दुसऱ्या दिवशी म्हणजेच १८ फेब्रुवारीला आमची दुपारी १२.५५ ला हवेरी वरून मुंबईसाठी ट्रेन होती. त्या वेळेत आमची गालगनाथचे गलगेश्वर मंदिर करायची योजना होती. त्यासाठी आम्ही आदल्यादिवशीच बसची माहिती काडून ठेवली होती.
गालगनाथचा प्रवास वर्णन
गालगनाथ गावासाठी हवेरी वरून थेट बस नाही. त्यासाठी गुट्टलला उतरायला लागते. तेथून पुढे गुट्टल ते गालगनाथ बस पकडायला लागते. ह्या बसेस ठराविक वेळेत आहेत.
आम्ही सकाळी पाऊणे सहा किंवा सहाची रायदुर्गमची बस पकडली. तुम्ही हरपणहल्ली किंवा गुट्टल वरून जाणारी कोणतीही बस पण पकडू शकता.
हवेरी ते गालगनाथ एकूण अंतर अंदाजे ४० किमी आहे. हवेरी ते गुट्टल अंतर २७ किमी आहे, त्यासाठी बसने आमचे ९० रुपये घेतले. आम्हाला अर्धा तास लागला आणि गुट्टल ते गालगनाथ अंतर अंदाजे १४ किमी आहे.
साधारण ६.४० पर्यंत आम्ही गुट्टलला पोहचलो आणि पहिले बस बद्दल विचारले. आम्हाला कळले गालगनाथ बस १०.३० ची होती. तोपर्यंत आम्हाला काही शेअर रिक्षा/जीप भेटतात का ते पाहू लागलो. आम्ही नाश्ता करून, थोडावेळ विचारपूस केली. तर कळाले इथे गावात शेअर जीप किंवा रिक्षा चालत नाही. खाजगी रिक्षा करून जायला लागते. इथे फक्त बसच चालतात त्यामुळे बसला गर्दी पण खूप असते.
मग आम्ही एकवेळचे २०० रुपये देऊन खाजगी रिक्षा करून गेलो. आम्ही २० मिनिटात तिथे पोहचलो. येते वेळी साडेदहाची बस पुन्हा फिरून गुट्टलला येईल त्यांनी येण्याचा विचार केला होता.
पण वाटेत रिक्षावाल्याने सांगितले इथे अजून दोन प्राचीन मंदिर आहेत. मग आम्ही त्याच्याशी बोलून त्याला आम्हाला बाकीचे दोन मंदिरे पण दाखवायला सांगितली. त्यासाठी आम्ही त्याला एकूण ६०० रुपये दिले. त्यात त्यांनी आम्हाला गुट्टल बस स्थानक पासून तिन्ही मंदिरे दाखवून पुन्हा गुट्टल बस स्थानकात सोडले. अंदाजे एकूण ४०किमी अंतर झाले.
गालगनाथचे गलगेश्वर मंदिर (Galaganath)
मंदिर वर्णन :
आम्ही पाऊणे आठ वाजता गालगनाथ मंदिरात पोहोचलो. अजून पर्यंत पाहिलेल्या मंदिराहून एकदम वेगळेच आहे.
मंदिराच्या कळसाचा खालील भाग पिरॅमिड सारखा वाटतो. मंदिराचा गर्भ गाभारा बहुतेक बंद ठेवत असावे, हे गर्भ गृहाचा चौकट वर केलेल्या दरवाजा वरून वाटते. पुजारी फक्त पूजा करण्याकरता उघडत असावा. आम्ही गेलो तेव्हा पुजारी पूजा करायला आला होता. त्यामुळे आम्हाला गर्भ गृहात जाता आले.
मंदिर शिवाचेआहे. गर्भ गाभाऱ्याच्या बाहेर आपल्याला गणपती, दुर्गामाता, सूर्यदेव आणि विष्णूची मूर्ती दिसतात. तसेच आत गाभाऱ्यात अजून ही काही मूर्ती आहेत आणि मंडपात शिलालेख आहे.
