Trekaway: Aasava Fort, आसावा किल्ला
https://youtu.be/jfyXxVza7xs
Friday, 18 August 2017
Monday, 14 August 2017
Aasava Fort, आसावा किल्ला
Aasava Fort
![]() |
| नाला पार करून आल्यावर समोर दिसणारा आसावा गड गडावर वाट कशी जाते, पाहण्यासाठी मी बनविलेल्या विडिओची youtube लिंक वर दिली आहे. |
मुंबई ते बोईसर
- रेल्वेने पश्चिम रेल्वेने बोईसर स्थानकात उतरावे.
- सकाळी ५. ४० ची दादरवरून चर्चगेट-डहाणू लोकल आहे
- डोंबिवली वरून सकाळी ५.४० ची बोईसर शटल आहे. ६. ५६ ला विरार वरून सुटते , ती ८. १०ला बोईसर ला पोहचते.
- ७.४० ची विरार- डहाणू लोकल ८. २८ बोईसरला पोहचते
- बोईसर पश्चिमला नवकर नाक्यावरून वारंगडे गाव, विराज फॅक्टरी शेअर टमटम रिक्षा १५ मिंनिताट पोहचवतात. प्रत्येकी १० रुपये घेतात
आसावा किल्ला पालघर जिल्ह्यातील बोईसर पूर्वेला रेल्वे स्थानकापासून ८ कि.मी अंतरावर आहे. त्यासाठी तुम्हाला वारंगडे गावी, विराज फॅक्टरी जवळ उतरायला लागते. टमटम किंवा बसने १०ते १५ मिनट लागतात.
प्रणव सकाळी ५.४० ची डोंबिवली-बोईसर शटलने येणार होता. म्हणून मी दादर वरून ५.४० ची डहाणू लोकलने न जाता. ५.४५ ची विरार जलदने विरारला उतरून ती शटल पकडावी असा विचार केला होता. पण मला ५.३५ ची विरार जलद मिळालामुळे, मी ५.२५ ला वसईला पोहचल्यामुळे, वसईलाच बोईसर शटल पकडली. बोइसरला पोहचेपर्यंत ८. १० झाले होते.
माझ्या मते, डोंबवली -बोईसर शटल बोईसरला जरा उशिराच पोहचते. त्यामुळे नंतरची विरार-डहाणू शटल ७.४० ला विरार वरून सुटते, ती बोईसरला ८. २८ ला पोहचवते. किंवा सकाळी ५.४० ची डहाणू लोकल लवकर असल्यामुळे ७. ४० ची शटल विरार वरून पकडू शकतात. काळदुर्ग किंवा आसावागड सोपे असल्यामुळे कमी वेळेत होतात त्यासाठी ७. ४० ची विरार-डहाणू शटल पकडून आरामात जाऊ शकतात.
बोईसर पश्चिमेला आम्ही नाश्ता केला आणि वारंगडे गावासाठी रिक्षा कुठून मिळतात विचारू लागलो. बोईसर पश्चिम ते वारंगडे गाव सतत शेअर टमटम (वडाप) असतात. म्हणून आम्ही एसटी साठी वेळ न घालवता टमटम साठी गेलो. वारंगडे साठी नवापूर नाकयावरून टमटम भेटतात. त्यासाठी स्थानकाबाहेरून मुंबईचा दिशेने थोडा पाठी जायायला लागते. टमटमने प्रत्येकी १० रुपये घेतात. रिक्षावाल्यांना वारंगडे गाव, विराज फॅक्टरी सांगितल असता तुम्हाला बरोबर त्याठिकाणी सोडतात.
विराज फॅक्टरीचा (उजव्या) बाजूने एक रस्ता गावात जातो. त्या रस्त्याने ५ते १० मिनटात आपण गावात पोहचतो. पण गावात पोहोचायचा आधी आपल्याला एक ओढा गावातून वाहताना दिसतो. त्या ओढ्याचा पलीकडे एक वाट जाते. तो ओढा ओलांडून त्या वाटेने सरळ चालत राहिले असता आपल्याला आसावा किल्ला दिसतो.
आपण थोडा पुढे पोहचलो असता समोर एक नाला किंवा छोटा कालवा आडवा गेलेला दिसत . गडावर जाण्यासाठी उजवीकडेची वाट धरावी. नाला/ छोटा कालवा बहुतेक धरणाचे पाणी दुसऱ्या धरणात किंवा इतर पाणी प्रकल्पांना पाणी सोडण्यासाठी बनवला आहे. त्यामुळे हा नाला दोनही दिशेला खूप लांबपर्यंत गेलेला आहे. नाल्याला लागून एक मोठी वाट डावीकडे आणि एक उजवीकडे जाते.
नाला पार करून गडावर जाण्यासाठी ३ छोटे पूल लागतील. पहिला पूल आपल्याला ज्याठिकाणी डावीकडे आणि उजवीकडे जाण्यासाठी वाट आहे, तिथे आहे. पहिला पूल तुम्हाला मिळेलच असा नाही. कारण आम्ही त्या वाटेजवळ पोहचण्याचा आधी,आम्हाला मधेच दोन वाटा लागल्या. त्यात आम्ही उजवी वाट धरली त्यामुळे आम्ही पहिल्या पुलाच्या थोडा पुढे आलो. उजिवाकडे पुढे गेल्यावर आणखीन दोन पूल दिसतात. हे दोन्ही पूल एकमेकांचा जवळच अंतरावर आहे ( त्यात आधीचा लहान आहे आणि पुढचा थोडा मोठा आहे). ह्यात जो दुसरा पूल (म्हणजेच तिसरा पूल) आहे, त्या पुलावरून नाला पार करायला लागतो.
