Friday, 10 March 2017

Kavnai fort कावनई गड

कावनई 
कपिलधारा तीर्थक्षेत्रा मधून दिसणारे कावनई किल्ल्याचे दर्शन
दोन महिन्या अगोदर विनय त्याचा कार्यालयातील सहकाऱ्यांना कावनई किल्ल्यावर घेऊन जाणार होता, त्याचा सोबत मी हि जाणार होतो. पण काही कारणामुळे विनय जाऊ शकला नाही. त्यामुळे आमचा कावनई राहिला आणि आमच्या ग्रुपमध्ये बहुतेक सगळ्यांचा झाला होता. रविवारी विनय आणि मी दोघांनी कावनई ट्रेक करायाचा ठरवलं. त्यासाठी कसा जायचा सगळी माहिती इंटरनेट वरून काडली. त्यानुसार आम्ही सकाळी ६ ची गीतांजली एक्सप्रेस पकडून इगतपुरीला उतरायचा ठरवलं. मी दादर वरून तर विनय ने कल्याण वरून ट्रेन पकडली. आम्ही ठरल्याप्रमाणे एकाच साधारण डब्ब्यात चढलो. गाडीला गर्दी खूप होती त्यामुळे आम्हाला बसायला नाही मिळालं. आम्हाला इगपुरीला पोहचायला ८. ४५ वाजले. इगतपुरीला आम्ही नाश्ता करून घोटीला जाण्यासाठी शेअर रिक्षा पकडली.  रिक्षा वाले इगतपुरी ते घोटी प्रत्येकी १० रुपये घेतात. पुन्हा घोटी वरून आम्ही st ने न जाता शेअर रिक्षाने वाकीला गेलो. घोटी ते वाकी शेअर रिक्षा प्रत्येकी १० रुपये घेते.  वाकी ते कावनई अंतर ५ कि मी आहे. रिक्षावाल्याला आम्ही वाकी वरून कावनई पर्यंत किती घेईल विचारले असता त्याने आम्हाला १५० रुपये सांगितले. त्यामुळे आम्ही वाकी गावातून कावनई किल्ल्या पर्यंत रस्त्याने चालत गेलो.
आम्हाला कावनई गावात पोहचाल १ तास लागला. 

हा ट्रेक मी जानेवारी मध्ये केला आणि ब्लॉग मार्चचा पहिल्या आठवड्यात  लिहीत आहे त्यामुळे चुकून एकाद  दुसरी गोष्ट स्मरणात नसेल राहिली. ती येथे नमूद नसेल केली. पण बहुतेक मी बरोबरलिहले केले आहे.

वाकी गाव किव्हा वाकी फाटा. आणि येथून दिसणारा कावनई 


Add caption


ह्या टाकीचा तिकडून आम्ही शेतातील वाट धरली. शेतातून काढलेला फोटो


मुंबई ते कावनई गाव कसे पोहचावे
कावनई ला जाण्यासाठी मुंबईहून घोटीला पोहचावे. मुंबई ते घोटी अंतर १२८ किमी आहे.  पण जर तुम्ही रेल्वेने जाणार असाल तर मुंबईहून इगतपुरीला जावे.  तिकडून घोटीला जायायला शेअर रिक्षा उभ्या असतात. पुढे घोटी वरून वाकी गावाला जाणाऱ्या शेअर रिक्षा उभ्या असतात त्याने वाकी फाट्यावर उतरावे. तिकडून कावनई ५ किमी वर आहे. घोटीला जाण्यासाठी भुसावळ पॅसेंजर ट्रेन आहे पण ती ट्रेन घोटी स्थानकात पोहचायला १० वाजतात त्यामुळे  तुम्हाला पुढे उशीर होऊ शकतो. त्यासाठी सकाळी गीतांजली किंवा तपोवन एक्सप्रेस पकडून इगतपुरीला उतरावे.

गडावर जाणारी वाट
कावनई गावाचा अगोदर कपिलधारा आश्रम लागतो त्याचा पुढे १ किमी वर कावनई गाव आहे. कावनई किल्ल्यावर जायायला कावनई डोंगराची एक सोंड गावात जाते त्या सोंडेवरुनच वाट गडावर जाते. गडावर जाणारी वाट मुरलेली. सोंडेवरून वर गेल्यावर सोंडेचा एक छोटा टेकाड लागते. तिकडे गडाचा वरील कातळ लागतो.  तिकडून वाट डावीकडे फिरते ती वर जात उजवीकडे फिरते. ती थेट गडाचा दरवाजा जवळ घेऊन जाते. आम्ही रस्त्याने चालत आल्यामुळे गाव लागायचा आधीच थोड्या अंतरावर रस्त्याला एक उंच सिमेंटची पाण्याची टाकी लागली . तिकडून आम्ही  उजवीकडे शेतात जाण्याऱ्या वाटेने जाऊन. सोडेंच्या दिशेने चालत गेलो.
गडाचा दरवाजाजवळ चडतेवेळी सुरवातीला काही दगडाच्या पायऱ्या आहेत त्या अजून चांगल्या आहेत पण त्याचा वरती दरवाजा जवळील पायऱ्या पूर्ण उध्वस्थ झाल्या आहे.  पण काही गडदुर्ग प्रेमीने तिथे १ लोखंडी शिडी लावली आहे त्यामुळे चढायला सोपे पडते. 
 गडाचा सोंडेवरून दिसणारा बुरुज, हिथे कातळापाशी आल्यावर वाट डावीकडे जाऊन वर उजवीकडे दरवाजा जवळ घेऊन जाते.