मंदिर तुंगभद्रा नदीच्या काठावर असल्यामुळे, मंदिराच्या समोर तुंगभद्रा नदीचे सुंदर दृश्य दिसते. मंदिराच्या बाजूला अजून एक खोली आहे, त्यात पण काही मुर्त्या आहेत. तुम्ही त्या पुजाऱ्याला सांगितलात तर तो दार उघडून दाखवतो. मंदिराच्या दुसऱ्या बाजूला दरवाजाची चौकट दिसते. ती चौकट बघून मला असे वाटले, त्यावेळी बहुतके हा इथे मुख्य दार असावे. त्याच्या काही दगडावर शिलालेख ही दिसतात.
मंदिर बघून आम्ही पुढील दोन मंदिरे बघायला निघालो. ह्या मंदिरात ही आतून फोटो काढायला देत नाही.
गलगनाथ मंदिर |
हरलाहल्लीचे सोमेश्वरा मंदिर:
गलगनाथ पासून साधारण १० किमी अंतरावर हरलाहल्लीचे सोमेश्वरा मंदिर आहे. पुरातत्व विभागाचा कर्मचारीने आम्हाला आतून फोटो काडून दिले नाही, त्यामुळे मंदिराचे फक्त बाहेरूनच फोटो काडले. त्या कर्मचारीने वहीवर आमचे नाव नोंदून घेतले. आणि आम्ही निघालो.
सोमेश्वरा मंदिर |
चौडाय्यदनापूरचे मुक्तेश्वरा मंदिर
सोमेश्वरा मंदिर बघून आम्ही पुढे सहा किमीवर असलेले, चौडाय्यदनापूरचे मुक्तेश्वरा मंदिर बघायला गेलो. गालगनाथ ते मुक्तेश्वर मंदिर १६ किमी आहे. ह्या मंदिरात पुरातत्त्व विभागाचा कोणी कर्मचारी देखभाली साठी नव्हता, त्यामुळे इथे आम्हाला फोटो काढायला कोणी अडवले नाही.
मंदिराच्या समोर नवीन मंदिरपण ह्या मंदिराचा मुख्य गाभाराचा भाग प्राचीन वाटतो. तिथे काही पूजा चालू होती म्हणून आम्ही तिथे गेलो नाही (ह्याचा फोटो खाली टाकला आहे).ह्या मंदिराचा बाजूला अजून एक नवीन मंदिर आहे त्यात अष्टदिगपाल देवाच्या लहान मुर्त्या ठेवल्या आहेत. मंदिर बघून आम्ही पुन्हा गुट्टल बस स्थानकाला आलो. ह्या मंदिरापासून गुट्टल बस स्थानक ९ ते १० किमी वर आहे.
मुक्तेश्वरा मंदिर, आणि उजवीकडे खाली कोपऱ्यात त्या समोर असलेले मंदिर त्याचा मुख्य गाभाऱ्याच्या भाग प्राचीन वाटतो. |
हवेरीसाठी परतीचा प्रवास:
हवेरीसाठी १०.३० ची बस होती, पण बस पाऊणे अकराला आली. इथे बसला खूप गर्दी असते, आम्ही घुसल्याने बसायला भेटले. गुट्टल स्थानका बाहेरून मेटॅडोर सारख्या जुन्या मिनी बस पण हवेरीसाठी जातात. पण त्या चोंदून भरेपर्यंत जात नाही. त्यामुळे बसचा प्रवास बरा पडतो. बारापर्यंत आम्ही हवेरीला पोहचलो.
हवेरीवरून आमची १२.५५ ची मुंबईसाठी ट्रेन होती. अशा प्रकारे आमचा कर्नाटक दौरा पूर्ण झाला. ह्या दौऱ्यासाठी आमच्या तिघांना एकूण १७,६०७ रुपये खर्च आला. आमच्या रेल्वे तिकीटचा खर्च वैयक्तिक होता.
खाली प्राचीन कर्नाटक भाग १ ची दुआ/साखळी दिली आहे.
No comments:
Post a Comment