नाला पार केल्यावर एक वाट वर डोंगरावर जाते. हि वाट चांगली रुळलेली आहे. त्यामुळे तुम्ही न चुकता गडावर पोहचता. गडावर जाणारी वाट गडाचा डोंगराला लागून असलेल्या छोट्या डोंगरावरून गडावर जाते. त्यामुळे तुम्ही तासाभरात गडावर पोहचतात.
गडावरील वर्णन
गडाचा माथ्यावर पोहचण्याआधी पहिली तुम्हाला छोटी तटबंदी दिसते. तटबंदीचा बाजूने आपण गडावर पोहचतो. गडाचा माथ्यावर पोहचल्यावर तुम्ही उजिवाकडून किंवा डावीकडून गड पाहायला सुरवात करू शकतात. आम्ही डावीकडून सुरवात केली.
डावीकडे पहिल्या दोन पाण्याचा टाकी दिसतात. पहिली टाकी लांब आयताकृती आहे. त्याला चिकटूनच वर दुसरी छोटी चौकोनी आहे. ह्या टाकीचा वरच लागून गडाची सर्वोच जागी भगवा झेंडा लावला आहे. डावीकडे म्हणजे उत्तरेला तुम्हाला खालील वारंगडे गाव आणि विराज फॅक्टरी चा पूर्ण परिसर दिसतो. झेंडयाचा जवळून समोर पूर्वेला. दोन टाकीच्या विरुद्ध दिशेला म्हणजेच पाठी खाली गेलो असता. गडावरील सगळ्यात मोठी पाण्याची टाकी दिसते. हि टाकी झेंड्या जवळून हि दृष्टीस पडते. टाकीचा दिशेने जाते वेळी टाकीजवळ आपल्याला कातळ लागतो. त्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. पण त्या झिजलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे कळून येत नाही. हि टाकी आयताकृती आहे. साधारण २० फूट खोल आहे, तसेच २० फूट लांब आणि १५ फूट रुंद आहे. टाकीत उतरण्यासाठी विहिरीप्रमाणे लहान पायऱ्या आहेत. टाकीची एका बाजूची भिंत कोपऱ्याला कोसळल्यामुळे टाकीत पाणी साचत नाही.
टाकी बघून आम्ही पाठी फिरून वर झेंड्या कडे न जाता, डावीकडे दक्षिण दिशेने गेलो. डावी कडे गेलो असता प्रथम एक जोत्याचा चौथरा लागतो. हा चौथरा आपल्याला चौथऱ्याच्या बाजूने खाली आल्यावरच दिसण्यात येतो. त्या चौथऱ्याच्या थोडा खाली, एकदम समोर गडाचा दरवाजा दिसतो.
दरवाजाचा डाव्याबाजूला असलेल्या चौथऱ्यामुळे दरवाजा ओळखण्यात येतो. अन्यथा दरवाजाचे काही अवशेष दिसत नाही. तुम्ही दरवाजाने खाली उतरल्यावर तुम्हाला दरवाजाची खालील चौथरा दिसतो. दरवाजाचा पायऱ्या उध्वस्त झाल्याने मुळे पायऱ्या राहिल्या नाही आहेत. त्यामुळे उतरतेवेळी जपून उतरावे लागते. दरवाजाचा वाटेने खाली जातो तेव्हा दरवाजा पासून काही अंतराजवळच कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात
दरवाजाचा वर म्हणजेच आत डाव्या बाजूला चौक्यांचे / घराचा जोत्याचे अवशेष दिसतात. ह्या दरवाजाने वाट खाली गुहे जवळून कोरडीपाडा गावात जाते. ( कोरडीपाडा गाव बहुतेक मुख्य गाव गुंडाळे मध्येच आहे. पण कोरडीपाडा म्हणजेच गावातील एक वाडीचे नाव असावे. गावातच सध्याचे सहलीसाठी प्रसिद्द असणारे मामाच गाव रिसॉर्ट आहे. )
पण दरवाजाने खाली न उतरता, आम्ही उजवीकडे पश्चिमेला गेलो. उजिवाकडे गडाची चांगल्या अवस्थेत असलेली, गडावरची सगळ्यात मोठी तटबंदीची भिंत दिसते. पण हि तटबंदी बघण्यासाठी आपल्याला खाली उतरायला लागते कारण दरवाजाचा उजवीकडून आल्यावर आपण ह्या तटबंदीचा वरती असलेल्या चौथऱ्यावर येतो. त्यामुळे हि तटबंदी बघण्यासाठी खाली उतरायला लागते. किंवा दरवाजाने खाली उतरून उजिवाकडे वाट वर तटबंदी जवळ जाते. त्यामुळे पूर्ण तटबंदी दिसते. तटबंदीवरून आपण जर पाठी (उत्तरेला) गेलो असता. आपण पहिल्या तटबंदी जवळून गडमाथ्यावर आलो तिथे पोहचतो.
