला जायला सुद्धा शेअर रिक्षा मिळतात. ओरछासाठी पण बस आहेत, पण बस तुम्हाला ८ते १० किमी बाहेर फाट्यावर सोडतात. त्यामुळे ओरछाला बहुतेक सगळेजण हे टमटम/वडाप रिक्षाने प्रवास करतात. झांसी ते ओरछा अंतर १९ किमी आहे.
दतिया
दतिया, हे ओरछासारखे पर्यटकांमध्ये किती प्रसिद्ध आहे. हे माहित नाही, कारण इथे आम्हाला स्थानिक पर्यटकच जास्त दिसले. झासीला हॉटेल मधील एका कर्मचारी ने आम्हाला दतियाबद्दल सांगितले तसे आम्ही दतियाला जाऊन आलो.
दतियाला बघण्यासारखं बरच आहे पण मुख्य करून राजा वीर सिंग महाल (बीर सिंग पॅलेस) आणि राजांचा छत्री बघण्यासारखी आहे. दोन्ही एकमेकांचा विरुद्ध दिशेला आहे. इथे लोक वीर नाही तर बीर सिंग महाल म्हणतात
आम्ही दतिया बस आगारला पोहचल्यावर राजांचा छत्री बघायला गेलो. बस आगार पासून छत्री चालत १० ते १५ मिनटं अंतरावर आहेत. दतियाचे राजे आणि राजघराण्यातील इतर व्यक्तीच्या हि छोट्या समाधी आपल्याला दिसतात. ह्या छत्री करण सागर तलावाच्या काठावर आहेत. काही छोट्या समाधी पाण्यात अर्धंबुडलेल्या दिसतात. ह्या छत्रीच्या समूहात पाच छत्री मोठ्या आहेत. त्यातील दरवाजाने आत आल्यावर उजवीकडील तीन छत्र्या मुख्य दिसतात. ते पुढील प्रमाणे सांगतो.
मुख्य दरवाजाने आत आल्यावर उजवीकडे राजा भवानी सिंग, परीक्षित, विजय बहादूर ह्यांच्या छत्री एका रेषेत लागून आहेत. ह्या तीन छत्रीच बांधकाम सुंदर आहे. छत्रीच्या घुमटाच्या आतील छताच्या भागावर सुंदर चित्र काढली आहेत. विशेष करून श्रीकृष्णची ती हि गोपिका बरोबर नृत्य करताना दिसतात. त्यामुळे ह्या तीन छत्री मुख्य करून पाहण्यासारख्या आहेत.
तर डावीकडे राजा इंद्रजित आणि शुभराज ह्यांची समाधी आहेत. ह्यात इंद्रजित ह्याची समाधी छोटी आहे. शुभराज ह्याची छत्री मोठी आहे पण हि समाधी बाकी तीन समाधी सारखी नाही. आणि काही ठिकाणी पडायला आल्यासारखी वाटते.
छत्री बघून आम्ही पुन्हा बस आगार जवळ गेलो. बस आगारमधून वीर सिंग महालला जाण्यासाठी किलाचौकला जाणारी शेअर टमटम रिक्षा/ वडाप आहेत. त्यासाठी प्रत्येकी १० रुपये घेतात आणि हे अंतर अंदाजे २ किमी आहे. त्यांना बाजार सांगितले कि ते आपल्याला त्या बाजारात सोडतात किंवा रिक्षावाल्याला बीर सिंग महालला जायचा सांगा, मग तो आपल्याला बरोबर त्या बाजारात त्या वाटेवर सोडतो.
तिथून ५ मिनटात तुम्ही महालाजवळ पोहचतात. ह्या वाटेवरच बाजार आहे. इथून किल्ला चौक चालत ५ मिनिटावर आहे. किल्ला चौकात एक दरवाजा आहे, या दरवाजाचा समोरच एका राजाचा पुतळा आहे. त्याकाळी हा दरवाजा किल्ल्यात येण्याचा एक प्रवेशद्वार असावा. मला असे वाटते, बहुतेक गावात अजून हि एक-दोन दरवाजे कुठे तरी असतील.
गुगल नकाशा बघितलं तर आपल्याला महालाच्या पाठीमागे तलावाच्या बाजूने तटबंदी दिसते. ह्याचा वरून अंदाज येतो. पूर्ण महाल आणि गाव त्याकाळी तटबंदीच्या आत असावी. आणि त्याला काही दरवाजे अजून असतील. पण कालांतराने आता गावाचा वाढत्या अतिक्रमणाने तटबंदी नष्ट झाली असावी.
