कर्दमेश्वर मंदिर, वाराणसी
आम्ही काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घेऊन अस्सी घाट बघायला गेलो. तेथून पुढे आम्हाला कर्दमेश्र्वर मंदिर पहायला जायचे होते. काशी मंदिर ते कर्दमेश्र्वर मंदिर अंतर हे अंदाजे ९ किमी आहे. कर्दमेश्वर मंदिर कन्दवा
गावात आहे.
आम्ही अस्सी घाट बघायला आलो होतो. तेथून जवळच असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांचे जन्मस्थान स्मारक बघितले. तेथून आम्हाला मंदिर बघायला जायचे होते, त्यामुळे एका रिक्षावाल्याला भाडे विचारले. त्यांनी फक्त तेथे सोडायचे २०० रुपये सांगितले शेवटी तो १५० रुपये वर आला. आम्ही दोघेच असल्यामुळे आम्हाला ते महाग वाटले पण जर तिघेजण असतो तर शेअर रिक्षा एवढेच झाले असते.
सागर नको म्हणाला, मग आम्ही पुढे चालू लागलो. अंदाजे १. ५ किमी चालल्यानंतर आम्ही बनारस हिंदूविश्वविद्यालय जवळ पोहचलो. ह्या विभागाला लंका असे पण म्हणतात (लंका पोलीस स्थानक पण आहे). तेथून आम्हाला कळाले की इथून पुढे शेअर रिक्षा बदलत चितईपुर जवळ पोहोचता येते, मग आम्ही ४ रिक्षा बदलत कर्दमेश्र्वर् मंदिरा जवळ पोहचलो.
काशी विश्वनाथ मंदिर जवळून पण शेअर रिक्षा भेटते पण ती ही लंकाला बदलायला लागते. आम्ही कुठून कुठं पर्यंत रिक्षा बदलत गेलो ते सांगतो.
पहिली रिक्षा - काशी विश्वनाथ मंदिराच्या गोदौलिया सर्कल मधून लंका साठी ( किंवा बनारस हिंदू महाविद्यालय पर्यंत ) भेटते त्यासाठी प्रत्येकी २० रुपये घेतात. ही रिक्षा तुम्हाला अस्सी घाटच्या रस्त्यानेच घेऊन जाते, मंदिर ते लंका हे अंतर ४ किमी आहे.
दुसरी रिक्षा - लंका (बनारस हिंदूविश्व विद्यालय) पासुन नारिया साठी शेअर रिक्षा भेटते त्यासाठी प्रत्येकी १० रुपये घेतात आणि हे अंतर अंदाजे १ किमी आहे.
तिसरी रिक्षा - नारीया ते DLW पर्यंत भेटते त्यासाठी प्रत्येकी २० रुपये घेतात आणि हे अंतर २.८ किमी आहे.
DLW चौकात (सर्कल) मध्ये उतरल्यावर चितईपुर पोलीस चौकीसाठी रिक्षा उभ्या असतात.
चौथी रिक्षा - DLW ते चितईपुर पोलीस चौकी त्यासाठी प्रत्येकी 10 रुपये घेतात आणि हे अंतर अंदाजे १.५ किमी आहे. पोलीस चौकी मुख्य रस्त्याला आहे. ( इथुन रिक्षा अजून कुठे तरी पुढे जाते ). तेथे उतरल्यावर रस्त्यापलिकडे एक छोटा रस्ता कन्दवा गावात जातो, पण रस्त्याला कर्दमेश्र्वरचा नावाचा मोठा फलक आहे, म्हणून लगेच कळण्यात येते. पोलीस चौकी वरून पुढे मंदिराजवळ जायला रिक्षा मिळत नाही. मग आम्ही चालत निघालो आणि हे अंतर अंदाजे १ किमी आहे. आम्हाला मंदिराजवळ पोहचायला साधारण १५ मिनिटे लागली.
वाराणसी कँट ( रेल्वे स्थानक) वरून पण चिताईपुरला थेट शेअर रिक्षा आहे. कारण आम्ही परत जाते वेळी कँटला जाणारी रिक्षा पकडून DLW (Circle) चौकात उतरलो. रिक्षावाले फक्त कँन्ट म्हणतात पण ते बहुतेक वाराणसी कॅन्ट किंवा जंक्शन रेल्वे स्थानकला जातात.
काशी विश्वनाथ मंदिरवरून चिताईपुर पर्यंत शेअर रिक्षा बदलत जायला लागते, थेट शेअर रिक्षा मिळत नाही.
मंदिर वर्णन:
मंदिर नागर शैलीत आहे. शिखरावर अंगशृंग व उरुशृंग पाहायला मिळतात. मंदिर शिवाचे आहे. मंदिरा बद्दल मी जास्त वर्णन करत नाही ते फोटो वरून कळेलच आणि बाकी माहिती विकिपिडिया वर मिळेलच. मंदिर एका तलावाकाठी आहे त्यामुळे बघायला सुंदर वाटते. मंदिराच्या भिंतीवर आपल्याला मोजकीच शिल्पं दिसतात त्यात मुख्य करून शिवाची आहेत, ब्रह्म आणि विष्णूची ठराविक दिसतात. आम्ही गेलो तेव्हा मंदिर बंद होते. त्यावेळी तेथे काही मुले बसली होती त्यांनी आम्हाला दरवाजा उघडून दिला. आम्ही दर्शन घेऊन पुन्हा मंदिर पाहू लागलो.
मंदिराच्या समोर रस्त्याच्या पलिकडे समोर सूर्याची प्राचीन 2 फुटाची मुर्ती ठेवलेली आहे. ही मूर्ती ज्या कातळावर आहे, तो कातळ चौकोनी आहे. त्याच्या बाकीच्या तिन्ही बाजूला शिल्पे आहेत. त्यांचे ही फोटो मी दिले आहेत. चुकून माझा एका बाजूचा फोटो delete झाल्यामुळे चौथ्या बाजूचा फोटो टाकता आला नाही.
मंदिर बघून आम्ही १५ मिनिटात तेथून निघालो आणि आलो तसेच रिक्षा बदलत बदलत पुन्हा काशी मंदिर जवळ पोहचलो.
मंदिराच वर्णन आणि शिल्पं ची नाव सागर पाटील ने सांगितल्याबद्दल धन्यवाद
मंदिराचं तलाव काठी दिसणारा दृश्य |
गजासुर वध |
उमामहेश्वर |
नटेश्वर शिव
वामन
उजवीकडील शिल्प बलराम व रेवतीचे आहे. त्यात बलराम हल घेऊन उभा आहे आणि मागे सर्प फणा आहे. डावीकडे अर्धनारेश्वर चा शिल्प आहे |
मंदिर समोरील सूर्याची मूर्ती आणि खाली त्याचा तिन् बाजूला असलेली शिल्प. एक बाजूचा फोटो माझा delete झाल्या मुळे टाकता आला नाही. वरती शिवाची पिंड आहे |
No comments:
Post a Comment