गडाचा मुख्य दरवाजा


मुख्य दरवाजाचा आत उजव्या बाजूला लागणारी गुहा 


डोंगराची गावात गेलेली सोंड

गडाचा मुख्य दरवाजाचा आतील पायऱ्या

गडावर पाहण्यासारखे ( मी गडावर जे काही पहिले, ते मी तुम्हाला सांगत आहे)
वाट चडून आल्यावर आपल्याला पहिला गडाचा दरवाजा लागतो. दरवाजा जवळ उजव्याबाजूला एक छोटीशी गुहा आहे. दरवाजातून वर आल्यावर काही पायऱ्या लागतात. थोडा वर गेल्यावर आपण गडाचा माथ्यावर पोहचतो. गडाचा माथ्यावर पोहचायला आम्हाला १ तास लागला.  गडाचा घेर जास्त नाही त्यामुळे गडाचा माथा हि फिरायला जास्त वेळ लागत नाही. पण गडाचाचा माथ्यावर आल्यावर डावीकडे गडचडतेवेळी दिसणारा बुरुज लागतो तिकडे एक वाट जाते, हि वाट मंदिराचा पाठून कड्यावरून जाते आणि एक वाट उजवीकडे तळ्याजवळील मंदिराजवळ जाते. आम्ही पहिला डावीकडे बुरुजाकडे गेलो. तिकडून आम्ही त्या डाव्यावाटेनेच पुढे गेलो. डाव्या वाटेने पुढे तुम्ही गडाचा दुसऱ्या सोंडेकडे पोहचतात.  ह्या सोंडेचा टोकाला पोहचायचं आधी तुम्हाला २ते ३ पाण्याचा टाकी  लागतात. पहिली एक मोठी टाकी कडेवर एक बाजूला भिंत बांधून बांधली आहे. आणि थोडा पुढे वर डाव्या हाताला  दुसरी छोटी टाकी लागते. ह्या दोनी टाकीतील पाणी खराब शेवाळ बांधलेले दिसते.  तिकडून सरळ पुढे चालत गेलो असता अजून एक मोठी पाण्याची सुखलेली टाकी लागते.पण हि टाकी खोल दिसत नाही  तर सपाट दिसते त्यामुळे ती टाकी असावी का अन्यथा दुसरा काही शंका येते. आणि कडेवर तुम्हाला एक बुरुज हि लागतो.  ह्या तिन्ही टाक्या आणि बुरुज जवळ जवळच आहेत. 

डाव्या वाटेने जाताना गडावरून कपिलधारा तीर्थक्षेत्राचा पूर्ण दृश्य दिसते.  बुरुजाचा जवळच एक वाट थोडी खाली जाते. तिकडे एक कातळात झऱ्या जवळच खोदलेली छोटीशी २ हात रुंद टाकी आहे. अजून हि कातळातून छोटीशी पाझर लागलेली होती. ते पाणी टाकीत साचत होते. टाकीतील पाणी साफ आणि स्वच्छ दिसत होते.  त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य वाटत होते. माझ्या आता नक्की स्मरणात नाही पण बहुतेक तिकडेच खाली किंवा वर कातळात कोरलेल्या झिजलेल्या पायऱ्या हि दिसतात.  

पुन्हा वर वाटेवर आल्यावर एक वाट खाली सोंडेजवळ उतरते. आम्ही खाली जाऊन बघून आलो पण एके ठिकाणी ३० ते ४० फुटाचा मोठा कातळ लागतो.  माझ्या अंदाजे बहुतेक तिकडे पूर्वी दोर लावून उतरत असावे असा अंदाज येतो. कारण तेवढा कातळ उतरल्यावर सोंडेवरून सरळ खाली जायायला वाट दिसते. हि वाट तुम्हाला कावनई गावाचा साधारण १. ३० किमी आधी रस्त्यात भेटते. घाटात वर आल्यावर हि सोंडेची वाट दिसते.
टाकी आणि बुरुज बघून झाल्यावर.  सपाट टाकीजवळ आल्यावर वाट डावीकडे वळते ती जवळच मंदिराजवळ घेऊन जाते. सपाट टाकीजवळ येताच आपल्याला डावीकडे वर मंदिर दिसते.  मंदिरामध्ये देवीची मूर्ती आहे. आणि मंदिराचा समोरच तळ आहे .  तळ्याचा लगत उजव्याबाजूने वाट जाते. ती वाट पुढे तळ्याचा बाजूला उघड्यावर महादेवाचा पिंडी जवळ घेऊन जाते.  पिंडीचा बाजूला घराचे/ वाड्याचे  पडके अवशेष दिसतात. त्याच वाटने पुढे थोड्याच अंतरावर डावीकडे आजून एका घराचे/ वाड्याचे अवशेष दिसतात. तीच वाट पुढे मुख्य दरवाजा जवळ जाते.
गडावर बघण्यासाठी एवढेंच  अवशेष आहेत. त्यामुळे गड साधारण अर्धा ते एक तासात बघून होतो.
पण गडावरून दक्षिणे कडे पहिले असता नाशिक जिल्यातील कळसुबाई डोंगराची रांग दिसते. तर उत्तरेकडे थोडा डाव्या बाजूला पाहिल्यावर भास्करगड, हरिहर आणि त्रंबकगड आणि अप्पर वैतरणाचा जलाशय दिसतो. समोर उत्तरेला अंजनेरी दिसतो आणि गडाचा समोर मुखाने गावाचा धरण.
आम्ही जेवण करून तासाभराने निघालो. आम्हाला गड उतरायला पाऊण तास लागला.  पुन्हा आम्ही कावनई गावात न उतरता पुन्हा आलो त्यामार्गे रस्त्याला आलो. तिकडून आम्ही कपिलधारा तीर्थक्षेत्र दर्शनाला गेलो. कपिलधारा मध्ये आम्ही बराच वेळ थांबून विश्रंती घेतली आणि पुन्हा परतीचा मार्गाला चालू लागलो.