गडावरून फक्त पश्चिमेला सोडला तर दूरवरचा डोंगररांगा दिसतात. त्यात मुख्य म्हणजे दक्षिणेला काळदुर्ग आणि त्या जवळील पालघर- मनोर रस्त्यावरील धरण दिसते. पूर्वेला सूर्या नदी, उत्तरेला खाली वारंगडे गावाचा परिसर आणि पश्चिमेला बोईसर शहराचा परिसर दिसतो
गुहेजवळ पोहचण्याचे आणि गुहेतील वर्णन
आम्हाला गुहा पण बघायची होती. वर सांगितल्याप्रमाणे आम्ही गडाचा दरवाजाचा वाटेने खाली उतरलो. हीच वाट पुढे तुम्हाला कोरडीपाडा (मामाचा गाव) गावात घेऊन जाते. ह्या वाटेवर दुर्गप्रेमीने दगडावर जागोजागी बाणाचे चिन्ह केले आहेत. त्यामुळे खूप मदत होते. हि वाट त्याकाळी बहुतेक पक्की असावी कारण अजून एके ठिकाणी एका कातळात झिलेल्या काही पायऱ्या मिळतात. गडावरून आम्ही १५ ते २० मिनटात गुहे जवळ पोहोचलो. गुहा नैसर्गिक बनलेली आहे. सुरवातीला आपल्याला एक छोटी गुहा लागते. त्याला लागूनच पुढे मोठी गुहा आहे. नैसर्गिक गुहा असल्यामुळे गुहेचा तोंड रुंदीला लांब आहे. गुहेची तोंडाची उंची साधारण ६ ते साडे सहा फूट आहे. गुहा आत मध्ये निमुळती होत जाते.
पावसामुळे गुहेत खोलगट भागात थोडा पाणी साचला होता. गुहा २५ते ३० फूट आडवी रुंद आणि आता मध्ये हि तेवडीच लांब होती. गुहेत एक ३ फूट उंचीचा मुंग्यांचा वारूळ सारखा उभा दगड आहे. शुक्रवारी म्हणजेच आदल्या दिवशी नाग पंचमी होती. त्यामुळे गावातल्या लोकांनी त्या दगडाला हार घालून पूजा केली होती. आमचा पाठून आलेल्या गावातल्या मुलाने आम्हाला सांगितले या दगडात पहिले साप राहत असे . त्यामुळे लोक त्याची पूजा करतात. हि गाववाल्यांची श्रद्धा असावी.
गुहेचा एक बाजूचा तोंडावर जुन्या बांधकामाची साधारण भिंत ३ फूट उंचीची भिंत दिसते. हि भिंतअर्धवर्तुळाकार आहे. भिंत किती जुनी आहे ह्याचा अंदाज मला आला नाही. भिंत गुहेचा मोठया तोंडावर बांधली आहे. पण भिंत मध्येच पूर्ण तुटलेली आहे. एका बाजूला गुहेच्या कोपऱ्यातून भिंत चालू होते, त्या भिंतीवरती अर्धी नवीन दगडाची सिमेंटने भिंत बांधली आहे. ते भिंत पाहताच कळून येते. त्या भिंतीमुळे गुहेचा बाजूला एक छोटी गुहा झाली आहे. माझ्या अंदाजे बहुतेक त्याकाळी गुहेत पाणी साठवण्यासाठी भिंत बांधली असावी . कारण ज्या ठिकाणी भिंत आहे तो भाग थोडा खोलगट आहे . त्याकाळी भिंतीमुळे कमीतकमी गुडघा किंवा कंबरेएवढे पाणी गुहेत साचत असावे. गुहेची लांबी रुंदी बघता, गुहेतील पाणी सुकल्यानंतर २५/३० लोक आराम के साथ राहतील. गुहेचा बाहेरून खालील कोरडीपाडा, गुंडाळे गावाचा पूर्ण परिसर दिसतो.
गुहेचा बाजूने खालील कोरडीपाडा गावात (गुंडाळे गाव) पोहचण्याचा वर्णन
आम्ही गुहा बघून झाल्यानंतर पुन्हा गडावर न जाता, खाली कोरडीपाडा गावात उतरायचा विचार केला. आम्ही विचार करत होतो वाट सापडेल कि नाही, कारण खाली पूर्ण जंगल दिसत होता. पण आम्ही गुहेतून गाव कुठेचा दिशेने आहे ते नीट बघून ठेवला. गावाचा दिशेने आम्हाला वाट शोधत जायायचा आहे असा ठरवून पुढे चालू लागलो . पण कुठचा तरी दुर्गप्रेमीने खाली कोरडीपाडा गावा पर्यंत बाणाचे चिन्ह करून ठेवले होते, त्यामुळे आम्हाला वाट शोधायला लागला नाही.
माझ्या मते, तुम्ही जर अनुभवी ट्रेकर असाल तरच ह्या वाटेने जावे.
