दतिया, ओरछा आणि झाशी - भाग २ झासी ,ओरछा
दिनांक- ५ ऑकटोबर, २०१९
झांसीचा किल्ला
तो दिवस आमचा तिथेच संपला. दुसऱ्या दिवशी आम्हाला सचिन भेटणार होता. त्याची ट्रेन सकाळी १० वाजेपर्यंत पोहचणार होती. तो पर्यत आमच्या कडे वेळ होता. त्यामुळे आम्ही सकाळी लवकर उठून त्यावेळेत झाशी किल्ला पाहायचा ठरवलं. आणि मग सचिन आल्यावर ओरछाला जाणार होतो.
आम्ही सकाळी ८ वाजता झाशी किल्ल्यात पोहचलो. किल्ला बहुतेक सकाळी ७/८ ला उघडतो आणि संध्याकाळी ५/६ ला बंद होतो. हॉटेल पासून आम्हाला प्रत्येकी १० रुपयात शेअर रिक्षा भेटली. किल्ला म्हणून सांगितलं कि, रिक्षा वाले तेथे बरोबर सोडतात.
किल्ला एक छोट्या डोंगरावर आहे. किल्ल्याची तटबंदी सुंदर आहे. पुरातत्व विभागाने व्ययस्थित निगराणी केली आहे. किल्ल्यात पूर्ण बघायला ३ तास पुरे होतील. किल्यात मोजून काही ठिकाणे बघण्यासारखी आहेत. त्याची माहिती किल्याचा दरवाजातून आत गेल्यावर, नकाशावर दिली आहे.
पंच महाल, कुदान कि जगह (राणीने घोड्यावरून उडी मारली ती जागा), बिजली तोफ, फाशीची जागा, शंकराचं मंदिर (जिथे राणी नित्यनियमाने पूजा करत असे), गणपती मंदिर आणि भवानी तोफ. किल्ल्याला एका बाजूला खंदक पण दिसतो. दरवाजावर लावलेल्या नकाशामुळे किल्ला पिंजुन काढायला मदत होते. तरी आमचं गणपती मंदिरचा तेथील थोडी बाजू वेळे अभावी राहून गेली.
तो दिवस आमचा तिथेच संपला. दुसऱ्या दिवशी आम्हाला सचिन भेटणार होता. त्याची ट्रेन सकाळी १० वाजेपर्यंत पोहचणार होती. तो पर्यत आमच्या कडे वेळ होता. त्यामुळे आम्ही सकाळी लवकर उठून त्यावेळेत झाशी किल्ला पाहायचा ठरवलं. आणि मग सचिन आल्यावर ओरछाला जाणार होतो.
आम्ही सकाळी ८ वाजता झाशी किल्ल्यात पोहचलो. किल्ला बहुतेक सकाळी ७/८ ला उघडतो आणि संध्याकाळी ५/६ ला बंद होतो. हॉटेल पासून आम्हाला प्रत्येकी १० रुपयात शेअर रिक्षा भेटली. किल्ला म्हणून सांगितलं कि, रिक्षा वाले तेथे बरोबर सोडतात.
किल्ला एक छोट्या डोंगरावर आहे. किल्ल्याची तटबंदी सुंदर आहे. पुरातत्व विभागाने व्ययस्थित निगराणी केली आहे. किल्ल्यात पूर्ण बघायला ३ तास पुरे होतील. किल्यात मोजून काही ठिकाणे बघण्यासारखी आहेत. त्याची माहिती किल्याचा दरवाजातून आत गेल्यावर, नकाशावर दिली आहे.
पंच महाल, कुदान कि जगह (राणीने घोड्यावरून उडी मारली ती जागा), बिजली तोफ, फाशीची जागा, शंकराचं मंदिर (जिथे राणी नित्यनियमाने पूजा करत असे), गणपती मंदिर आणि भवानी तोफ. किल्ल्याला एका बाजूला खंदक पण दिसतो. दरवाजावर लावलेल्या नकाशामुळे किल्ला पिंजुन काढायला मदत होते. तरी आमचं गणपती मंदिरचा तेथील थोडी बाजू वेळे अभावी राहून गेली.
झांसी मध्ये किल्ला व्यतिरिक्त अजून हि राणी महाल आणि झांसी संग्रहालय (म्युझियम) आहे. पण त्यासाठी पूर्ण एक दिवस पाहिजे.
झांसीचा किल्ला पाहून आम्ही ओरछा साठी निघालो. किल्ल्याचा खाली चौकात
येऊन आम्ही शेअर रिक्षाने बस स्थानकात पोहचलो. तिथे आम्हाला सचिन भेटला. बस
स्थानकातून ओरछाला जायला बस आहेत. पण ह्या बसेस, बहुतेक आत ओरछाला न
जाता बाहेर झांसी- मऊराणीपुर महामार्गावर फाट्याला सोडतात. तेथून झांसी-टिकमगड मार्ग लागतो, हा रस्ता ओरछाला जातो. ह्या मार्गावर ओरछा ९ किमी वर आहे.