जाते वेळी आम्ही २ ते २.५० किमी चालत गेलो. तितक्यात आम्हाला  जवळच तेथील गावातील  एक रिक्षावाला घोटी ला जात होता. त्यामुळे तेवढा आमचा चालायचा वेळ वाचला. रिक्षावाल्याने शेअर मध्ये सोडल्याने आमच्या दोघांचे ३० रुपये घेतले. आम्ही ४.४५ पर्यंत इगतपुरीला पोहचलो. इगतपुरीहुन ५ ची एक्सप्रेस ट्रेन पकडून आम्ही मुंबईचा दिशेने निघालो.

गडावरून दिसणारे कपिलधारा तीर्थक्षेत्राचा दृश्य
गडावरून दिसणारे कपिलधारा तीर्थक्षेत्राचा दृश्य
गडाचा कडेवर भिंतबांधून बांधलेली टाकी



गडावरील दुसरी टाकी. हिथून तुम्हाला मंदिर दिसते.


गडाचा दुसरा बुरुज



कातळात खोदलेल्या पायऱ्या

कातळातुन पाझरणाऱ्या झऱ्या जवळ खोदलेली छोटी टाकी. ह्या टाकीतील पाणी पिण्या साठी स्वच्छ होते.

गडावरील तिसरी कमी खोल अशी सपाट टाकी. हि टाकी बघितली असता मला हि टाकी आहे का अन्य दुसरा काही होता याची शंका होती.

गडाची दुसरी सोंड . हिथे आम्ही खाली जाऊन बघितले असता हा ३० ते ३५ फुटाचा कातळ होता त्या नंतर सरळ वाट सोंडेवरून खाली जात होती. खालच्या फोटोत दिसेल तुम्हाला.


हि सोंड तुम्हाला कावनई चा छोट्या घाट रस्त्यावर घेऊन जाते

मंदिरासमोरील तळे आणि बाजूला उजवीकडून वाड्याचे अवशेष आणि महादेवाचा पिंडी कडे घेऊन जाणारी वाट.




गडावरील मंदिर आणि त्यासमोरील तळे
 
गडावरील वाड्याचे अवशेष
   
वाड्याचे अवशेष आणि महादेवाची पिंड

गडावरून दिसणारी कळसूबाईची रांग . आणि गडावरील मंदिर आणि वाड्याचे अवशेष



गडावरून दिसणारे हरिहर,भास्कर गड आणि अप्पर वैतरणा जलाशय


कपिलधारा तीर्थक्षेत्र मध्ये तीर्थक्षेत्राची आणि कावनई गावाची माहिती दिलेली आहे



Wednesday, 1 March 2017

Takmak fort टकमक गड

टकमक गड  (विरार) 

शनिवार असल्यामुळे आमच्या ग्रुप मधले सगळे व्यस्त होते. त्यामुळे माझ्या सोबत ट्रेक करायला कोणी नव्हता. त्यामुळे विचार करत होतो ट्रेक  करू कि नको आणि केला तर कुठचा करू. मी एकटा ट्रेक करत होतो म्हणून विचार केला. अशा ठिकाणी करायचा जे रेल्वे स्थानकापासून जास्त लांब नसेल आणि तिथे गाडीची रहदारी सतत असेल.  मग मी टकमक गड करायचा ठरवलं.

टकमक गडासाठी कसे जावे
मी सकाळी सात वाजता घरांतून निघालो.  पश्चिम रेल्वेचा दादर स्थानकावरून ७. २० ची विरार जलद ट्रेन पकडली. मी ८. २० ला विरारला पोहचलो. तिकडून मी विरार पूर्वेला बाहेर वसई-विरार महानगरपालिकेची शिरसाड फाट्याला जाणारी शिरसाड बस पकडली. विरार पासून शिरसाड फाटा पोहचायला अर्धा तास लागतो,  हे अंतर १० ते ११ किमी आहे. शिरसाड फाट्या वरून सकवार फाट्याला जायायला टमटम (म्हणजेच सध्याचा नवीन छोट्या मॅक्स गाडी) असतात. महामार्ग असल्यामुळे शिरसाड फाटा ते सकवार फाट्याला पोहचायला १५ ते २०  मिनिटे लागतात.  पण हे अंतर हि १० किमी आहे. सकवार फाट्याला महामार्गाचा पुला खाली गाडी वाले सोडतात. तिकडून पलीकडे सकवार गावात डांबरी रस्ता जातो . त्या रस्त्याने तुम्ही ५ मिनिटात गावात पोहचतात.