कोरडीपाडा गावाची वाट वारंगडे गावातील वाटे सारखी सोपी नाही. कोरडीपाडातून चढाई केली तर गड मध्यम श्रेणीत मोडता येईल. बहुतेक वाट दगडातून आहे. पावसात बहुतेक ठिकाणी पाण्यामुळे वाट निसरडी होत असेल. आठवडा भरात बहुतेक ह्याभागात मोठा पाऊस झाला नसेल त्यामुळे वाट निसरडी नव्हती वाटत. जर तुम्हाला वाटेत बाणाची चिन्ह दिसले नाहीत , तर वाट चुकण्याची दाट शक्यता आहे.
आम्हाला गुहे पासून खाली कोरडीपाड्यात उतरायला सवातास तास लागला.
कोरडीपाड्यातून मुख्य रस्त्या साधारण २ किमी असेल. कोरीडपाडयातून रस्त्याला पोहचेपर्यंत आम्हाला १५ मि. लागली. आम्ही दोन वाजेपर्यंत रस्त्याला पोहचलो. त्यामुळे आम्हाला २. ३४ ची दादर लोकल भेटली तर बर होईल, असा विचार करत होते. आम्हाला १० मिनिटाने बोइसर एसटी भेटली. बोईसर पोहचेपर्यंत २. ३५ झाले होते. पण लोकल ५ मिनटं उशिरा असल्यामुळे आम्हाला मिळाली.
गडावर गुंडावले गाव, कोरडीपाडा किंवा मामांचा गावचा बाजूने चढाई करायची असेल, तर एसटीने उतरण्यासाठी पेट्रोल पंम्प लक्षात ठेवा.
![]() |
| नाल्यावरील तिसरा पूल (किंवा तुम्हाला पहिला नाही भेटला तर हा दुसरा पूल). हा पूल पारकरून जायायला लागते. |
![]() |
| वारंगडे गावातून रस्त्याने विराज फॅक्टरीचा बाजूने . नाला पार करून नंतर पुलाचा दिशेला जाऊन. पूल पार करून वर ह्या वाटेने आपण वर येते. मी फोटोत अंदाजे दाखवायचा प्रयत्न केला आहे. |
![]() |
| गडाचा माथ्यावर पोहचण्याआधी दिसणारी तटबंदी, ह्या तटबंदीचा बाजूने गडाचा माथ्यावर वाट जाते. खालील फोटोत तटबंदीचा बाजूने जाताना काढलेला फोटो. |
![]() |
| गडावरील लागून असलेल्या दोन टाक्या |
![]() |
| गडावरील सगळ्यात मोठी टाकी. |
![]() |
| प्रणव |
![]() |
| टाकीचा बाजूने काढलेला फोटो. |
![]() |
| गडावरून दिसणारा वारंगडे गावाचा दृश्य |
![]() |
| हा चौथरा, बाजूने खाली आल्यावर दिसतो. हे खालील फोटोत पाहिल्यावर कळून येईल. |
![]() |
| वरील चौथऱ्या वरून समोर दिसणारा दरवाजा. दरवाजा डावीकडील चौथऱ्यामुळे कळण्यात येतो. हे फोटो कळण्यात येते. |
![]() |
| दरवाजाच्या डावीकडे दिसणारे चौथरे |
![]() |
| दरवाजा उतरल्यावर दिसणारा दरवाजाचा चौथरा आणि दरवाजाला पायऱ्या नाही आहेत. बाजूला वर चढण्यासाठी बाणाचा चिन्ह केला आहे |
![]() |
| दरवाजाने एकदम थोडा खाली उतरल्यावर डावीकडे ह्या कातळात खोदलेल्या पायऱ्या दिसतात. |
![]() |
| तटबंदीचा वरती एक चौथरा लागतो त्यावर प्रणव उभा आहे. ह्या चौथऱ्यावरून खालील फोटोत दिसणारे दृश्य दिसते. |
![]() |
| प्रणवने टिपलेला माझा फोटो |
| फोटोत शेवटी पालघर चा काळदुर्ग दिसत आहे, आणि त्याचा पायथ्या खाली पालघर मनोरा रस्त्यला लागून असणारा धरण दिसतो आहे |
![]() |
| गडाचा खाली पोहचेपर्यंत वाट अशाच खडकातून खाली उतरते. बहुतेक ठिकाणी दुर्गप्रेमीने फोटोत दिसत असलेलं बाणाचे चिन्ह केले आहेत. |
![]() |
| हि वाट त्याकाळी वापरात असावी. हे कातळात कोरलेल्या पायऱ्या वरून कळून येते. |
![]() |
| पहिली छोटी गुहा , त्याचा पुढे लागूनच मोठी गुहा आहे |
![]() |
| मोठी गुहेतील आतील फोटो. फोटो गावकरी पुजणारा दगड दिसत आहे. |
![]() |
| गडाचा मोठ्या तोंडावर तुटलेली जुनी भिंत दिसत आहे. |
![]() |
| गुहेत ज्या बाजूने येतो तेथील गुहेचा निमुळता तोंड. |
![]() |
| गुहेचा बाहेरून काढलेला फोटो |
![]() |
| प्रणवने कोपरीपाडा गावात जाते वेळी काढलेला माझा वाटेतील फोटो |
![]() |
| जुन्या भिंतीवर बांधलेली नबीन भिंत दिसत आहे. वरील फोटो कळून येते. |
![]() |
| गुहेतुन दिसणारे गुंडाळे (कोरडीपाडा ) गावाचे दृश्य |
![]() |
| गडाचा खाली आल्यावर, खालून दिसणारी गुहा लाल वर्तुळात दाखवली आहे. |
![]() |
| कोरडीपाड्यात जाणारी वाट |
![]() |
| कोरडीपाडा गाव (गुंडाळे गाव) |
![]() |
| कोरडी पाड्यातून मुख्य रस्त्याला जाताना काढलेले आसावा गडाचा फोटो. गावातून गुहा दिसते तिथे मी लाल वर्तुळात दाखवली आहे |
![]() |
| मुख्य रस्त्यासाठी जाताना प्रणव आणि मी |
गडावर वाट कशी जाते, पाहण्यासाठी मी बनविलेल्या विडिओची youtube लिंक वर दिली आहे.