पण महालाचा वरती गेल्यावर पूर्ण दतिया गावाचं दृश्य दिसते. त्या वेळी आपल्याला अजून छोटे मोठे वाडे / हवेली हि दिसतात. समोरच आपल्याला दूरवर राजगड महाल दिसतो.
आम्ही जरा उशिरा म्हणजे सकाळी ११ पर्यंत दातियाला पोहचलो, त्यामुळे आम्हाला जास्त फिरता आल नाही. पण छत्री आणि महाल बघण्यात जास्त वेळ गेला. त्यामुळे आम्हाला अजून कुठे जास्त फिरता आले नाही. तलावात आणि त्याचा काठावर पण झुडपात काही तरी मोडक्या वाड्यासारखे दिसते. त्यासाठी बहुतेक राजगड महालचा इथून खाली गावात वाट जायत असावी. पण तेथे कोणी जात नसावे कारण तेथे झाडे झुडपे खूप दिसत होती. ह्याच राजगड महालाच्या बाजूला खाली गावात एक प्राचीन चीन मंदिर हि आहे. आम्ही वेळे अभावी तेथे गेलो नाही.

महाल ६/७ मजली आहे.बाहेरून आपल्याला ४ मजले दिसतात आणि चौथ्या मजल्यावर मध्य भागी अजून ३ मजले आहेत. बाकी महालाच जास्त वर्णन करत नाही त्यासाठी मी फोटो टाकले आहेत.
आम्ही महाल बघून राजगड महाल बघायला गेलो. आम्हाला बीर सिंग महालचा तिकिट देणाऱ्याने सांगितले होते, तो राजगड महाल आता कायमचा बंद केला आहे. तो महाल आता खाजगी मालमत्ता आहे आणि त्याचा उपयोग बहुतेक हॉटेल साठी करणार आहेत. तरी पण आम्ही बघायला गेलो. किल्ला चौक मधून दतिया स्टेशनला जाणारी शेअर रिक्षा पकडावी. आणि त्यांना पितांबरी माता मंदिर सांगावे. त्यासाठी रिक्षावाले प्रत्येकी १० रुपये घेतात. पितांबरी देवीच्या मंदिरा समोरच रस्त्या पलीकडे एका टेकाड वर महाल आहे.
श्री पितांबरी माता मंदिर हे तेथील प्रसिद्द तीर्थपीठ आहे. पण ते प्राचीन न दिसल्यामुळे आणि सामान हि बाहेर जमा करायला लागत असल्यामुळे, आम्ही फक्त महाल बघायला गेलो. राज महालाच्या सुरक्षा रक्षकाला सांगून महालाचे फक्त दरवाजावरून फोटो काढून, आम्ही पुन्हा झांसीला जायायला निघालो. ह्या महाला कडून वीर सिंग महालाच पूर्ण दृश्य सुंदर दिसते.
दातियाला पूर्ण एक दिवस किंवा जास्तीत जास्त दीड दिवस काढून फिरलो, तर अजून बरेच काही छोट्या मोठया हवेली, तटबंदी बघायला भेटतील. पण ह्यातील काही खाजगी संपत्ती असावेत तर काही पडीक दिसतात. पण वेळे अभावी आम्ही फक्त मुख्य ठिकाण बघून निघालो. आम्हाला झाशीला पोहचेपर्यंत ७ वाजले त्यामुळे बाकी जास्त फिरता आले नाही.
झाशीचा किल्ला आणि ओरछा बद्दल वाचण्याकरिता भाग २ पहावा . त्यासाठी मी खालती दुआ/साखळी दिली आहे. https://kunalstrek.blogspot.com/2020/06/2.html
दतिया छत्री समूह |
दतिया छत्री समूह |
दतिया छत्री समूह मधील तीन मुख्य छत्रीच्या आतील छता वरील चित्र |
तीन मुख्य छत्रीच्या आतील छता वरील चित्र आणि भिंतीवरील चित्र कलाकारी |
वीर सिंग महाल ( राज महाल कडून काढलेला फोटो) |
महालाचा आतील छतावरील चित्र |
हा वाडा, किल्ला चौकात आहे. आणि महालाचा बाजूला आहे. पण बहुतेक इथे आत जाण्यास परवानगी नाही. |
राजमहाल |
राजमहालचा दरवाजा वरून काढलेला फोटो |
राजमहालचा इथून ह्या मंदिराजवळ जायला रस्ता आहे. |
झाशीचा किल्ला आणि ओरछा बद्दल वाचण्याकरिता भाग २ पहावा . त्यासाठी मी खालती दुआ/साखळी दिली आहे. https://kunalstrek.blogspot.com/2020/06/2.html
No comments:
Post a Comment