गावात गेल्यावर गडाची वाट कुठे जाते गावातल्याना विचारायला लागते. कारण वाट गावाच्या मागच्या शेतातून जाते त्यामुळे गडाची वाट शोधायला वेळ लागतो. मी एका घरात मुलाला विचारला, मला गडावर नेशील का तुला १०० रुपये देतो. पण त्याने मला २०० रुपये सांगितले. मी त्याला विनंती केली मी एकटा आहे,  दोघं तिघे असतो  तर तुला दिले असते. पण तो मुलगा काही तयार होईना. शेवटी मी त्याला बोललो १२५ रुपये देतो. पण तो काही २०० रुपये पेक्षा कमीत तयारच होईना. शेवटी मी त्याला गडाची पायथ्याची वाट दाखवून दे सांगितलं. तेव्हा त्यांनी मला गडाची पायथ्याजवळची वाट दाखवली .

तो मला जिकडून घेऊन गेला मला त्याच वर्णने देता येत नाही आहे . पण एके ठिकाणी मला त्यांनी ओढा पार करून नेला.  पण मी तुम्हाला नंतर ज्या वाटेने आलो त्याच्यावरून कसा जायायचा ते सांगायचं प्रयत्न करतो. 

त्यांनी मला गडाची पायथ्याची वाट दाखवली त्या बद्दल मी त्याचे आभार मानले. पुन्हा एकदा शेवटचा त्याला विचारून बघितला. पण तो काही तयार होईना. मग मी विचार केला जाऊदे आता मी एकटाच जातो. पण नंतर गड उतरून आल्यावर मी विचार केला.  त्याने सांगितले होते ते त्याचा हि दृष्टीने बरोबर होते. कारण गड चढायला ३ तास तरी लागतात. 

गडावर पोहचण्याची वाट 
तुम्ही गावात पोहचल्यावर गावात एक मोठी उंच सिमेंटची पाण्याची टाकी आहे . त्या दिशेला जावे. टाकी जवळ पोहचल्यावर डाव्या बाजूने गावातील घरांचा पाठी मागे जावे.  तुम्ही तिथे पाठी आल्यावर तुम्हाला एक मोठी कंपाउंड ची भिंत दिसेल. तिथून डाव्या बाजूने वाटेने तिरकस जाणे. त्या भिंतीचा पुढे गेल्यावर तुम्हाला डावीकडे ताडाची दोन झाडे दिसतील. त्या झाडांन पासून डाव्या बाजूला जाणे. बरेच ठिकाणी गावातल्यानी आपआपल्या जागेत ऐनाची झाडे लावली असल्यामुळे त्यांना फांद्या-काट्यांचे कुंपण केले आहे.  त्या कुंपणातून पायवाट जाते. त्यामुळे तुम्हाला दोन कुंपणनाचे दरवाजे हि लागतात. एके ठिकाणी तुम्हाला डावीकडे ओढा लागतो . पण मला ओढा ओलांडावा लागला नाही  पण भिंतीचा तिकडे एक पाणथळ जमीन लागली. बहुतेक पावसात तिकडे पाणी असावे. असा करून मी एका कुंपणाच्या बाहेर आलो. तिथून उजव्या बाजूला मला कुंपण लागत वाट सरळ वर गडावर जात होती.

हि वाट तुम्हाला डोंगराच्या सोंडेवर वर घेऊन जाते. तिकडून मग तुम्हाला बहुतेक सरळ वाट सोंडेवरुनच चढायची आहे. वाटेत बरेच  ठिकाणी दुर्ग प्रेमीने पिवळ्या / लाल ऑईलपेंट रंगात केले बाण आहेत. असे मी नेटवर वाचला होता. पण प्रत्येक्षात ते बाण आता जास्त दिसत नाही किंवा पुसट झाले आहे. पण दगडावर सफेद खडूने केलेले बाण बरेच ठिकाणी दिसतात. त्यामुळे खूप मदत होते. सोंडेवरून चालत असताना. डोंगराची वरील सोंड हि टेकडी सारखी आहे त्यामुळे चड-उतार करायाला लागतो. पायथ्यापासूनचा वाटे पासून गडाच्या वरील सोंडेवर पोहचायला मला १ तास लागला.  वरील सोंडेचा उंच भागी असलेल्या छोट्या टेकडी वर खूप सारे काळे तासलेले पाषाण एकाच ठिकाणी पडलेले दिसतात.  त्यावरून माझा असा अंदाज होता बहुतेक हिथे छोटे दरवाजे किंवा चौकी असतील . गडाचा वरील शेवटच्या कातळाच्या पायथ्याला पोहचाण्याचा आधी एक ठिकाणी वाट नसल्यामुळे वर दगडावरून जपून चढायला लागते.

गावात ह्या सिमेंटची पाण्याची टाकी कडून डावीकडे जी घरे दिसत आहे. त्या घरांचा पाठी मागे घरचा डावीकडून जावे.
घरांचा पाठी मागे आल्यावर पाठी सिमेंट ची भिंत दिसते. तिकडे डावीकडून पायवाटेने जावे. तसेच मी अंदाजे गडाचा सोंडेला वर जाणारा लाल बाण  दाखवला आहे. हिकडून आपण गडाचा खालील जंगला खालून वर सरळ सोंडेवरती येतो.