Wednesday, 26 July 2017
Tikona Fort (Vitanggad), तिकोना गड
![]() |
| तिकोना गड, चोरदरवाचा वाटेने सोंडेवरून काढलेला फोटो . ह्याच सोंडेवरून डावीकडे वाट वरती वळते |
प्रवास कसा करावा त्याची थोडक्यात माहिती
➤ मुंबई ते लोणावळा- इंद्रायणी एक्सप्रेस- सकाळी ५.४० ची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून
- ७. ५८ वाजता लोणावळा पोहचते .
➤ कामशेत साठी लोणावळा ते पुणे (शटल) लोकल ट्रेन. ८. २० ची
➤ कामशेत ते तिकोनापेठ अंतर २० किमी आहे. साधारण पाऊणतास ते १ तास लागतो.
(कामशेत ते पवनानगर १४/१५ किमी, पवनानगर ते तिकोनापेठ अंदाजे ६ किमी )
➤ कामशेत वरून तिकोनापेठसाठी शिवाजी चौकातून ९.२०/९.३० ची एसटी .
➤ ती एसटी चुकली तर जुन्या महामार्गावरून पवनानगर साठी शेअर जीप किंवा सुमो पकडने
प्रत्येकी २० रुपये घेतात. पवनानगर वरून तिकोनापेठ साठी शेअर छोटा टेम्पो प्रत्येकी १०रु घेतो.
गाडी पूर्ण भरेपर्यंत वाट पहावी लागते.
गाडी पूर्ण भरेपर्यंत वाट पहावी लागते.
दोन
कारणामुळे तिकोना गड माझ्या चांगलाच लक्षात राहील, एक प्रणवला ताप
असूनसुद्धा ट्रेकला आला आणि दुसरा गड उतरताना शेवटी कुत्र्याचा भूंकण्याचा
प्रसंग. चुकून अजून एक प्रसंग आला असता तर तिकोना गडाचा शिखराचा तीन कोनाचा
आकाराप्रमाणे, तिकोनाचे तीन कारण म्हणून जास्तच लक्षात राहिले असता. पण
तिसरा कारण नाही झाला ते पण बरच झालं.
उत्तरेतून ट्रेक वरून आल्यावर सह्याद्रीत ट्रेक करण्यात मला वेगळाच आनंद येतो. त्यामुळे पुन्हा मी सह्याद्रीत कधी ट्रेक करतो असा झाला होता. मग ठरला मी प्रणवला विचारला आणि तो हि तयार झाला. आम्ही कुठे जायायच ठरवत होतो. प्रणव ने नाखिंड सुचविला, पण मी नाखिंड ला जाऊन आलो होतो आणि नाखिंडची वाट पावसाळ्यात मला जरा अवघड वाटत होती. म्हणून मी नाखिंड नको बोललो. मग प्रणव ने तिकोना सुचविला. माझा तिकोना नव्हता झाला त्यामुळे मी लगेच तयार झालो. प्रणवने बराच वर्ष्यापुर्वी तिकोना गड केला होता त्यामुळे त्याला कसा जायायच माहिती होता.
उत्तरेतून ट्रेक वरून आल्यावर सह्याद्रीत ट्रेक करण्यात मला वेगळाच आनंद येतो. त्यामुळे पुन्हा मी सह्याद्रीत कधी ट्रेक करतो असा झाला होता. मग ठरला मी प्रणवला विचारला आणि तो हि तयार झाला. आम्ही कुठे जायायच ठरवत होतो. प्रणव ने नाखिंड सुचविला, पण मी नाखिंड ला जाऊन आलो होतो आणि नाखिंडची वाट पावसाळ्यात मला जरा अवघड वाटत होती. म्हणून मी नाखिंड नको बोललो. मग प्रणव ने तिकोना सुचविला. माझा तिकोना नव्हता झाला त्यामुळे मी लगेच तयार झालो. प्रणवने बराच वर्ष्यापुर्वी तिकोना गड केला होता त्यामुळे त्याला कसा जायायच माहिती होता.