त्यामुळे बसने जाण्यापेक्षा बहुतेक लोक बस स्थानकाच्या बाहेर टमटम रिक्षा /
वडापने जातात. ती टमटम पूर्ण खचाखच भरत नाही तो पर्यंत जात
नाही. टमटम वाले प्रत्येकी १५ रुपये घेतात. टमटम ने पोहचायला आम्हाला १ तास
लागला .
ओरछा पर्यटकांमध्ये खूप
प्रसिद्ध आहे. येथील सुप्रसिद्ध चतुर्भुज मंदिर, महाल, लक्ष्मी मंदिर,
नदीकाठी असलेल्या छत्री आणि नदीच्या सेतूवरून दिसणारा सूर्यास्त. तसेच
अजून चतुर्भुज मंदिराच्या बाजूला राम मंदिर आहे. सावन भादो स्तंभ, त्याचा
बाजूलाच एक छोटा
दरबार आहे. ह्या दरबारच्या समोरच लागून एक मोठा कटोरा आहे. ह्याला चंदन कटोरा किंवा जहारीला कटोरा ( हे गुगल वर नाव आहे) असे पण म्हणतात.
आम्हाला
ओरछाला पोहचेपर्यंत ११ वाजले. त्यामुळे आम्ही पोहचल्यावर सरळ जेवून घेतल , कारण नंतर पुन्हा जेवण्यात वेळ नको जायला.
चतुर्भूज मंदिर
त्यानंतर
आम्ही पहिल चतुर्भुज मंदिर
बघायला गेलो. मंदिर बघायला आत गेल्यावर कळलं कि पहिलं महाल बघायला पाहिजे,
कारण तेथे दोघांची तिकीट भेटते. ते तिकीट मंदिरात एक माणूस बघायला माघतो. खास करून मंदिराच्या
प्रत्येक मजल्यावर किंवा छतावर जायचा असेल तर तिकीट लागते. त्याशिवाय छतावर
सोडत नाही, आम्हाला हि सोडत नव्हता. त्याला आम्ही सांगितलं, आम्ही नंतर
तेथे गेल्यावर तिकीट काढतो. तरी पण तो
आम्हाला वर छतावर जायला सोडत नव्हता. मग त्याला आम्ही तिघांचे ३० रुपये
दिले, त्यानंतर त्यांनी आम्हाला तो दरवाजा उघडून दिला. पण त्यामुळे आम्हाला
पूर्ण मंदिराच्या कळसापर्यंत पोहचता आले.
मंदिर चार मजल्याच आहे. त्याचा
प्रत्येक मजल्यावर जाता येते. अगदी कळसाच्या टोकापर्यंत. प्रत्येक मजल्याला पूर्ण फिरता येते. आम्ही
सगळे मजले बघत बघत मंदिराच्या छतावर पोहचलो. मंदिराच्या मुख्य कळसापर्यंत जायला पण
आतून पायऱ्या होत्या पण त्या डागडुजी नसल्यामुळे जाण्यास योग्य
वाटत नव्हत्या.
मंदिर आणि देवाचं दर्शन घेऊन आम्ही खाली आलो. बाजूलाच तेथे राम
मंदिर आहे, आम्हाला मंदिर बघायचं होत पण गर्दी असल्यामुळे आम्ही टाळलं. त्या मंदिराचा बाजूलाच दोन टोलेजंग सावन भादो स्तंभ बघितले. त्याचा बाजूलाच छोटा दरबार आहे, दरबाराचा समोर लागून चंदन कटोरा (प्याला) किंवा जहरीला कटोरा आहे.
ते
पाहून आम्ही महाल बघायला गेलो. महाल मंदिराच्या समोरच नदीच्या पलिकडे आहे.
चालत पाच मिनटात आम्ही तेथे पोहचलो. इथे महाल आणि मंदिर
दोंघाची तिकीट भेटते
महाल
आम्ही महालात गेल्यावर ६०० रुपये देऊन गाईड
घेतला. एक मुलगा एकटाच महाल बघायला आला होता, तो ही आमच्या सोबत मिळाला. त्यामुळे आम्हाला
चौघात मिळून गाईड करता आला. त्या गाईड ने आम्हाला दोन्ही महाल,
लक्ष्मी मंदिर, आणि छत्री दाखविल्या पण विशेष करून त्यांनी महाल बद्दलची
चांगली माहिती सांगितली. बाकीच्या ठिकाणी त्यांनी काही जास्त माहिती
सांगितली नाही.
महाला बद्दल
बोलायचं तर पहिला पुढे बुंदेल राजाचं महाल आहे, आणि त्याला लागूनच बाजूला जहागीर महाल आहे. ह्या महालाची गोष्ट अशी आहे, बुंदेल राजाने मुघलांच्या
राजा जहांगीर साठी भेट म्हणून हा महाल बांधला. त्यामुळे त्याला जहांगीर महाल
म्हणतात. ह्या महालात जहांगीर फक्त एक दिवसच राहिला त्यानंतर तो महाल कधी कोणीच वापरला
नाही. तो महाल बुंदेल राजाने मुगलांसाठीच ठेवला.