टाकी कडून डावीकडची पायवाट धरून आल्यावर पहिला एका बाजूला  डावीकडे ओढा लागतो आणि मधेच पाणथळ जमीन लागते.  आणि थोडा पुढे आल्यावर हि ताडाची झाडे दिसतात. त्या झाडाच्या डावीकडून जिथे मी लालबाण दाखवलं आहे.  तिकडून पायवाट दिसते त्याने जावे. पण बहुतेक पावसात पाण्यामुळे आणि गवतामुळे तुम्हाला ह्या वाटा दिसतील कि नाही शंका आहे 

 
गडाचा वर जाते वेळी शेवटचे दोन मुख्य कातळ लागण्या अगोदर ह्या पायऱ्या लागतात.


गडाचा वरील सोंडेवर आल्यावर जायायला  बहुतेक अशीच वाट चड-उतार होत गडावर जाते. 

 
गडावर पाहण्यासारखे 
(गडावर मी जेवढे पहिले ते मी हिथे वर्णन केला आहे)
गावातून मला गडाचा माथ्यावर पोहचायला मला २. ३० तास लागले. गडाचा माथ्यावर पोहचण्याचा आधी तुम्हाला चढते वेळी समोर तटभिंत दिसते.  भिंत अजून हि नवीन असल्या सारखीच वाटते. 

तिकडून वर आल्यावर डावीकडे तुम्हाला दोन पाण्याचा टाक्या दिसतात. (टाकीतील पाणी खराब झालेले दिसत होते आणि थोडी घाण हि पडलेली दिसत होती , बराच टाक्यांमध्ये मध माश्या पाण्याजवळ भिनभिनतं  होत्या. गडावरील पाणी मला पिण्यायोग्य  वाटले नाही ). त्या टाक्यांजवळून डावी कडे म्हणजेच उत्तरेकडे वाट जाते.त्या वाटेने पुढे जावे. त्या वाटेने गेले असता तुम्हाला गडावरील बहुतेक अवशेष दिसतात आणि हि वाट तुम्हाला पुढे गडाचा उत्तरेकडील डाव्या टोकाला घेऊन जाते. 

गडावर दोन अर्ध्या तुटलेल्या तोफा दिसतात आणि त्याचाच बाजूला उघड्यावर पाषाणावर कोरलेला देव आहे. पुन्हा वाटेला परत येऊन पुढे गेले असता, दोन्ही बाजूला पडक्या वास्तूचे जोथे दिसतात. तीच सरळ वाट धरून पुढे जाताच एक वाट उजवीकडे टोकाजवळ पठारावर जाते आणि एक वाट डावीकडे खाली असलेल्या आठ टाक्याजवळून पुढे  गडाचा टोकाला  जाते.  

आठ टाक्या लागूनच एका कातळात खोदलेल्या आहेत.  त्यातील ३ टाक्या सुखलेल्या आहेत. (एकूण गडावर मला ११ टाक्या दिसल्या).  त्याच्यावाटेने  पुढे गेला असता गडाच्या उत्तरेच्या टोकाच्या माथ्यवर पोहचतो. त्या पठारावर एक छोटा २ फूट रुंद आणि २ फूट खोल एक कातळी खड्डा आहे. पुन्हा पाठी फिरताना  जी वाट उजवीकडून वर येत होती. त्या वाटेल माथ्यावरच तुम्हाला अजून एक टाकी दिसते.  

गडाचे उत्तरेला दोन टोक आहेत. मी सांगितला त्या डाव्या टोकावरून आपल्या उजव्या बाजूला थोडा पाठीमागे अजून एक टोक दिसतो. त्या टोकावरून पूर्वेकडची दरी आणि डोंगर चांगले दिसतात. पण त्या टोकावर काही अवशेष  दिसत नाही. त्या टोकाकडे जाणाऱ्या वाटेत बरीच झाडी लागते. पण त्याची वाट हि सुरवातीच्या दोन टाक्या आहेत त्याचा वरून म्हणजेच उजवीकडून वर जाते.



गडाचा माथ्यावर पोहचायचं आधीच हि गडाची तटबंदी दिसते. तटबंदी वर गडाचा माथा लागतो.


गडाचा टोकावर पोहचताच जवळच गडाचा दक्षिणेकडील टोकावरून दिसणारे सोंडेचे आणि भवतालीचा निसर्गाचे दृश्य दिसते 

गडावर पोहचल्यावर दोन वाटा गडाचा उत्तर दिशेकडील दोन टोकाकडे घेऊन जातात.  डावीकडील वाट टाक्यांचा बाजूने जाते ह्या वाटेने आपल्याला  वाटेत एका मागोमाग अवशेष आणि वास्तू  दिसतात. आणि उजवीकडील वाट गडाचा दुसऱ्या टोकाकडे घेऊन जाते. पण ह्या दिशेने मी गेलो असता मला  कसलेच अवशेष दिसून आले नाही.