तिकोनाला जाण्यासाठीचा प्रवास
आम्ही सकाळी ५. ४० ची इंद्रायणी एक्सप्रेस ने जायायच ठरवलं. इंद्रायणी
ने लोणावळा उतरून, लोणावळ्यावरून कामशेतला जाण्यासाठी लोणावळा-पुणे लोकल पकडली. आम्हाला कामशेत वरून तिकोना गडाच्या पायथ्याचा गाव तिकोनापेठला जायायच होता. कामशेत ते तिकोनापेठ अंतर २१ किमी आहे.
सकाळी ९. ३० वाजता तिकोनापेठला जायायला कामशेतचा शिवाजी चौकातून एसटी होती. आम्ही
कामशेतला ९. १० ला पोहचलो त्यामुळे आम्ही जवळच उपहारगृहात नाश्ता
करण्यासाठी गेलो. पण नाश्ता करण्याचा नादात आमचा समोरून एसटी निघून गेली.
मग काय, तिथून जुन्या महामार्गावर आलो. तिकडून समोर पवनानगरला जायायला रस्ता
आहे. तिथे जीप किंवा सुमो लागल्या असतात. ती पकडून आम्ही पवनानगरला गेलो.
पण त्या सुमोतून प्रवास करणे म्हणजे महान कामच आहे. एका सुमो मध्ये १६ जण
भरले होते. पाठी ६ , मध्ये ५ बायका, पुढे चालक पकडून ५. पवनानगर
पोहचेपर्यंत अर्धा तास अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. कामशेत
ते पवनानगर अंतर १४ किमी आहे.
पवनानगर पोहचेपर्यंत १० वाजले होते. पवनानगरला उतरल्यावर तीथून पुढे २ मिनटावर तिकोनापेठचा रस्त्यावर तिकोनापेठला जाण्यासाठी लहान टेम्पो उभे असतात. त्यात पाठी माणसांची वाहतूक करण्यासाठी आडवी लोखंडी आसन लावले असते. ती खाली दुमडली कि त्यात माल नेऊ शकतो, अशाप्रकारे दोन्ही कामासाठी त्या ट्रकचा उपयोग करतात.
अशाच एका ट्रकमध्ये आम्ही बसलो. आम्हीच पहिले होतो त्यामुळे बाकी गाडी भरेपर्यंत २० मिनटं लागली. गाडीभरल्या नंतर नेमकी गाडीवाल्याला मालाची ऑर्डर भेटली, मग काय, साहेबाने सगळ्यांना उतरवलं आणि गेला मालवाहतूक साठी. ५ मिनीटांनी दुसरा गाडी वाला आला, सगळे त्यात बसले. तरी पण अजून २ / ४ माणसासाठी गाडीवाला थांबला होता. अशा प्रकारे आम्हाला निघायला ११ वाजले. पवनानगर ते तिकोना पेठ अंतर साधारण ७ किमी आहे. आम्ही १० मिनटात तिकोनापेठला पोहचलो.
तिकोनापेठ गावातून एक रस्ता
तिकोना दुर्गाचा दिशेने जातो. तिकोना दुर्गावर जायायला दोन वाटा आहेत. एक
वाट महादरवाजा जवळ घेऊन जाते. तर दुसरी वाट दुसऱ्या भुयारी दरवाजाने घेऊन
जाते. पवनानगर पोहचेपर्यंत १० वाजले होते. पवनानगरला उतरल्यावर तीथून पुढे २ मिनटावर तिकोनापेठचा रस्त्यावर तिकोनापेठला जाण्यासाठी लहान टेम्पो उभे असतात. त्यात पाठी माणसांची वाहतूक करण्यासाठी आडवी लोखंडी आसन लावले असते. ती खाली दुमडली कि त्यात माल नेऊ शकतो, अशाप्रकारे दोन्ही कामासाठी त्या ट्रकचा उपयोग करतात.
अशाच एका ट्रकमध्ये आम्ही बसलो. आम्हीच पहिले होतो त्यामुळे बाकी गाडी भरेपर्यंत २० मिनटं लागली. गाडीभरल्या नंतर नेमकी गाडीवाल्याला मालाची ऑर्डर भेटली, मग काय, साहेबाने सगळ्यांना उतरवलं आणि गेला मालवाहतूक साठी. ५ मिनीटांनी दुसरा गाडी वाला आला, सगळे त्यात बसले. तरी पण अजून २ / ४ माणसासाठी गाडीवाला थांबला होता. अशा प्रकारे आम्हाला निघायला ११ वाजले. पवनानगर ते तिकोना पेठ अंतर साधारण ७ किमी आहे. आम्ही १० मिनटात तिकोनापेठला पोहचलो.