बुंदेल राजाच्या महाल पेक्षा जहांगीर महाल बघायला सुंदर वाटतो. पण बुंदेल राजाच्या महालात भिंतीवरती, आतील छतावर सुंदर चित्र काढलेली दिसतात. खास करून राजा आणि राणीच्या खोलीत सुंदर चित्र आहेत.राजा राणीचा खोलीत श्रीराम आणि सीतामाता, श्रीकृष्णा, गणपती, पौराणिक कथा तसेच अन्य चित्र हि दिसतात. आणि बाकी महालाच्या छतावर फुलवेल्यांची नक्षी काढलेली दिसतात. राजाचा खोलीतून इतर राणीच्या खोलीत जायला मुख्य दरवाजा व्यतिरिक्त दुसरा छोटा दरवाजा पण आहे. गाईडने सांगितले राजा राणीच्या खोलीत जायला, हा दरवाजा वापरत असे.
जहाँगीर महाल
बुंदेल राजाचा महाल बघून आम्ही जहाँगीर महाल बघायला गेलो. ह्या महाल मध्ये मला चित्र दिसली नाही. पण महालाचा बाहेरील भिंतींना मिनाकारी नक्षी आहे. पण कालांतराने ती आता दिसत नाही. काही ठिकाणी त्याचा निळा रंग दिसतो. महालाला बहुतेक एकच मुख्य दरवाजा आहे आणि तो पाठी मागे आहे. कारण बुंदेल राजाचा महाल बघून, पाठी मागून ह्या महालात प्रवेश करायला लागतो. मुख्य दरवाजाचा समोरून तटबंदी असल्यामुळे वाट दिसत नाही. बहुतेक त्याकाळी फिरून वाट असावी. महालाचा मुख्य दरवाजा समोर उंटखाना आहे.
ह्या महालाचा खाली सैनिकांसाठी खाली खोल्या होत्या. दरवाजाचा खाली आल्यावर त्या दिसतात. त्याचा उपयोग बहुतेक सैनिकांना ठेवण्यासाठी, गुप्त सैनिक किंवा लडाई साठी सज्य ठेवण्यासाठी पण होत असावा असे वाटते.
लक्ष्मी मंदिर
महाल
बघून आम्ही लक्ष्मी मंदिर बघायला गेलो. लक्ष्मी मंदिरासाठी टमटम रिक्षा
करून जायला लागते. त्यासाठी आम्ही येऊन जाऊन १५० रुपये दिले. लक्ष्मी
मंदिर खूप सुंदरआहे. मंदिर त्रिकोणी आकार मध्ये आहे. मंदिरातील लक्ष्मी
देवीची पंच धातूची ४/६ फुटाची मूर्ती इंग्रज घेऊन गेल्यामुळे, त्याजागी
छोटी मूर्ती ठेवून दिवाबत्ती करतात. मंदिराच्या आतील छतावर आणि भिंतीवर सुंदर अश्या
देवीदेवतांची चित्र आहे. तसेच मंदिराला प्रदक्षिणा घालून
मंदिराच्या बाहेर भिंतीवर वरती किनाऱ्यावर लाल पट्टी मध्ये लहान चित्र
आहेत. ती पाहून आम्ही छत्री बघायला गेलो.
छत्री समूह
इथे बुंदेल
राजांच्या ७/८ छत्री आहेत. ज्याची छत्री जेवढी मोठी तेवढी
त्या राजाची किर्ती होती, असे आम्हाला गाईडने सांगितले. त्त्यानुसार एक मुख्य आणि मोठी छत्री नदीच्या बाजूला लागूनच आहे. छत्रीच्या कळसावर आपल्याला खूप सारे गरुड दिसतात. गाईडने सांगितल्या प्रमाणे तिथे जवळच गरुडाच्या सरंक्षणासाठी प्रकल्प आहे. तेथे त्यांना खायला वगैरे देतात. म्हणून इथे गरुड जास्त दिसतात.
छत्री नंदीच्या तीरावर असल्याने सुंदर दृष दिसते. पण आम्हाला सूर्यास्त ही
बघायचं होता. पण ढगाळ वातवरणामुळे आम्हाला सूर्यास्त दिसला नाही.
छत्री बघून आम्ही संध्याकाळी ७ वाजता पुन्हा झासी साठी निघालो. दुसऱ्या दिवशी आम्हाला खजुराओ आणि कलिंगरला जायचे होते
ओरछाचे फोटो जास्त असल्यामुळे, मी सगळे फोटो मी भाग ३ मध्ये लावले आहे. ह्यात मी झांसी किल्याचे फोटो टाकले नाहीत.
No comments:
Post a Comment