पुन्हा परतीचा  मार्ग  
मला गड  फिरायला १ तास लागला. माझ्या सोबत कोणीही नसल्यामुळे म्हणून मी जास्त वेळ थांबलो नाही. मी जेवून गड उतरायला सुरवात केली. गडाचा वरील सोंड पठारासारखी मोकळी असल्यामुळे चांगला वारा लागत होता त्यामुळे माझा सगळा थकवा निघून जात होता.  पण जसा मी सोंडेवरून खाली जंगलातुन ते गावापर्यंत जाणारी वाट पकडली. मला उन्हाळ्याची चाहूल दुपारचा कडक उन्हाने होणाऱ्या थकव्यामुळे पूर्ण जाणवली.  जास्त करून गडाचा पायथ्यापासून ते गावापर्यंत. 
मला पूर्ण गड उतरायला दीडतास लागला. मी जाते वेळी ज्या घरातील मुलाला विचारला होता त्यांचाच घरी जाऊन पाणी पियालो. तो मुलगा घरी न्हवता तरी पण मी जाणूनबुजून त्यांचा घरी जाऊन पाणी पियालो. त्याचे कारण, मी एकटा ट्रेक करत होतो. त्यामुळे त्यांना हि कळावे कि गडावर सकाळी गेलेला व्यक्ती सुखरूप गडावरून परत गेला.
पुन्हा मी सकवार फाट्यावरून शिरसाड ला गेलो आणि तिथून विरार. मला घरी पोहचायला ५. ४५ वाजले.


गडावर पोहचताच दिसणाऱ्या दोन टाक्या ह्याचा डावीकडून वाट जाते. त्याने पुढे गेलो असता रांगेत अवशेष सापडत जातात.
वाटेत दिसणारे जोत्याचे अवशेष
वाटेत दिसणारे जोत्याचे अवशेष 


गडावर तुटलेल्या अवस्थेत असलेल्या २ तोफा आणि उघड्यावर असलेले मंदिर.
 
  
 गडावरील कातळात कोरलेल्या आठ टाक्या.  ह्यातील ३ टाक्या सुखलेल्या आहेत.
 



उत्तरेकडील डाव्या टोकावरून दिसणारे दृश्य

डाव्या टोकाचा माथ्यावर कातळातल खड्डा

उत्तरेकडील टोकावरून दिसणारे दृश्य

डाव्याटोकावरून  दिसणारे उजवे कडील गडाचे टोक


गडाचा डाव्या टोकाचा माथ्यावर असलेली टाकी 

गडाचा उजव्या टोकावरून दिसणारे डावीकडील टोकाचे दृश्य

गडावरून दिसणारे पूर्वेकडील दृश्य


दुपारची वेळेत दोन घारी  घिरट्या मारत होत्या. मी खडकावरून फोटो काडत असताना. बहुतेक मला एकटा बघून त्यातील एकीने एकदा माझा डोक्यावरून फेरी मारून गेली . दुपारची भोजनाची वेळ झाली असावी म्हणून माझाकडे आशेने बघत असावी. 😃

 
मी हा ट्रेक सोबत कोणी तरी गावातील व्यक्ती घेऊनच करणार होतो.  पण त्या मुलाने सांगितलेली किमंत मला एकासाठी जास्त वाटली. त्यामुळे मी आता पर्यंत केलेले बरेचसे ट्रेकचा अनुभवामुळे मी हा ट्रेक एकट्याने करण्याचा वेढा धाडस केला. पण ट्रेक करतेवेळी गडाच्या जंगलात एकाद मोठ जनावर दिसण्याची मला भीती सतत वाटत होती. अजून पर्यंत मला कधी तसा अनुभव आला नाही तरी पण कधीही दक्षता घेतलेली चांगलीच असते. पण मधेच काही गावकरी जंगलात लाकडासाठी झाडे छाटत होती. त्यामुळे माझी भीती जरा दूर होत होती. हे मी हिथे मुद्दामूनच लिहला आहे. कारण एकटा ट्रेक करणं  खूप धोक्याचं आहे मला माहित आहे. पण ह्याचा अगोदर मी कधी एकट्याने ट्रेक केला नव्हता आणि पुढे करणार हि नाही. केला तर गावातल्या कुठच्या तरी एका व्यक्तीला थोडे जास्त पैशे देऊन सोबतच करेल.

Tuesday, 21 February 2017

कैलासगड किंवा घोडमांजरीचा डोंगर

कैलासगड किंवा घोडमांजरीचा डोंगर (फेब्रुवारी २०१७)

कैलासगडाचा वडुस्ते गावातून टिपलेला दृश्य


आतापर्यंत मी बरेच ट्रेक केलेआहेत . पण कैलासगडा वरून दिसणाऱ्या मुळशी धरणाच्या निळसर पाण्याचा दृश्य अजून पर्यंत दुसऱ्या कुठच्या गडावरून मला एवढ अप्रतिम दिसला नाही. कैलास गडाचा हे नाव ह्या गडाला कशे ठेवले माहित नाही.  पण मुळशी धरण आणि भोवतालीच्या निसर्गाच सुंदर दृश्य आणि सहयाद्रीमधील मनाला प्रसन्न करणारी शांती ह्या वरून ठेवले असेल असा मला वाटते. गडाचा इतिहास काही मला नेट वर फारसा मिळाला  नाही. पण हा गड टेहळणी साठी (watchtower) वापरत असावे असे मी नेट वर वाचले. गडावर काही उध्वस्थ वास्तू  व्यतिरिक्त काही अवशेष आढळत नाही आणि गडाला कुठेही तटबंदी आणि बुरुज हि नाही.
कैलासगडावरून दिसणारे मुळशी धारणाच अप्रतिम दृश्य


दोन चार दिवस आमचा ग्रुपवर कुठे जायायच आणि कोण येणार ठरत नव्हत. आदल्या दिवशी सर्वेशने फोन करून सांगितला माझा गाडीने जाऊ तस मग आम्ही कैलास गड करायचा ठरला. सोबत विजेंद्र ही आला.