पहिली वाट जेव्हा आपण गावातून पुढे जातो, तेव्हा गडाची एक सोंड खाली रस्त्याला येते, त्या सोंडेवरून वाट गडावर जाते. पण आता सोंडेचा सुरवातीलाच बंगला बांधून त्याचा भोवती तारेचा कंपाउंड घातला आहे. त्यामुळे वाट भेटत नाही. त्यासाठी तुम्हाला रस्त्याचा बाजूने सोंडेवर जाण्यासाठी वाट शोधायला लागेल. सोंडेवर थोडा चढताच आपण सोंडेचा छोट्या माथ्यावर पोहचतो, येथून वाट वर गडाच्या दिशेने जाते, माथ्यावर आल्यावर गडाचा आकार त्रिकोणी असल्यामुळे आपल्याला गडाचा दोन बाजू लागतात. एक उजवी आणि डावी. आपल्याला डाव्या वाटेने जायायला लागते. एकदोन वेळा वाट वर खाली होते, वाटेने वर गेलो असता आपल्याला गडाचा महादरवाजा जवळ पोहचताच कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. महादरवाजा थोडा ढासळलेला आहे. त्यामुळे "ह्यावाटेने कोणी जाऊ नये" असा महादरवाजाच्या आतील बाजूस फलक लावला आहे. महादरवाजाच्या वाटेने आपण पाऊण तासात महादरवाजा जवळ पोहचतो. पण माझ्या मते ह्या वाटेने जास्त करून अनुभवी ट्रेकर्सने जावे.
तिथून थोडा पुढे गेल्यावर वाट वर डावीकडे बुरुजाचा दरवाजाकडे जाते. दरवाजाकडे जातेवेळी आपल्याला तुटलेल्या पायऱ्या लागतात. पायऱ्या चढून वर गेल्यावर आपण वेताळ दरवाजाजवळ पोहचतो. वेताळ दरवाजाने वर आल्यावर डावीकडे आपण बुरुजावर पोहचतो, दरवाजाचा जवळ म्हणजेच दरवाजाला लागूनच बाजूला काही तुटलेल्या चौक्यांचे अवशेष दिसतात. बुरुजाचा बाजूला गेलो असता पुढे शेंदूर लावलेला एक पाषाण उघड्यावर दिसतो, ह्यालाच वेताळेश्वराचं मंदिर बोलतात .
बुरुजावरून पाठी फिरून, आम्ही उजवीकडे गडाचा दिशेने वर गेलो. थोड्यावर गेल्यावर आपण १०ते १२ फुटाचा हनुमंताचा मूर्ती जवळ पोहचतो. ह्या मंदिराला चपेटदान मारुती म्हणतात. सध्या मूर्तीचा बाजूला थोडा संवर्धन केलेले दिसत होते, त्यामुळे ज्या पाषाणाला मूर्ती कोरलेली आहे त्याचा बाजूने दगडात सिमेंट वापरून भिंत केलेली आहे आणि त्याचा वर मूर्तीसाठी तातपुरतासाठी एका पत्र्याचा छप्पर केला आहे. मारुतीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे गेलो.
पुढे आल्यावर उजव्या हाथाला काही जोत्याचे अवशेष लागतात त्याचा खाली हि अजून काही अवशेष आहे . त्या जागेला रामाची गादी म्हणतात. "रामाची गादी" का म्हणतात तसा एक फलक लावला आहे. त्याचा फोटो मी खाली ठेवला आहे. डावीकडे आपल्याला तळजाई देवीचा गुहेतील मंदिर लागते.
दरवाजाचा जवळील टप्यातील पायऱ्यापासून वर गडाचा मुख्य दरवाजापर्यंत दुर्गप्रेमीने पायऱ्या चढताना काळजीपोटी वायर लावली आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानू तेवढे कमीच आहे
बुरुजाची बाजूची तटबंदी ढासळलेली आहे.
डाव्या बुरुजावरून पाठी फिरून आम्ही वरती गडाचा उंच जागी गेलो. वर वाड्याचा जोत्या मध्ये भगवा पताका लावलेला आहे. हिथून आपल्याला गडाचा आजूबाजूचा संपूर्ण परीसर आणि दुसरे गड दिसतात . पण पावसाळी वातावरणामुळे बहुतेक सगळेच डोंगर धुक्याखाली झाकले गेलो होते. आम्हाला तर तुंग सुद्धा दिसत नव्हता, मग विसापूर, लोहगडची बात तर आम्ही सोडूनच दिली. फक्त पवनाधरण आणि आजूबाजूचे गाव दिसत होती. थोडा वेळ धुके बाजूला सरायची वाट पाहिली पण धुके काही सरेना. शेवटी मग आम्ही परतीचा वाटेला लागलो.
उजव्या बुरुजाचा बाजूकडील ज्या पायऱ्याने आम्ही आलो होतो त्याच पायऱ्याने खाली उतरून, पुन्हा मंदिराच्या दिशेने आम्ही मंदिराचा डाव्या बाजूला पोहचलो. अशा प्रकारे आपली मंदिराला एक प्रदिक्षणाचं होते.
महादरवाजाची हि दगडाची अर्धी चौकट बाकी आहे. महादरवाजा कडून एक वाट खाली गावात जाते, मी तुम्हाला वरती नमूद केली आहे. त्यामुळे मी हिथे आता त्याचा जास्त काही सांगत नाही.