पोहचण्याचा मार्ग
तुम्ही जर ST ने जाणार असाल तर बहुतेक तुम्हाला वस्ती साठी जायायला लागेल.  लोणावळा ते वडुस्ते गाव st आहे. पण मला
ST ची वेळ माहित नाही पण एक गावकरी काकाने सांगितले एक ST सकाळी ११ किंवा १ ला येते ती पुन्हा लगेच जाते आणि दुसरी संध्याकाळी वस्तीला येते  आणि सकाळी लवकर निघते.  पण तिचा वेळ आम्हाला माहीत नाही पडला. 
पण जर तुम्हाला १ दिवसात गड करायचा असेल तर खाजगी गाडी करून जावे. आम्ही सकाळी 7.30 ला खान्देशवर स्थानकाबाहेर सर्वेशला भेटून नाश्ता करून निघालो. तिथून आम्हाला लोणावळ्याला पोहचायला १तास लागला. लोणावळावरून पुढे वडुस्ते गाव ४८कि मी आहे.
लोणावळ्यावरून आम्ही भुशीधरण - लायन पाँईट - कोरीगड - आंबेगाव - भांबुरडे - अहिरवाडी, पिंप्री फाटा, वांद्रे गाव मार्ग वडुस्ते गावी पोहचतो.

मुंबई ते वडुस्ते साधारण १३७ किमी आहे. आणि लोणावळा ते वडुस्ते ४९ किमी.
पिंप्री फाटा वरून एक रस्ता पिंपरी गाव (अंधरबन ट्रेक सुरवातीचा पाँईट) मार्गे ताम्हीनी घाटातुन पालीला जातो. तर एक रस्ता वाद्रे.गावातुन वडुस्ते गावात. आंबेगावापासुन पुढील बहुतेक रस्ता खराब आहे.

पण तुम्ही कोकणातून हि पालीमार्गे - ताम्हीणीघाट - पिंपरी गाव - पिंप्री फाटा मार्गे - वडुस्ते येऊ शकतात. पण तुम्हाला ह्या मार्गे अंदाजे २५/३० किमी जास्त अंतर कापायला लागेल.

गड चढायला कुटून सुरवात करावी 
वडुस्ते गावात पोहचल्यावर थोडा पूढे गेल्यावर एका खिंडीतून पुढचा गावात रस्ता गेल्या सारखा वाटतो आणि तिथेच रस्ताचा बाजुला एक विजेचा मुख्य युनिट असलेला खांब लागतो (ट्रांसफाँरमर) आणि एक कैलासगड / घोडमांजर डोंगर नावाचा छोटा फलक लागतो. तिथुन ऊजवा बाजुला कैलासगडावर वाट जाते.

जिथे गडाची वाट सुरवात होते तिथे उजवाबाजूला कैलासगडचा डोंगर आणि डाव्या बाजूला छोटी टेकडी आहे. नीट बघितल तर हि पूर्ण गडाचा डोंगराची अखंड सोंड आहे. पण रस्तामुळे सोंड विभागून डाव्याबाजूला छोटी वेगळी टेकडी झाली आहे. आणि उजव्या बाजूला गड वेगळा झाला आहे
रस्त्याचा बाजूचा विजेचा मुख्य युनिट आणि त्याचा समोरून गडाची वाट उतरतेवेळी विजेंद्र आणि सर्वेश.
तिथेच रस्त्याला फलक दिसत आहे.

कैलासगड/ घोडमांजरीचा डोंगराचा फलक

डोंगराचा सोंडेची पहिली टेकडी आणि त्याबाजूला लाल रंगात अंदाजे दाखवलेली वाट.

गडाच्या माथ्यावर वर आल्यावर उजवीकडे भगवा झेंडा लावलेला आहे.

भगव्या जवळ सर्वेश आणि विजेंद्र 

गडावर झेंड्याचा पुढे सुखलेला छोटा तलाव

गडावर जाण्यासाठी वाट मुरलेली आहे. त्यामुळे चुकण्याचा शक्यता खूप कमी आहे. आम्ही गड चडायला सुरवात करताच १० मिनिटात एका दरीजवळ आलो. तिथेच वर उजवा बाजूला एक वाट डोंगराचा सोंडेचा टेकडी वर गेली आहे. टेकडीवरुन समोरील मुळशी धरणाच्या अप्रतिम दृश्य दिसते विशेष करून धरणाचा निळ्याशार पाण्यात पडणाऱ्या डोंगराचे सुंदर प्रतिबिंब कॅमेरात टिपता येते. पुन्हा खाली उतरुण त्यादरीजवळ आल्यावर, डाव्याबाजूने डोंगरावर वाट जाते. त्या वाटेने पुढे जावे. त्याच वाटेने थोडा पुढे गेले असता, अजून एक वाट उजवीकडे वर जाते ती वाट बहुतेक सोंडेचा दुसऱ्या अजून एक उंच टेकडीवर जात असावी. पण ती वाट न पकडता सरळ जी डावीकडची पायवाट जाते त्याने चालत राहावे. मधेच वाट चड-उतार होते आणि पुढे जाऊन वाट उजवीकडे वर वळते हिथून तुम्ही गडाचा माथ्यावर लगेच पोहचतात.
आम्ही १० ला गड चढायला सुरवात केली आणि ११ पर्यंत १ तासात गडाचा माथ्यावर पोहोचलो.
गडावर पाहण्यासारखे
गडावर पोहचताच एक छोट्या पठारावर भगवा झेंड्यापाशी पोहचतो. त्याचाच पुढे एकदम छोटासा सुखलेला नैसर्गिक तलाव दिसतो. त्याचा पुढील कडेवर ऊभे राहिले असता समोरील मुळशी धरण आणि त्याचा आजूबाजूचा निसर्ग दिसतो. येथून डावीकडे बघितले असता घनगड आणि तैलबैला हि दिसतो.