तिकडून वाट खाली जिथे गावात उतरते तिकडे कोणी तरी बंगला बांधला आहे त्याचा बाजूला तारेचा कंपाउंड केला आहे . त्या बंगल्यात ३ ते ४ गावचे कुत्रे बसलेली मी बघितली. आम्ही जसा तारेचं कंपाऊंड चा बाजूने जात होतो. तितक्यात कुत्रे भूकू लागले. मी कुत्र्याचा भीतीमुळे, प्रणवला आपण पुन्हा पाठी फिरुया म्हणून बोलू लागलो. आणि प्रणव बोलत होता भेटेल पुढे वाट. पण मला तर वाट दिसत नव्हती. तितक्यात कुत्र्यांचा भूंकण्याचा आवाज जास्त होऊ लागला. मी कुत्र्याचा आवाज ऐकून भीती पोटी प्रणवला बोललो आपण हिथूनच हि झुडपे तोडून पुन्हा वर जाऊया. कारण ती कुत्री पाठून तारेचा खालून आपल्या पाठी येतील, ह्याची भीती मला वाटत होती. आणि तसा झाला असता तर, त्यांना मारायला किंवा घाबरवायला आम्हाला जवळपास साधा दगड पण दिसत नव्हता. पण प्रणव बोलला जाऊ आपण पुढे. पण तिथे आम्हाला खरंच वाट भेट नव्हती. तरी पण प्रणव ने त्या काटेरी झुडपातून वाकुन खाली उतरत वाटत काढली, थोडा पुढे गेलो आणि आम्हाला बंगल्याचा कंपाउंड बाहेर, त्या बंगल्यावाल्याचा कचरा टाकला होता तिकडून एक वाट कचऱ्यातून खाली जात आहे दिसली, त्याने आम्ही उतरलो. त्या कचऱ्याजवळ दारूची मोठी जाड बाटली भेटली. मी पहिली ती बाटली उचलली, जर कुत्रा अंगावर आलाच तर त्यांच्यापासून संरक्षणासाठी म्हणून घेतली. त्या बाटली मुळे मला जरा धीर आला. आम्हाला रस्ता दिसला आणि मी सुटकेचा श्वास सोडला. आम्ही रस्त्याला पोहचलो. कुत्री अजून भुकतच होती पण आता मला त्यांची भीती वाटत नव्हती कारण मी आता रस्त्याला होतो आणि त्यांचा हद्दीत नव्हतो. पण मी थोडा शांतपणे विचार केला असता लक्षात आलं माझ्या घाबरण्यामुळे मी जरा आवाज करू लागलो त्यामुळे ती कुत्री अजूनच जास्त भुकु लागली. प्रणव कुत्र्यांना घाबरला होता कि नाही, ते मला कळलं नाही पण महत्वाच म्हणजे ह्या सगळ्यात तो शांतपणे वाट काढत होता.
आम्हाला गावात येईपर्यंत ४ वाजले होते. तिकोना पेठ वरून आम्हाला लगेच छोटा ट्रक भेटला . पुढे पवनानगरला आम्हाला कामशेत साठीची एसटी भेटली. आम्ही लोणावळल्या पोहचे पर्यंत ५. ४५ वाजले होते. आम्हाला वाटलं आता आपल्याला ७. १५ शिवाय मुबईला जायायला दुसरी एक्सप्रेस गाडी नाही आता. पण ५. १५ ची लातूर एक्सप्रेस उशीरा धावत असल्यामुळे आम्हाला ती गाडी भेटली. त्यामुळे आम्ही वेळेत पोहचलो.
![]() |
| भुयारी दरवाजाचा आतील गुहा |
![]() |
| वेताळ दरवाजाला जवळ जाणाऱ्या पायऱ्या |
![]() |
| वेताळ दरवाजा |
![]() |
| पहिल्या बुरुजावरून दिसणारे दृश्य |
![]() |
| गडाचा मुख्य दरवाजा |
![]() |
| मुख्य दरवाजाचा समोरील बुरुजावरून दिसणारे खालील पहिला दरवाजा आणि त्याचा वरील दोन बुरुज |
![]() |
| मुख्य दरवाजाचा आतील फोटो आणि डावीकडून वाट गुहा आणि टाकी जवळ |
![]() |
| टाकी जवळून दिसणारा मुख्य दरवाजाचा बुरुज |
![]() |
| बालेकिल्यावर जाणाऱ्या पायऱ्या |
![]() |
| गडावरून दिसणारे दृश्य |
![]() |
| बालेकिल्ल्यावरील मंदिर, मंदिराच्या खाली खांब टाकी आहे |
![]() |
| बालेकिल्यावरील पाण्याची मोठी टाकी |
![]() |
| मोठी टॉकीजवळून दिसणारा गडाचा उंच शिखराचा भाग. ह्य शिखरावर जोत्याचे अवशेष |
![]() |
| एक वाट वर बालेकिल्ल्यावर जाते आणि एक महादरवाजा/चोर दरवाजाजवळ जाते |
![]() |
| महादरवाजाचा आता लागून असलेली चौक्या किंवा घराचे अवशेष |
![]() |
| महादरवाजाचा आतील फोटो |
![]() |
| गडावरून दिसणारे दृश्य |
![]() |
| महादरवाजा चा बाहेरील फोटो आणि खालील फोटो महादरवाजाची दिसणारी पूर्ण तटबंदी आणि बुरुज |
![]() |
| महादरवाजाने खाली उतरताना लागणाऱ्या पायऱ्या |
Subscribe to:
Posts (Atom)






































