गडाचा उंच माथ्यावर जाणारी वाट. ह्याच वाटेचा डावीकडे एक वाट गुहे जवळ (पाण्याचा टाकी) जवळ गेली. गडावर बाणाच चिन्ह मार्ग दर्शवण्यासाठी लावलेले आहे.
पुन्हा पाठी वळून गडाचा उंच माथ्यावर जाण्यासाठी वाट गेली आहे त्यावाटेने पुढे जावे. पण उंच माथ्यावर जाण्याचा आधी एक वाट डाव्या बाजूला खाली जाते तिथे अर्धवट खोदलेली गुहा आहे त्यात पाणी साचून पाण्याची टाकी वाटते. त्यातील पाणी वापरण्या योग्य नाही. गुहा/ टाकी बघून झाल्यानंतर पुन्हा ज्यावाटेने खाली आला होतात तिकडे पुन्हा येऊन वर उजव्या वाटेने पुढे जावे. गडावर दुर्गप्रेमीने मार्ग दाखवणारे बाणाचे चिन्ह लावलेले आहेत. त्यामुळे खूप मदत होते. त्या वाटेने वर गेल्यावर उजव्या बाजूला एक पडकी वास्तू दिसते. सध्या त्यामध्ये पिंपळाचा झाड आले आहे.  त्याचाच उजव्याबाजूला वर गडाचा माथ्यावर वाट जाते. माथ्यावर अवशेष काहीच नाही पण फक्त तुम्हाला त्या माथ्यावरून पूर्ण गड आणि त्या भोवतीचा दृश्य दिसतो. आम्ही माथ्यावर जाऊन पुन्हा खाली वास्तू जवळ आलो, आणि वाट धरून पुढे चालू लागलो. पुढे काही अंतरावर तुम्हाला अनेक ठिकाणी काळे पाषाण विखुरलेले दिसतात त्यामुळे शंकराची पिंड नीट कुठे आहे तो शोधायला लागते.


गडाचा उंच माथा आणि त्याचा खाली लाल रंगाच वर्तुळ केलेली जुने अवशेष असलेली वास्तू. ज्या मध्ये पिंपळाच झाड आले आहे
वरील फोटोत लाल रंगाच वर्तुळ करून दाखवलेली वास्तू ज्या मध्ये पिंपळाचा झाड आले आहे


शंकराची पिंड

शंकराची पिंडी भवती असलेली पडकी भिंत 

पण पिंडी चा बाजूला २ ते २.३० फुटाची गोलाकार पडकी भिंत आहे. जी एखाद्या पडलेल्या बांधा सारखी दिसते.  शंकराची पिंड हि कातळात कोरल्यासारखी आहे.
जिथे शंकराची पिंड आहे तिथेच बहुतेक गड संपतो. कारण आम्ही सुरवातीला शंकरची पिंड शोधण्याचा हेतूने पाय वाटेने बरेच पुढं पर्यंत जंगली झाडी तोडत गेलो. पण वाट काही संपत नव्हती. वाट पुढे पुढे जातच होती. त्यामुळे आम्ही तिकडून पुन्हा पाठी फिरलो. कारण गडाचा डोंगर पुन्हा पुढे दुसऱ्या डोंगराला जुळतो.  त्यामुळे डोंगर हा खूप पसरलेला आहे. (हे तुम्हाला कैलास गडाचा वडुस्ते गावातून काढलेल्या फोटो वरून कळेल). पण बहुतेक मुख्यगड  शंकराचा पिंडी जवळच संपतो कारण पुढे काही अवशेष किव्हा वास्तू आम्हाला दिसल्या नाही. गडावरून दुसऱ्या गावात उतरायला वाट आहे असे मी इंटरनेट वर वाचला होता, त्याप्रमाणे आम्हाला २ वाटा दिसल्या पण नेमकी कुठची वाट कुठे जाते हे आम्हाला माहित नव्हता. 
पूर्ण गड १ तासात पाहून होतो.

आम्हचा गड पाहून जेवण करून आम्ही २. ३० ला उतरायला सुरवात केली. आम्ही पाऊण तासात खाली पुन्हा रस्त्याला पोहचलो. आणि पुन्हा आल्या त्यामार्गाने पनवेलला गेलो.
बहुतेक पुढे वर्षभर येथील रस्ता चांगला असेल कारण निवडणुकीमुळे रस्त्याचा काम चालू होता. तरी पण गाडी सोबत स्टेपनी न विसरता घेऊन जाणे.

गडाचा उंच माथ्यावरून दिसणारा गडाचा झेंड्याचा विरुद्ध दिशेचा भाग